Huawei Mate X2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 24 Feb 2021 14:33:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला पुस्तकाप्रमाणे घडी होणारा Huawei Mate X2 फोन, बदलेल का फोल्डेबल फोन्सची दुनिया https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-x2-launch-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-x2-launch-price-sale-specification/#respond Wed, 24 Feb 2021 14:33:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10153 Huawei Mate X2 मध्ये कनेक्टिविटी ऑप्शनसाठी 4जी एलटीई, डुअल-बॅंड वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, एनएफसी आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.

The post 50MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला पुस्तकाप्रमाणे घडी होणारा Huawei Mate X2 फोन, बदलेल का फोल्डेबल फोन्सची दुनिया first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने साल 2019 मध्ये लॉन्च केलेल्या फोल्डेबल फोन Mate X चा अपग्रेडेड वर्जन Mate X2 लॉन्च केला आहे. मेट एक्स2 जुन्या वर्जनपेक्षा वेगळ्या फोल्डिंग मॅकॅनिज्मसह आला आहे. हा फोन कंपनीने आपल्या गृह मार्केट चीनमध्ये सादर केला आहे जो डिजाइनच्या बाबतीत Galaxy Fold सारखा आहे. Huawei ने मेट एक्स2 च्या अंतरराष्ट्रीय उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती दिली नाही. (Huawei Mate X2 launch price sale specification)

डिजाइन

डिजाइन पाहता फोन एका नवीन फोल्डिंग मॅकॅनिज्मसह आला आहे, त्यामुळे फोन पुस्तकाप्रमाणे उघडतो आणि बंद होतो. या फोनमध्ये मेन स्क्रीन बाहेरच्या ऐवजी Samsung Galaxy Fold मॉडेल प्रमाणे आतल्या बाजूस घडी होतो. तसेच फोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. फोनची सर्वात वरच्या स्क्रीनवर पिल-शेप पंच होल डिजाइन सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. डिवाइसच्या मागे रेकटेंगुलर कॅमेरा मॉड्यूल आहे जो कि क्वाड लेंससह आला आहे.

शानदार स्क्रीन

या फोनमध्ये 6.5 इंच ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1,160×2,700 पिक्सल सह 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 456पीपीआई पिक्सल डेंसिटी आहे. अनफोल्ड केल्यावर यात तुम्हाला 8 इंच ओलेड डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिजोल्यूशन 2,200×2,480 पिक्सल आहे. सोबत 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 180 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो.

हा फोन ऑक्टा-कोर किरिन 9000 प्रोसेसर सह येतो, त्यासोबत Mali-G78 जीपीयू मिळतो. हुवावे मेट एक्स2 स्मार्टफोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज आहे, जी मेमरी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी अधिक वाढवता येते.

दमदार कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये मागे f/1.9 लेंस आणि ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन (OIS) सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे, त्याचबरोबर अल्ट्रा-वाइड-अँगल f/2.2 लेंससह 16 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, f/2.4 अपर्चरसह 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि OIS सपोर्ट आणि f/4.4 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यात फ्रंटला f/2.2 लेंससह 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

Huawei Mate X2 मध्ये कनेक्टिविटी ऑप्शनसाठी 4जी एलटीई, डुअल-बॅंड वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, एनएफसी आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. डुअल-सिम (नॅनो) हुवावे मेट एक्स2 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 आधारित EMUI 11.0 वर चालतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, सोबत 55 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

किंमत

Huawei Mate X2 च्या 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 17,999 (जवळपास 201,600 रुपये) आणि 8 जीबी रॅम + 512 स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 18,999 (जवळपास 213,000 रुपये) आहे. फोन Black, White, Crystal Blue आणि Crystal Pink कलर मध्ये 25 फेब्रुवारीपासून विकला जाईल.

The post 50MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला पुस्तकाप्रमाणे घडी होणारा Huawei Mate X2 फोन, बदलेल का फोल्डेबल फोन्सची दुनिया first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-x2-launch-price-sale-specification/feed/ 0