HUAWEI MatePad T8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 09 Sep 2020 09:58:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,100एमएएच बॅटरी आणि 8 इंचाचा डिस्प्ले असलेला हा डिवाईस फक्त 9,999 रुपयांमध्ये झाला भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/huawei-matepad-t8-launched-in-india-wi-fi-and-lte-model-price-at-rs-9999/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-matepad-t8-launched-in-india-wi-fi-and-lte-model-price-at-rs-9999/#respond Wed, 09 Sep 2020 09:58:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8055 HUAWEI MatePad T8 भारतात 2 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे.

The post 5,100एमएएच बॅटरी आणि 8 इंचाचा डिस्प्ले असलेला हा डिवाईस फक्त 9,999 रुपयांमध्ये झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने काही दिवसांपूर्वी टेक मार्केट मध्ये आपली ‘एन्जॉय सीरीज’ वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Huawei Enjoy 20 आणि Enjoy 20 Plus लॉन्च केले होते. हे दोन्ही मोबाईल्स कंपनीचे 5G स्मार्टफोन्स आहेत जे सध्या हुआवईच्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. या मिडरेंज स्मार्टफोन्स नंतर आता हुआवईने भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत स्वस्त टॅबलेट डिवाईस HUAWEI MatePad T8 लॉन्च केला आहे. हा डिवाईस फक्त 9,999 रुपयांमध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

HUAWEI MatePad T8

हुआवई मेटपॅड टी8 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 1280 x 800 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 8 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. स्क्रीन दोन्ही बाजूंनी नॅरो बेजल्स सह येते तर वरच्या आणि खालच्या बाजूला रुंद बॉडी पार्ट आहे. वरच्या बाजूला टॅबलेटचा सेल्फी कॅमेरा आहे.

कंपनीने HUAWEI MatePad T8 एंडरॉयड 10 ओएस वर सादर केला आहे जो ईएमयूआई 10.0.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या टॅबलेट मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी8768 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा टॅब आईएमजी जीई8320 जीपीयू ला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: Huawei Enjoy 20 आणि Enjoy 20 Plus लॉन्च, पॉप-अप कॅमेऱ्यासह आहे 8 जीबी रॅम, मोठी बॅटरी आणि 5G प्रोसेसर

HUAWEI MatePad T8 भारतात 2 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे. टॅबलेट मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर हुआवई मेटपॅड टी8 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा डिवाईस एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावर बॅकअपसाठी हुआवई मेटपॅड टी8 5,100एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे जी 5वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हुआवईच्या या नवीन टॅबलेटचे डायमेंशन 199.7 x 121.1 x 8.55एमएम आहे तसेच डिवाईसचे वजन 310 ग्राम आहे. ब्लूटूथ 5.0, जीपीएस व माइक्रो यूएसबी सोबतच हा डिवाईस 3.5एमएम जॅकला पण सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: 4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Huawei चा हा शानदार फोन

मॉडेल व किंमत

HUAWEI MatePad T8 भारतात दोन मॉडेल्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात एलटीई आणि वाई-फाई मॉडेल्सचा समावेश आहे. टॅबलेटचा Wi-Fi वर्जन 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर LTE वर्जनची किंमत 10,999 रुपये आहे. हुआवईचा हा डिवाईस शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर Deep sea Blue कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. 15 सप्टेंबर पर्यंत MatePad T8 चा एलटीई मॉडेल पण 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

The post 5,100एमएएच बॅटरी आणि 8 इंचाचा डिस्प्ले असलेला हा डिवाईस फक्त 9,999 रुपयांमध्ये झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-matepad-t8-launched-in-india-wi-fi-and-lte-model-price-at-rs-9999/feed/ 0