HTC U12 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 30 Aug 2018 11:54:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6जीबी रॅम आणि 6-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एचटीसी चा पावरफुल फोन यू12 लाइफ https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-life-official-with-6gb-ram-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-life-official-with-6gb-ram-specifications-price-in-marathi/#respond Thu, 30 Aug 2018 11:51:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1872 या फोनची अंर्तराष्ट्रीय किंमत 27,700 रुपयांच्या आसपास आहे जो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आशियातील देशांत लॉन्च केला जाईल.

The post 6जीबी रॅम आणि 6-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एचटीसी चा पावरफुल फोन यू12 लाइफ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एचटीसी च्या यू सीरीज ने आधीच टेक बाजारात पाय रोवले आहेत. आज कंपनी ने आपल्या या सीरीज मध्ये अजून एक स्मार्टफोन आणला आहे. एचटीसी ने ग्लोबल मंचावरून यू12 लाइफ स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनची अंर्तराष्ट्रीय किंमत 27,700 रुपयांच्या आसपास आहे जो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आशियातील देशांत लॉन्च केला जाईल. एचटीसी यू12 लाइफ इंडिया मध्ये कधी लॉन्च होईल याची माहिती कंपनी ने दिली नाही पण आशा आहे की येत्या काही दिवसांत एचटीसी याची घोषणा करू शकते.

एचटीसी यू12 लाइफ कंपनी ने मे महिन्यात लॉन्च केलेल्या यू12 प्लस स्मार्टफोन चा छोटा वर्जन आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन मेटल आणि ग्लास डिजाईन वर बनलेला आहे. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6-इंचाचा फुलएचडी+ बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. कंपनी ने फोन एचटीसी सेंस टेक्नोलॉजी सह बाजारात आणला आहे.

यू12 लाइफ दोन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. एक वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा वेरिएंट 6जीबी रॅम सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यू12 लाइफ च्या फ्रंट पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

एचटीसी यू12 लाइफ 4जी एलटीई ला सपोर्ट करतो तसेच यात वाईफाई, एनएफसी, यूएसबी टाइप सी आणि 3.5एमएम जॅक सारखे आॅप्शन्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,600एमएएच ची बॅटरी आहे. एचटीसी यू12 लाइफ कंपनी ने मूनलाईट ब्लू आणि ट्वाईलाइट पर्पल कलर मध्ये लॉन्च केला आहे. फोन च्या इंडिया लॉन्च साठी कंपनी च्या ​आॅफिशियल घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post 6जीबी रॅम आणि 6-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एचटीसी चा पावरफुल फोन यू12 लाइफ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-life-official-with-6gb-ram-specifications-price-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम, अल्ट्रापिक्सल डुअल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च झाला एचटीसी चा दमदार स्मार्टफोन यू12 प्लस, बघा स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-plus-official-price-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-plus-official-price-feature-specifications-in-marathi/#respond Wed, 23 May 2018 14:28:52 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=604 एचटीसी ने आपला हा हाईएंड डिवाईस दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे जे 64जीबी व 128जीबी ची इंटरनल मेमरी ला सपोर्ट करतात.

The post 6जीबी रॅम, अल्ट्रापिक्सल डुअल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च झाला एचटीसी चा दमदार स्मार्टफोन यू12 प्लस, बघा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
खुप दिवसांपासून टेक जगात चर्चा चालू होती की एचटीसी कंपनी आपल्या यू सीरीज मध्ये लवकरच नवीन ​​फ्लॅगशिप डिवाईस आणणार आहे. आज कंपनी ने आपल्या नवीन हाईएंड डिवाईस ‘यू12+’ अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला आहे. एचटीसी यू12+ आता ग्लोबल मंचावर आॅफिशियल झाला आहे जो येणार्‍या काही दिवसांमध्ये भारता सह वेगवेगळ्या बाजारांत येईल. चला बघुया एचटीसी चा हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस.

एचटीसी यू12+ ट्रेंड मध्ये असलेल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहे या फोन मध्ये 2,880 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6-इंचाची मोठी सुपर एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंंडरॉयड आधारित एचटीसी सेंस यूआई सह सादर करण्यात आला आहे सोबत हा क्वालकॉम च्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो. तर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 630 जीपीयू पण आहे.

कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी ची दमदार रॅम मेमरी दिली आहे. एचटीसी ने आपला हा हाईएंड डिवाईस दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे जे 64जीबी व 128जीबी ची इंटरनल मेमरी ला सपोर्ट करतात. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 12-मेगापिक्सल अल्ट्रापिक्सल 4 तसेच 16-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या कॅमेरा सेंसर मध्ये एआई टेक्निक आहे तसेच एआर स्टीकर फीचर ला सपोर्ट करतो.

एचटीसी यू12+ स्मार्टफोन पण आपल्या यू सीरीज च्या जुन्या स्मार्टफोन प्रमाणे स्क्वीज फीचर सह येतो. कपंनी ने हा फोन आईपी68 रेटिंग सह सादर केला आहे. ज्यामुळे हा धूळ आणि पाण्या पासून वाचतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर सह या फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी आहे जी क्वीक चार्ज 3.0 टेक्निक सह येते.

किंमत पाहता अंर्तराष्ट्रीय बाजारात एचटीसी यू12+ चा 64जीबी स्टोरेज वेरिएंट 799 यूएस डॉलर किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे तर फोन च्या 128जीबी मेमरी वेरिएंट चे मूल्य 899 यूएस डॉलर आहे. भारतीय करंसी नुसार ही किंमत क्रमश: 54600 रुपये तसेच 61,400 रुपये असेल. एचटीसी यू12+ ब्लॅक व रेड कलर मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन भारतात कधी येईल याविषयी काही माहिती मिळाली नाही.

The post 6जीबी रॅम, अल्ट्रापिक्सल डुअल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च झाला एचटीसी चा दमदार स्मार्टफोन यू12 प्लस, बघा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-plus-official-price-feature-specifications-in-marathi/feed/ 0