Huawei Nova 4e - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 14 Mar 2019 13:32:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि या दमदार प्रोसेसर सह आला हुआवई नोवा 4ई https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4e-launched-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4e-launched-price-specifications-in-marathi/#respond Thu, 14 Mar 2019 13:32:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3857 डिवाइस आज पासून प्री-ऑर्डर साठी उपलब्ध झाला आहे आणि 21 मार्च पासून सेल साठी येईल.

The post 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि या दमदार प्रोसेसर सह आला हुआवई नोवा 4ई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी टेक्नोलॉजी कंपनी हुआवई 26 मार्चला आपल्या पी सीरीजच्या स्मार्टफोन मध्ये दोन हाईएंड फ्लॅगशिप फोन पी30 आणि पी30 प्रो लॉन्च करणार आहे. त्याआधी कंपनीने आपल्या घरच्या मार्केट मध्ये नोवा सीरीज मध्ये नोवा 4ई लॉन्च केला आहे. हा डिवाइस सध्या फक्त सिर्फ चीनी मार्केट मध्ये सादर केला गेला आहे. पण भारतात या डिवाइसच्या लॉन्चबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

हुआवई नोवा 4ई ची डिजाइन
हुआवई नोवा 4ई ची डिजाइन पाहता फोनच्या फ्रंटला वाटर ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामुळे यूजर्सना जास्त स्क्रीन-टू बॉडी रेश्यो मिळतो. म्हणजे स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो जितका जास्त असेल तेवढीच फोनची फ्रेम कमी होईल. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेऱ्याचा हॉरिजोंटल सेटअप देण्यात आला आहे. तसेच फोनच्या मागे फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

गूगलने सादर केला एंडरॉयड Q चा बीटा एडिशन, आजच करू शकता आपल्या फोन मध्ये डाउनलोड

हुआवई नोवा 4ई ची किंमत आणि उपलब्धता
हुआवई ने नोवा 4ई फक्त चीन मध्ये लॉन्च केला आहे, ज्याचे दोन वेरिएंट आहेत. या डिवाइसच्या 4जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,999 आरएमबी (जवळपास 20,700 रुपये) आणि 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 2,299 आरएमबी (जवळपास 22,800 रुपये) आहे. हँडसेट तीन कलर ऑप्शन-व्हाइट, ब्लॅक आणि ग्रेडिएंट ब्लू मध्ये सादर केला गेला आहे. तसेच डिवाइस आज पासून प्री-ऑर्डर साठी उपलब्ध झाला आहे आणि 21 मार्च पासून सेल साठी येईल.

हुआवई नोवा 4ई चे स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता हुआवई नोवा 4ई मध्ये फुल-एचडी पॅनल 6.15-इंचाचा देण्यात आला आहे. मिड-रेंज डिवाइस मध्ये ऑक्टा-कोर किरिन प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम व 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

समोर आला एंडरॉयडचा नवीन ओएस एंडरॉयड Q, बघा कसे असतील नवीन फीचर्स

फोन ईएमयूआई 9.0.1 बेस्ड एंडरॉयड 9.0 पाई वर चालतो. फोटोग्राफी साठी हुआवई नोवा 4ई मध्ये 24-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर आणि एफ/1.8 अपर्चर लेंस मागे देण्यात आली आहे. सोबत मागे 2-मेगापिक्सल सेकंडरी डेप्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सल 120-डिग्री अल्ट्रा वाइड एंगल लेंस एलईडी फ्लॅश सह देण्यात आली आहे. फोन मध्ये फ्रंट कॅमेरा 32-मेगापिक्सलचा आहे.

पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,340एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंग यूएसबी टाइप-सी सपोर्ट सह येते. हुआवई ने डिवाइस मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर पण दिला आहे. फोन मध्ये वीडियो रिंगटोनचा ऑप्शन देण्यात आला आहे.

The post 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि या दमदार प्रोसेसर सह आला हुआवई नोवा 4ई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4e-launched-price-specifications-in-marathi/feed/ 0