Huawei Enjoy 20 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 04 Sep 2020 10:35:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Huawei Enjoy 20 आणि Enjoy 20 Plus लॉन्च, पॉप-अप कॅमेऱ्यासह आहे 8 जीबी रॅम, मोठी बॅटरी आणि 5G प्रोसेसर https://www.91mobiles.com/marathi/huawei-enjoy-20-plus-5g-smartphone-launched-5000mah-battery-dimensity-720g-soc/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-enjoy-20-plus-5g-smartphone-launched-5000mah-battery-dimensity-720g-soc/#respond Fri, 04 Sep 2020 10:35:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7987 Huawei ने टेक मंचावर आपली ‘एन्जॉय सीरीज’ वाढवत काल दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत जे Huawei Enjoy 20 आणि Enjoy 20 Plus नावाने लॉन्च करण्यात आले आहेत.

The post Huawei Enjoy 20 आणि Enjoy 20 Plus लॉन्च, पॉप-अप कॅमेऱ्यासह आहे 8 जीबी रॅम, मोठी बॅटरी आणि 5G प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने टेक मंचावर आपली ‘एन्जॉय सीरीज’ वाढवत काल दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत जे Huawei Enjoy 20 आणि Enjoy 20 Plus नावाने लॉन्च करण्यात आले आहेत. हे दोन्ही मोबाईल कंपनीचे 5G स्मार्टफोन आहेत जे सध्या हुआवईच्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये आले आहेत. पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार लुक आणि ताकदवान बॅटरी या फोन्सची खासियत आहे. हुआवई आपले हे नवीन डिवाईसेज भारतात लॉन्च करेल किंवा नाही याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

वेरिएंट्स व किंमत

Huawei Enjoy 20 चीनी बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 1699 युआन म्हणजे जवळपास 30,000 रुपये आहे. तसेच फोनच्या मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 1899 युआन म्हणजे जवळपास 33,500 रुपये आहे. हा फोन Black, Green, Gold आणि Blue-Pink Gradient कलर मध्ये विकत घेता येईल.

तसेच Huawei Enjoy 20 Plus ने पण चीनी मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये एंट्री घेतली आहे. फोनच्या बेस वेरिंएट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच याची किंमत PRM 2299 म्हणजे भारतीय करंसी नुसार 40,600 रुपयांच्या आसपास आहे. तसेच फोनचा मोठा वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि या वेरिएंटची किंमत PRM 2499 म्हणजे जवळपास 44,000 रुपये आहे. हुआवईचे हे दोन्ही फोन 10 सप्टेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Huawei Enjoy 20 Plus

हुआवई एन्जॉय 20 प्लस बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन 6.63 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने आपला फोन पूर्णपणे बेजल लेस ठेवला जो सेल्फी कॅमेरा साठी पॉप-अप सेटअपला सपोर्ट करतो. एन्जॉय 20 प्लस मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा डायमनसिटी 720 चिपसेट देण्यात आला आहे जो 5जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.

Huawei Enjoy 20 Plus ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, ज्या सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 40वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,200एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Huawei Enjoy 20

हुआवई एन्जॉय 20 पाहता हा फोन 6.6 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. सीरीजचा छोटा मॉडेल असल्यामुळे हुआवईने हा फोन वॉटरड्रॉप नॉच सह बाजारात आणला आहे. एन्जॉय 20 स्मार्टफोन पण प्रोसेसिंगसाठी आक्टाकोर प्रोसेसर सह 5जी कनेक्टिविटी असलेल्या मीडियाटेकच्या डायमनसिटी 720 चिपसेटला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी Huawei Enjoy 20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिकसलच्या प्राइमरी सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर पण आहे. हुआवईचा हा फोन 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

The post Huawei Enjoy 20 आणि Enjoy 20 Plus लॉन्च, पॉप-अप कॅमेऱ्यासह आहे 8 जीबी रॅम, मोठी बॅटरी आणि 5G प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-enjoy-20-plus-5g-smartphone-launched-5000mah-battery-dimensity-720g-soc/feed/ 0