Honor View20 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 03 Jan 2019 11:56:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जानेवारी 2019 मध्ये इंडिया मध्ये लॉन्च होतील हे 5 शानदार फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m20-m10-huawei-y9-2019-nova-4-honor-view20-realme-a1-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m20-m10-huawei-y9-2019-nova-4-honor-view20-realme-a1-in-marathi/#respond Thu, 03 Jan 2019 11:56:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3279 आम्ही 5 अशा स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे जे या महिन्यात भारतात येतील.

The post जानेवारी 2019 मध्ये इंडिया मध्ये लॉन्च होतील हे 5 शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2019 सुरु झाला आहे. नवीन वर्षासोबतच टेक्नॉलॉजी मार्केट पण नवीन प्रोडक्ट्स व स्मार्टफोन्स सह तयार आहे. स्मार्टफोन यूजर्सना अशा आहे कि नवीन वर्षात त्यांच्या आवडीच्या कंपन्या आणि ब्रँड काही वेगळे व शानदार स्मार्टफोन लॉन्च करतील. जानेवारी मधेच लास वेगास मध्ये सीईएस 2019 चे महा आयोजन होणार आहे. या मंचावर अनेक टेक कंपन्या आपली टेक्नॉलॉजी व प्रोडक्ट सादर करतील. तर दुसरीकडे जानेवारी मध्ये भारतीय बाजार पण अनेक शानदार स्मार्टफोन्सच्या लॉन्च साठी तयार आहे. पुढे आम्ही 5 अशा स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे जे या महिन्यात भारतात येतील.

सॅमसंग गॅलेक्सी एम20

सॅमसंग गॅलेक्सी जे आणि गॅलेक्सी ए सीरीज हटवून आपल्या नवीन एम सीरीजची सुरवात करणार आहे. या फोन संबंधित आता पर्यंत भरपूर माहिती आली आहे. आता पर्यंत मिळालेल्या बातम्यांनुसार जानेवारीच्या सुरवातीला हा फोन लॉन्च केला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एम20 कंपनीचा पहिला फोन असेल ज्यात वाटर ड्रॉप नॉच मिळेल. सोबतच फोन मध्ये डुअल कॅमेरा आणि 5,000 एमएएच ची बॅटरी पण असेल. फोन एक्सनोस 7885 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो आणि यात 3जीबी रॅम आणि 32जीबी मेमरी असण्याची शक्यता आहे.

हुआवई नोवा 4

हुआवई नोवा 4 डिसेंबर मध्ये चीन मध्ये लॉन्च झाला होता जो या महिन्यात भारतात येईल. या फोन मध्ये 6.41-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह पंच होल नॉच देण्यात आली आहे.हा फोन 8जीबी रॅम सह हाईसिलिकॉन कीरीन 970 चिपसेट वर चालतो. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हुआवई नोवा 4 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48-एमपी+16-एमपी+2-एमपी चे कॅमेरा सेंसर आहेत. हा जगातील पहिला फोन आहे ज्यात 48-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 25-एमपी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हुआवई नोवा 4 फास्ट चार्जिंग सह 3,750 एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. चीन मध्ये या फोनची किंमत 3,099 युआन (जवळपास 30,000 रुपये) पासून सुरु आहे.

ऑनर व्यू 20

ऑनर व्यू20 जानेवारी मधेच येऊ शकतो. हा फोन वी20 नावाने काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. आता हाच फोन लवकरच जगभरात लॉन्च होणार आहे. ऑनर व्यू20 मध्ये 6.4-इंचाचा सुपर फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन हुआवई च्या किरीन 980 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. सोबत 6जीबी रॅम व 8जीबी रॅमआणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा सेल्फी आणि 48-मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. मागील पॅनल वर टीओएस 3डी सेंसर पण आहे. पावर बॅकअप साठी ऑनर ने या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रियलमी ए1

रियलमी निवडक स्मार्टफोन्सच्या जोरावर भारतात मजबूत फॅनबेस बनवत आहे. तसेच आता कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. हा फोन याच महिन्यात भारतात रियलमी ए1 नावाने येईल. आता समोर आलेल्या माहितीनुसार रियलमी ए1 मीडियाटेक हेलियो पी 70 प्रोसेसर सह सादर केला जाऊ शकतो. कंपनी यात 2जीबी आणि 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देऊ शकते. लीक रिपोर्ट्स अनुसार डिवाइस मध्ये पावर बॅकअप साठी 4,200एमएएच ची बॅटरी असेल. फोटोग्राफी साठी 13-एमपी+2-एमपी चा डुअल रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

हुआवई वाय 9 (2019)

हुआवई वाय 9 (2019) अमेझॉन इंडिया वर लिस्ट झाला आहे आणि येत्या काही दिवसांत बाजारात पण येईल. या फोन मध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. चीन मध्ये हा फोन 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज तसेच 6जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. एंडरॉयड ओरियो सह हा फोन हुआवई किरीन 710 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी यात 16-एमपी व 2-एमपी चा डुअल रियर कॅमेरा तसेच 13-एमपी व 2-एमपी चा डुअल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. अशा आहे कि भारतात हुआवई वाय 9 (2019) चा बेस वेरिएंट 15,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीती लॉन्च होईल.

The post जानेवारी 2019 मध्ये इंडिया मध्ये लॉन्च होतील हे 5 शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m20-m10-huawei-y9-2019-nova-4-honor-view20-realme-a1-in-marathi/feed/ 0