Honor 8A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 04 Jan 2019 11:00:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8 जानेवारीला या दमदार फीचर्स सह लॉन्च होईल ऑनर 8ए स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/honor-8a-set-to-launch-on-january-8th-in-china-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-8a-set-to-launch-on-january-8th-in-china-in-marathi/#respond Fri, 04 Jan 2019 11:00:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3291 टीजर मध्ये हॉनर 8ए ची डिजाइन पण दाखवण्यात आली आहे

The post 8 जानेवारीला या दमदार फीचर्स सह लॉन्च होईल ऑनर 8ए स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवाईची सब-ब्रँड कंपनी ऑनर यावर्षी आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च करण्यास तयार आहे. कंपनी ने गुरुवारी चीनच्या माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट वीबो वर एक टीजर शेअर केला आहे, ज्यानुसार कंपनी आपला ऑनर 8ए चीन मध्ये 8 जानेवारीला लॉन्च करेल. नावाने वेगळा वाटणारा हा स्मार्टफोन गेल्या वर्षी एप्रिल मध्ये लॉन्च झालेल्या ऑनर 7ए चा अपग्रेडेड वेरिएंट असेल. तसेच टेनाच्या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला आहे कि ऑनर 8ए मध्ये एंड्रॉयड पाई ऑपरेटिंग सिस्टम असेल.

ऑनर ने आपल्या ऑफिशियल वीबो अकाउंट वर नवीन फोनचा टीजर शेअर केला आहे, ज्यानुसार कंपनी ऑनर 8ए 8 जानेवारीला लॉन्च करेल. टीजर मध्ये याची माहिती मिळाली आहे कि यात 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि हा डिवाइस ऑक्टा-कोर चिपसेट सह येईल.

इतकेच नव्हे तर टीजर मध्ये हॉनर 8ए ची डिजाइन पण दाखवण्यात आली आहे, ज्यावरून असे वाटत आहे कि फोन मध्ये वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल. तसेच फोन मध्ये स्टीरियो स्पीकर्स असल्याची माहिती समोर आली आहे. टेना लिस्टिंग नुसार डिवाइस एंडॉयड 9.0 पाई वर चालेल. तसेच ऑनर 8ए मध्ये 6.08-इंचाचा एचडी+ (720×1560 पिक्सल) एलसीडी पॅनल असेल.

हँडसेट 2.2 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे. तसेच लिस्टिंग मध्ये समजले आहे कि डिवाइसच्या मागे 13-मेगापिक्सल कॅमेरा आणि सेल्फी साठी फ्रंटला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल.

स्टोरेज साठी ऑनर 8ए मध्ये 32 जीबी आणि 64जीबी चे ऑप्शन दिले जाऊ शकतात. तसेच डिवाइस मध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रोएसडी कार्ड सपोर्टचा ऑप्शन असू शकतो. लिस्टिंग मध्ये फिंगरप्रिंट सेंसरची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच हँडसेट मध्ये फेस अनलॉक फीचर असेल कि नाही हेही माहित नाही.

The post 8 जानेवारीला या दमदार फीचर्स सह लॉन्च होईल ऑनर 8ए स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-8a-set-to-launch-on-january-8th-in-china-in-marathi/feed/ 0