How To In Android - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 31 Dec 2019 14:11:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 चोरी झालेला मोबाईल करू शकता ट्रॅक आणि पूर्णपणे ब्लॉक, जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-track-stolen-or-lost-mobile-and-how-to-block-imei-number/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-track-stolen-or-lost-mobile-and-how-to-block-imei-number/#respond Tue, 31 Dec 2019 14:11:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6164 या सेवेचा फायदा दिल्ली आणि मुंबईच्या लोकांना घेता येईल पण हळूहळू संपूर्ण देशात हि सेवा सुरु केली जाईल.

The post चोरी झालेला मोबाईल करू शकता ट्रॅक आणि पूर्णपणे ब्लॉक, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रत्येक ठिकाणी तुम्ही मोबाईल घेऊन जाता पण नेहमीच तुम्हाला तुमचा मोबाईल चोरी होण्याची भीती पण वाटत असते. कारण आपण अनेक प्रकरणं ऐकलेली असतात. कधी बस मध्ये तर कधी ट्रेन मध्ये, कधी मेट्रो मध्ये तर अनेकदा एयरपोर्ट वर पण असे अनेक किस्से ऐकायला मिळतात. बाजारात पण मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडतात. तसेच बऱ्याचदा घरातून पण मोबाईल चोरी होतो. जेव्हा असे प्रसंग ऐकतो तेव्हा विचार येतो कि एखादी अशी सिस्टम असू शकत नाही का जी आपोआप मोबाईल लॉक करू शकेल आणि तो ट्रॅक पण करू शकेल. फोन चोरी झाल्यावर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करतो पण त्यावर किती कारवाई होते समजत नाही. मोबाईल ग्राहकांची हि गरज पाहून भारत सरकारने एक वेब पोर्टल लॉन्च केले आहे जे तुमचा चोरी झालेला किंवा हरवलेला मोबाईल फोन शोधण्यास मदत करेल. सध्या या सेवेचा फायदा दिल्ली आणि मुंबईच्या लोकांना घेता येईल पण हळूहळू संपूर्ण देशात हि सेवा सुरु केली जाईल.

मोबाईल यूजर्ससाठी हि सिस्टम सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स बनवली आहे जी CDOT नावाने ओळखली जाते. संपूर्ण सिस्टम तयार करण्यात दिल्ली पोलिसांचे योगदान महत्वाचे आहे. तसेच CDOT ने सरकारी संस्था डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (DOT) ची पण मदत घेतली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही फोनचा IMEI Number बंद करू शकता आणि फोन मिळाल्यावर तो पुन्हा अनब्लॉक पण करू शकता.

ब्लॉक करण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या

लक्षात असू दे कि हा पोर्टल तुमचा आईएमईआई नंबर ब्लॉक करण्यासाठी, अनब्लॉक करण्यासाठी आणि तो ट्रॅक करण्यासाठी आहे. असे असलेतरी तुमचा फोन हरवल्यास किंवा चोरी झाल्यास सर्वात आधी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करणे आवश्यक आहे. तक्रार केल्यानंतर तक्रार नंबर आठवणीने घ्या.

IMEI No ने फोन ब्लॉक कसा करावा

आता तुम्हाला आपला फोन कसा ब्लॉक करायचा हे जाणून घ्यायचे असेल. तर त्यासाठी सर्वात आधी

1. तुम्हाला https://ceir.gov.in/ वेब पोर्टल वर जावे लागेल. इथे क्लिक करून तुम्ही जाऊ शकता.

2. या पोर्टल वर तुम्हाला तीन पर्याय मिळतील. पहिला ब्लॉक स्टोलेन किंवा लॉस्ट मोबाईल, दुसरा अन-ब्लॉक फाउंड मोबाईल आणि तिसरा चेक रिक्वेस्ट स्टेटस.

3. फोन ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला पहिल्या ऑप्शन वर ब्लॉक स्टोलेन किंवा लॉस्ट मोबाईल वर क्लिक करायचे आहे. तुम्ही इथे क्लिक करून थेट ब्लॉक मोबाईलच्या पेज वर जाऊ शकता.

4. यावर क्लिक करताच तुमच्या समोर एक लांबलचक फॉर्म येईल जो भरावा लागेल.

