Huawei Nova Y91 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 May 2023 09:33:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7,000mAh battery असलेला फोन! पाहा कोणती कंपनी घेऊन आली आहे हा पावरहाउस https://www.91mobiles.com/marathi/7000-mah-battery-phone-huawei-nova-y91-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/7000-mah-battery-phone-huawei-nova-y91-features-and-specifications/#respond Mon, 22 May 2023 09:33:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21070 Huawei ब्रँड आता भारतीय मोबाइल बाजारात सक्रिय नाही परंतु ग्लोबल मार्केटमध्ये कंपनीचे प्रीमियम फोन लोकप्रिय आहेत. ह्या कंपनीनं एक नवीन स्मार्टफोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये लाँच केला आहे जो 7,000mAh battery सह आला आहे. ज्याचे नाव Huawei Nova Y91 आहे आणि मोठ्या बॅटरीमुळे टेक विश्वात हा चर्चेचा विषय ठरला आहे. पुढे तुम्ही हुवावे नोवा वाय91 ची माहिती […]

The post 7,000mAh battery असलेला फोन! पाहा कोणती कंपनी घेऊन आली आहे हा पावरहाउस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फुल चार्जवर 29 तास व्हिडीओ बघता येतील.
  • फोनचं नाव Huawei Nova Y91 आहे.
  • हा इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकला जाईल.

Huawei ब्रँड आता भारतीय मोबाइल बाजारात सक्रिय नाही परंतु ग्लोबल मार्केटमध्ये कंपनीचे प्रीमियम फोन लोकप्रिय आहेत. ह्या कंपनीनं एक नवीन स्मार्टफोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये लाँच केला आहे जो 7,000mAh battery सह आला आहे. ज्याचे नाव Huawei Nova Y91 आहे आणि मोठ्या बॅटरीमुळे टेक विश्वात हा चर्चेचा विषय ठरला आहे. पुढे तुम्ही हुवावे नोवा वाय91 ची माहिती वाचू शकता.

7,000एमएएच बॅटरी

Huawei Nova Y91 स्मार्टफोनची मुख्य खासियत यातील पावरफुल बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यावर फोनवर सतत 29 तास व्हिडीओ बघता येतील, म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त. कंपनीनं हा सेफ आणि सिक्योर असल्याचं म्हटलं आहे. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा फोन 22.5W HUAWEI SuperCharge टेक्नॉलॉजीसह आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले – Huawei Nova Y91 मध्ये 2376 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.95 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तर 270हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालते.

प्रोसेसर – हुवावे नोवा वाय91 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये 8जीबी रॅम देण्यात आला आहे जोडीला 128जीबी स्टोरेज व 256जीबी स्टोरेज मिळते.

कॅमेरा – फोनच्या बॅक पॅनलवर दोन कॅमेरा सेन्सर आहेत ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स तर 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हुवावे फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

कनेक्टिव्हिटी – हा एक 4जी फोन आहे ज्यात ड्युअल सिम, वायफाय, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएससह यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.

सिक्योरिटी – Huawei Nova Y91 च्या साइड पॅनलवरील पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच हा मोबाइल फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो.

फोन प्राइस

Huawei Nova Y91 कंपनीनं ऑफिशियल केलं आहे परंतु सध्या ह्याची किंमत समोर आली नाही. किंमत वगळता इतर सर्व माहिती ब्रँड वेबसाइटवर सार्वजनिक करण्यात आली आहे. हा मोबाइल वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या किंमतीती उपलब्ध होईल. आम्ही सांगितल्याप्रमाणे हुवावे फोन भारतात विकले जाणार नाहीत.

The post 7,000mAh battery असलेला फोन! पाहा कोणती कंपनी घेऊन आली आहे हा पावरहाउस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/7000-mah-battery-phone-huawei-nova-y91-features-and-specifications/feed/ 0