Huawei Enjoy Max - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 16 Oct 2018 14:24:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7.12-इंचाचा डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी सह खूपच पावरफुल फोन हुआवई एन्जॉय मॅक्स आणि एन्जॉय 9 प्लस लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/huawei-enjoy-max-and-enjoy-9-plus-5000mah-battery-feature-specification-price-launched-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-enjoy-max-and-enjoy-9-plus-5000mah-battery-feature-specification-price-launched-in-marathi/#respond Tue, 16 Oct 2018 14:24:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2522 हे दोन्ही स्मार्टफोन्स सध्या चीन मध्ये आले आहेत जे येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

The post 7.12-इंचाचा डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी सह खूपच पावरफुल फोन हुआवई एन्जॉय मॅक्स आणि एन्जॉय 9 प्लस लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी हुआवई ने आज अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपली एन्जॉय सीरीज वाढवत एक साथ दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनी ने एन्जॉय 9 प्लस आणि एन्जॉय मॅक्स स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स सध्या चीन मध्ये आले आहेत जे येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये सेल साठी उपलब्ध होतील. हे दोन्ही स्मार्टफोन मोठी स्क्रीन, दमदार बॅटरी आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह आले आहेत.

हुआवई एन्जॉय मॅक्स
एन्जॉय सीरीजचा हा लेटेस्ट स्मार्टफोन ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1080 x 2244 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 7.12-इंचाचा मोठा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित ईएमयूआई 8.2 वर सादर करण्यात आला आहे. जो आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 एआईई चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 512 जीपीयू आहे.

हुआवई एन्जॉय मॅक्स 4जीबी रॅम सह बाजारात आला आहे. हा फोन चीन मध्ये 64जीबी आणि 128जीबी स्टोरेज वाल्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच दोन्ही वेरिएंट ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येता. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एन्जॉय मॅक्स डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे.

एन्जॉय मॅक्स एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी एन्जॉय मॅक्स मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 5,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

हुआवई एन्जॉय 9 प्लस
एन्जॉय 9 प्लस हुआवई ने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.5-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन पण एंडरॉयड ओरियो आधारित ईएमयूआई वर सादर करण्यात आला आहे जो आॅक्टा-कोर प्रोसेसर सह किरीन 710 चिपसेट वर चालतो. ग्राफिक्स साठी फोन मध्ये एआरएम माली-जी51 एमपी4 जीपीयू देण्यात आला आहे.

कंपनी ने हा फोन 4जीबी रॅम मेमरी सह सादर करण्यात आला आहे. हा फोन पण चीन मध्ये एकापेक्षा जास्त स्टोरेज वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल तसेच फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एन्जॉय 9 प्लस डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी पण फोन 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो.

हुआवई एन्जॉय 9 प्लस डुअल 4जी वोएलटीई फीचरला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत पाहता हुआवई एन्जॉय मॅक्स चा 64जीबी स्टोरेज वेरिएंट 1699 युआन तर 128जीबी मेमरी वेरिएंट 1999 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय करंसी नुसार हि किंमत क्रमश: 18,000 रुपये व 21,000 रुपयांच्या आसपास आहे. तसेच हुआवई एन्जॉय 9 प्लस चा 64जीबी मेमरी वेरिएंट 1499 युआन (जवळपास 15,900 रुपये) व 128जीबी वेरिएंट 1699 युआन (जवळपास 18,100 रुपये) मध्ये चीनि बाजरात विकत घेता येईल.

The post 7.12-इंचाचा डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी सह खूपच पावरफुल फोन हुआवई एन्जॉय मॅक्स आणि एन्जॉय 9 प्लस लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-enjoy-max-and-enjoy-9-plus-5000mah-battery-feature-specification-price-launched-in-marathi/feed/ 0