5. यात सर्वात आधी तुमच्याकडून मोबाईल नंबर घेतला जाईल. जर डुअल सिम फोन असेल तर दोन्ही मोबाईल नंबर टाकावे लागतील.

6. त्यानंतर फोनचा IMEI No टाकावा लागेल. जर डुअल सिम फोन असेल तर दोन IMEI No असतील. तुम्हाला IMEI No माहित नसेल तर तो फोनच्या बॉक्स वर पण दिलेला असतो. जर एंडरॉयड फोन असेल तर तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंट वरून पण काढू शकता.

7. तो टाकल्यानंतर मोबाईलचा ब्रँड, मॉडेल नंबर आणि खरेदीची पावती (बिल) टाकावे लागेल.

8. हि प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा फोन कुठे, कधी, कोणत्या राज्यात हरवला याची माहिती द्यावी लागेल.

9. त्यानंतर ज्या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही तक्रार केली आहे त्याची माहिती टाकावी लागेल आणि तक्रार नंबर सह तक्रारीची कॉपी पण अपलोड करावी लागेल.

10. हि प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची माहिती मागितली जाईल. जसे कि ओनर म्हणजे फोनच्या मालकाचे नाव आणि पत्ता टाकल्यानंतर तुमचा आईडी प्रूफ अपलोड करावा लागेल.

11. तिथेच आईडी नंबर आणि ईमेल आईडी टाकण्याचा पर्याय मिळेल. खाली मोबाईल नंबरचा ऑप्शन असेल जो तक्रारीसह रजिस्टर करायचा आहे. त्याच नंबर वर ओटीपी येईल. ओटापी आल्यानंतर तुमचा रिक्वेस्ट आईडी नंबर येईल आणि तुमचे काम होईल. IMEI ब्लॉक होईल आणि रिक्वेस्ट आईडी नंबर टाकून तुम्ही तो ट्रॅक करू शकाल.

चोरी झालेल्या फोनचे स्टेटस करा चेक

https://ceir.gov.in/ पोर्टल वर तिसरा पर्याय स्टेटस चेक करण्याचा आहे आणि त्यावर क्लिक करताच एक पेज उघडेल त्यात तुम्हाला तुमचा रिक्वेस्ट आईडी टाकायचा आहे. तो टाकल्यावर स्टेटस अपडेट होईल. स्टेटस पोर्टल वर जाण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता.

IMEI No अनब्लॉक कसा करावा

जेव्हा तुमचा फोन मिळेल तेव्हा तुम्ही तो अनब्लॉक करून वापरू शकता. अश्यावेळी https://ceir.gov.in/ पोर्टल वर दुसरा ऑप्शन IMEI No अनब्लॉक करण्याचा आहे. त्यावर क्लिक करताच एक पेज समोर येईल, तिथे तुमच्याकडे रिक्वेस्ट नंबर आणि मोबाईल नंबर मागितला जाईल. जेव्हा तुम्ही फोन ब्लॉक केला होता तेव्हाचा रिक्वेस्ट नंबर टाकावा लागेल. तुम्ही इथे क्लिक करून थेट अनब्लॉक पेज वर जाऊ शकता.

लक्षात असू दे इथे दोन मोबाईल नंबरचा ऑप्शन आहे. पहिला जो तुम्ही रिक्वेस्ट आईडी घेताना ओटीपी साठी वापरला होता तो टाकणे आवश्यक आहे. तर दुसरा मोबाईल नंबर तो ज्यावर तुम्हाला OTP हवा आहे अनब्लॉक करण्यासाठी. यानंतर तुमचा फोन अनब्लॉक होईल आणि तुम्ही पुन्हा वापरू शकाल.

IMEI No ब्लॉक केल्याने काय फायदा होईल

तुमच्या फोन मध्ये खूप डेटा असतो जो तुमच्या फोनपेक्षा जास्त मौल्यवान असतो. त्यामुळे आईएमईआई नंबर ब्लॉक करून फोन पूर्णपणे निष्क्रिय केला जाऊ शकतो. जर एखाद्या माणसाच्या हाती तुमचा फोन लागला तर तो काहीपण करू शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप आवश्यक आहे.

The post चोरी झालेला मोबाईल करू शकता ट्रॅक आणि पूर्णपणे ब्लॉक, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-track-stolen-or-lost-mobile-and-how-to-block-imei-number/feed/ 0