Huawei P30 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 19 Jul 2019 03:59:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जबरदस्त कॅमेरा आणि 8जीबी रॅम सह हुआवई पी30 प्रो आला भारतात, या फोनने घेतलेल्या फोटोला नाही तोड https://www.91mobiles.com/marathi/huawei-p30-pro-lite-launched-in-india-price-features-specifications-offer-sale/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-p30-pro-lite-launched-in-india-price-features-specifications-offer-sale/#respond Tue, 09 Apr 2019 09:08:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4050 हुआवई पी30 प्रो भारतात 71,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post जबरदस्त कॅमेरा आणि 8जीबी रॅम सह हुआवई पी30 प्रो आला भारतात, या फोनने घेतलेल्या फोटोला नाही तोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने गेल्या महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचावर आपली स्मार्टफोन सिरीज वाढवत पी सीरीजचा विस्तार केला होता. कंपनीने पी30 सीरीज सादर केली होती. या सीरीज अंतर्गत हुआवई पी30, पी30 प्रो आणि प्री30 लाइट लॉन्च करण्यात आले होते. Huawei P30 सीरीजच्या ग्लोबल लॉन्च नंतर काही दिवसांनी आज हि स्मार्टफोन सीरीज भारतात पण आली आहे. हुआवई ने पी30 सीरीज भारतात आणत सीरीजचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन पी30 प्रो लॉन्च केला आहे. या फोन सोबत पी30 लाइट पण बाजारात आला आहे. हुआवई पी30 प्रो दमदार स्पेसिफिकेशन्स सोबतच आपल्या कॅमेरा सेग्मेंट मध्ये पण हिट झाला आहे आणि आता हा भारतीय बाजारात पण प्रसिद्ध कॅमेरा फोन्सना चांगली टक्कर देणार आहे.

जबरदस्त कॅमेरा
Huawei P30 Pro ची सर्वात मोठी ताकद फोनचा कॅमेरा सेग्मेंटच आहे. हा फोन क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह येतो, म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर 4 रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. Huawei ने हा फोन लेईका कॅमेरा सेंसर सह आणला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 40-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.6 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच P30 Pro मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आणि एफ/3.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे.

P30 Pro च्या बॅक पॅनल वर हुआवई टाईम-ऑफ-फ्लाइट (टीओएफ) सेंसर देण्यात आला आहे जो फोटो क्लिक करताना ऑब्जेक्ट व बॅकग्राउंड अंतर बघून ब्लर करतो. फोनचा रियर कॅमेरा सेटअप एआई ईमेज स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजी सोबत आटो फोकस टेक्नॉलॉजी ने सुसज्ज करण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हुआवई पी30 प्रो च्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

हुआवई पी30 प्रो लुक
Huawei ने हा फोन को ट्रेंड मध्ये चल रही वॉटरड्राप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. फोनच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खाली बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. हुआवई पी30 प्रो च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो फोनच्या डाव्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या बाजूला फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला हुआवईची ब्रॅंडिंग देण्यात आली आहे. Huawei P30 Pro च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम ट्रे आहे. तसेच्या फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट आहे.

हुआवई पी30 प्रो स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता Huawei P30 Pro 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.47-इंचाच्या ओएलईडी फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या डिस्प्ले मधेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. कंपनीने हा फोन एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 9 वर सादर केला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम ड्यूल-एनयूपी टेक्नॉलॉजी सपोर्ट करणाऱ्या हुआवईच्या सर्वात पावरफुल किरीन 980 चिपसेट वर चालतो.

Huawei P30 Pro भारतात 8जीबी रॅम वर लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन आईपी68 रेटिड आहे जो पी30 प्रो ला पाणी व धुळीपासून वाचवतो. ब्लूटूथ व एनएफसी सारख्या कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी Huawei P30 Pro मध्ये फेस अनलॉक टेक्नॉलॉजी तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी Huawei P30 Pro मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत पाहता हुआवई पी30 प्रो भारतात 71,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हुआवई पी30 प्रो शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वरून विकत घेता येईल. विशेष म्हणजे हुआवई पी30 प्रो च्या खरेदीवर फक्त 2,000 रुपये जास्त देऊन 15,990 रुपयांचा हुआवई जीटी वॉच पण मिळवता येईल.

The post जबरदस्त कॅमेरा आणि 8जीबी रॅम सह हुआवई पी30 प्रो आला भारतात, या फोनने घेतलेल्या फोटोला नाही तोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-p30-pro-lite-launched-in-india-price-features-specifications-offer-sale/feed/ 0
6जीबी रॅम सह हुआवई पी30 लाइट झाला भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/huawei-p30-lite-launched-in-india-price-features-specifications-offer-sale-p30-pro/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-p30-lite-launched-in-india-price-features-specifications-offer-sale-p30-pro/#respond Tue, 09 Apr 2019 08:41:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4047 Huawei P30 Lite चा 4जीबी रॅम वेरिएंट 19,990 रुपये तथा 6जीबी रॅम वेरिएंट 22,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे

The post 6जीबी रॅम सह हुआवई पी30 लाइट झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने आज भारतीय बाजारात आपली सर्वात नवीन आणि पावरफुल स्मार्टफोन सीरीज पी30 लॉन्च केला आहे. कंपनीने हाईएंड डिवाईस पी30 प्रो सोबत अजून एक आणि पावरफुल फोन पी30 लाइट पण भारतीय बाजारात आणला आहे. किंमतीच्या बाबतीत P30 Lite P30 Pro पेक्षा स्वस्त आहे, पण प्रोसेसिंग आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत कुठेही मागे नाही. हुआवई इंडियाने हा फोन 2 वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. चला बघूया हुआवई पी30 लाइट ची डिजाईन, लुक, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत :

हुआवई पी30 लाइट लुक
Huawei ने हा फोन ट्रेंड मधील वॉटरड्राप नॉच डिस्प्ले वर सादर करण्यात आला आहे. फोनच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खाली बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. हुआवई पी30 लाइट च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो फोनच्या डाव्या पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला हुआवईची ब्रॅंडिंग देण्यात आली आहे. Huawei P30 Lite च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम ट्रे आहे. तसेच्या फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट आहे.

हुआवई पी30 लाइट स्पेसिफिकेशन्स
कंपनीने हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करण्यात आला आहे जो 2312 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.15-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्ले स्क्रॅच पासून वाचवण्यासाठी 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. कंपनीने P30 Lite एंडरॉयड 9.0 पाई आधारित ईएमयूआई 9.0 वर सादर करण्यात आला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या किरीन 710 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एआरएम माली-जी51 एमपी4 जीपीयू देण्यात आला आहे.

Huawei ने P30 Lite 6जीबी रॅम तथा 4जीबी रॅम च्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटाग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर हुआवई पी30 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 24-मेगापिक्सलचा प्राइमरी, 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड एंगल सेंसर देण्यात आला आहे.

सेल्फी साठी Huawei P30 Lite एफ/2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हुआवई पी30 लाइट डुअल​ सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी फास्ट चर्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 3,340एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हुआवई पी30 लाइट ची किंमत
Huawei पी सीरीजचा हा स्मार्टफोन मीडनाईट ब्लॅक, पर्ल वाईट तसेच पिकॉक ब्लू कलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने Huawei P30 Lite चा 4जीबी रॅम वेरिएंट 19,990 रुपये तथा 6जीबी रॅम वेरिएंट 22,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो कंपनीच्या साइट सोबत अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post 6जीबी रॅम सह हुआवई पी30 लाइट झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-p30-lite-launched-in-india-price-features-specifications-offer-sale-p30-pro/feed/ 0