Huawei P Smart S - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 09 Jun 2020 10:03:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Huawei चा हा शानदार फोन https://www.91mobiles.com/marathi/huawei-p-smart-s-launched-with-huawei-appgallery-4000mah-battery-48mp-triple-cameras-and-kirin-710f/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-p-smart-s-launched-with-huawei-appgallery-4000mah-battery-48mp-triple-cameras-and-kirin-710f/#respond Tue, 09 Jun 2020 10:03:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7353 फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Huawei P Smart S ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post 4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Huawei चा हा शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन मोबाइल लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ‘पी स्मार्ट’ सीरीज मध्ये जोडला गेला आहे जो Huawei P Smart S नावासह बाजारात आला आहे. मोठ्या डिस्प्ले सोबतच हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो लुक मध्ये आर्कषक आहे तसेच स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत पण शानदार आहे. हुआवईने आपला हा फोन सध्या इटली मध्ये लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांत पण सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Huawei P Smart S

हुआवई पी स्मार्ट एस चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.17 टक्के आहे. हा डिवाईस 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.3 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हुआवईने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे.

हुआवई पी स्मार्ट एस एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो ईएमयूआई 10.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह हुआवईचा 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनला किरीन 710एफ चिपसेट देण्यात आला आहे. पी स्मार्ट एस स्मार्टफोन Huawei AppGallery सह लॉन्च झाला आहे जो Google apps आणि services ला सपोर्ट करत नाही.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Huawei P Smart S ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हुआवई पी स्मार्ट एस मध्ये एफ/2.0 अचर्पर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Huawei P Smart S डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबत फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटीसाठी फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या डिवाईस मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Huawei P Smart S इटली मध्ये 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे. फोन 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हा फोन 249.90 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे जो भारतीय करंसीनुसार 21,000 रुपयांच्या आसपास आहे. इटली मध्ये हुआवई पी स्मार्ट एस Breathing Crystal आणि Midnight Black कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Huawei चा हा शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-p-smart-s-launched-with-huawei-appgallery-4000mah-battery-48mp-triple-cameras-and-kirin-710f/feed/ 0