Huawei P40 Pro Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 27 Mar 2020 12:43:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Huawei ने केले शक्तिप्रदर्शन, लॉन्च केला 8 कॅमेरे आणि 8 जीबी रॅम असलेले पावरफुल P40 Pro+ आणि P40 Pro https://www.91mobiles.com/marathi/huawei-p40-pro-plus-launched-feature-camera-specifications-battery-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-p40-pro-plus-launched-feature-camera-specifications-battery-price-sale/#respond Fri, 27 Mar 2020 12:43:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6920 कंपनीने Huawei P40, Huawei P40 Pro आणि Huawei P40 Pro+ स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

The post Huawei ने केले शक्तिप्रदर्शन, लॉन्च केला 8 कॅमेरे आणि 8 जीबी रॅम असलेले पावरफुल P40 Pro+ आणि P40 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने आज अंर्तराष्ट्रीय टेक बाजारात आपले फ्लॅगशिप फोन्स वाढवत ‘पी40 सीरीज’ सादर केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने Huawei P40, Huawei P40 Pro आणि Huawei P40 Pro+ स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. हा लॉन्च ईवेंट पॅरिस मध्ये होणार होता पण कोरोना वायरसच्या प्रकोपामुळे हुआवईने ऑनलाईन पद्धतीने आपले नवीन डिवाईसेज बाजारात उतरवले आहेत. फोन लॉन्च करण्यासोबतच कंपनीने या तिन्ही स्मार्टफोन्सच्या अंर्तराष्ट्रीय किंमतींची पण घोषणा केली आहे. हे फोन्स आगामी काळात यूरोप मध्ये सेलसाठी उपलब्ध होतील तर इंडियन यूजर्सना Huawei P40 सीरीजसाठी थोडी वाट बघावी लागेल.

डिस्प्ले

सर्वात आधी फोनच्या डिस्प्ले बाबत बोलायचे तर Huawei P40 Pro आणि P40 Pro+ कंपनीने 1200 × 2640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या क्वॉडएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोनची स्क्रीन फक्त आकाराने मोठी नाही तर दोन्ही बाजुंनी बॅक पॅनलकडे कर्व आहेत. हुआवईने या स्क्रीनला आक्टा फ्लेक्स डिस्प्लेचे नाव दिले आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते तसेच DCI-P3 HDR ला सपोर्ट करते. हे दोन्ही फोन आईपी68 रेटिड आहेत ज्यामुळे हे धूळ आणि पाण्यापासून वाचतात.

प्रोसेसर

Huawei P40 Pro आणि P40 Pro+ दोन्ही स्मार्टफोन्स सोबतच हि सीरीज कंपनीने ‘HMS’ म्हणजे हुआवई मोबाईल सर्विस वर लॉन्च केली आहे. म्हणजे या स्मार्टफोन्स मध्ये गूगलचा एंडरॉयड ओएस मिळणार नाही. एचएमएस सह हे फोन्स ईएमयूआई 10.1 वर चालतात. तसेच प्रोसेसिंगसाठी या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये कंपनीचा किरीन 990 चिपसेट देण्यात आला आहे. हुआवईचा दावा आहे कि हे चिपसेट फक्त पावरफुल प्रोसेसिंग साठी नसून सोबत कॅमेरा व फोन मधील इतर फीचर्सना एआई पावर पण देतो.

कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इथे पी40 प्रो आणि पी40 प्रो+ मध्ये थोडा फरक आहे. Huawei P40 Pro+ बद्दल बोलायचे तर हा फोन 6 रियर कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 50 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 40 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर, 8 मेगापिक्सल पेरिस्कोप लेंस आणि 8 मेगापिक्सल टेलीफोटो लेंस सह एक टीओएफ सेंसर आणि एक कलर टेम्परेचर सेंसर पण देण्यात आला आहे.

Huawei P40 Pro कंपनीने क्चॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर प्रो प्लस वर्जन प्रमाणे 50 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 40 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर, 12 मेगापिक्सल टेलीफोटो लेंस आणि एक टीओएफ सेंसर आहे. हा फोनच्या कलर टेम्परेचर सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी हे दोन्ही फोन्स 32 मेगापिक्सल + आटो फोकस डुअल पंच होल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

बॅटरी

Huawei P40 Pro+ मध्ये 40वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. फोनची बॅटरी वायरलेस पद्धतीने पण चार्ज केली जाऊ शकते आणि वायरलेस चार्जिंग पण 40वॉट सुपर फास्ट टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. त्याचप्रमाणे Huawei P40 Pro मध्ये पण 40वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे तसेच हा फोन 27वॉट फास्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वायरलेसली चार्ज केला जाऊ शकतो.

वेरिएंट्स व किंमत

Huawei P40 Pro कंपनीने 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 999 यूरो आहे. Huawei P40 Pro+ कंपनीने 8 जीबी रॅम व 512 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला आहे ज्याची किंमत 1399 यूरो आहे. इंडियन करंसी नुसार हि किंमत क्रमश: 82,000 रुपये आणि 1,15,000 रुपयांच्या आसपास आहे. पी40 प्रो तर 7 एप्रिल पासून यूरोप मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल तर पी40 प्रो+साठी जूनची वाट बघावी लागेल.

The post Huawei ने केले शक्तिप्रदर्शन, लॉन्च केला 8 कॅमेरे आणि 8 जीबी रॅम असलेले पावरफुल P40 Pro+ आणि P40 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-p40-pro-plus-launched-feature-camera-specifications-battery-price-sale/feed/ 0