Huawei Y5P - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sun, 07 Jun 2020 11:45:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Huawei Y6p आणि Huawei Y5p प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध, 5000एमएएच बॅटरी सह आहे ट्रिपल कॅमेरा, बघा किंमत https://www.91mobiles.com/marathi/huawei-y6p-y5p-launched-price-sale-offer-full-specs-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y6p-y5p-launched-price-sale-offer-full-specs-5000mah-battery/#respond Wed, 06 May 2020 10:46:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7325 कंपनीच्या दोन नवीन फोन्सचे लीक समोर आले होते ज्यांची नावे Huawei Y6P आणि Huawei Y5P अशी आहेत.

The post Huawei Y6p आणि Huawei Y5p प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध, 5000एमएएच बॅटरी सह आहे ट्रिपल कॅमेरा, बघा किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei सध्या फुलफॉर्म मध्ये दिसत आहे. कंपनी भारतात आपल्या ‘वाय सीरीज’ चा Huawei Y9s स्मार्टफोन लॉन्च करणार आहे जो अमेझॉन इंडिया वर पण लिस्ट झाला आहे. या फोन व्यतिरिक कंपनीने अजून एकआणि नवीन फोन Huawei Y8s यूरोपियन वेबसाइट वर ऑफिशियल केला आहे. तर दुसरीकडे कालच कंपनीच्या दोन नवीन फोन्सचे लीक समोर आले होते ज्यांची नावे Huawei Y6P आणि Huawei Y5P अशी आहेत. आज हुआवईने आज या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत समोर आली आहे.

हुआवईने Huawei Y6P आणि Huawei Y5P रोमानिया मध्ये ऑफिशियल केले आहेत. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमती सादर केली आहे त्यानंतर हे डिवायस तिथे प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले आहेत. हुआवई वाय6पी पाहता हा फोन रोमानिया मध्ये RON 799 म्हणजे जवळपास 13,500 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Black, Green आणि Purple कलर मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. तसेच हुआवई वाय5पी RON 599 म्हणजे जवळपास 10,000 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Black, mint आणि blue कलर मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

Huawei Y6p

हुआवई वाय6पी 6.3 इंचाच्या एचडी+ एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. लीक मध्ये शेयर झालेल्या फोटो मध्ये फोनचे डायमेंशन 159.07 x 74.06 x 9.04एमएम तसेच फोनचे वजन 185 ग्राम असल्याचे सांगण्यात आले आहे. Huawei Y6P एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 आधारित ईएमयूआई 10.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट वर चालतो.

हुआवईने हा फोन 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला आहे. Huawei Y6P ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी हुआवई वाय6पी मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Huawei Y5p

हुआवई वाय5पी 5.45 इंचाच्या टीएफटी एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. या फोन मध्ये रुंद बेजल्स असलेली स्क्रीन आहे ज्यात कोणतीही नॉच नाही. तसेच फोनचे डायमेंशन 146.5 x 70.94 x 8.35एमएम तसेच फोनचे वजन 144 ग्राम आहे. Huawei Y5P एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 आधारित ईएमयूआई 10.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट वर चालतो.

हुआवईने हा फोन 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला आहे. Huawei Y5P सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह 8 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हुआवई वाय5पी मध्ये 3,020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Source

The post Huawei Y6p आणि Huawei Y5p प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध, 5000एमएएच बॅटरी सह आहे ट्रिपल कॅमेरा, बघा किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y6p-y5p-launched-price-sale-offer-full-specs-5000mah-battery/feed/ 0
5000एमएएच बॅटरी असलेले Huawei Y6P आणि Huawei Y5P इंटरनेट वर झाले लीक, फुल स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/huawei-y6p-y5p-full-specifications-photo-design-leaked-5000mah-battery-triple-camera-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y6p-y5p-full-specifications-photo-design-leaked-5000mah-battery-triple-camera-price-sale-offer/#respond Tue, 05 May 2020 11:41:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7335 आज हुआवईचे दोन नवीन फोन लीकच्या माध्यमातून समोर आले आहेत. हे दोन्ही डिवाईस ‘वाय सीरीज’ चे आहेत ज्यांची नावे Huawei Y6P आणि Huawei Y5P असल्याचे सांगण्यात आले आहे.

The post 5000एमएएच बॅटरी असलेले Huawei Y6P आणि Huawei Y5P इंटरनेट वर झाले लीक, फुल स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei बद्दल कालच बातमी आली होती कि कंपनीच्या ‘वाय सीरीज’ चा नवीन फोन Huawei Y9s भारतात शॉपिंग साइट अमेझॉन वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग नंतर स्पष्ट झाले कि हुआवई वाय9एस लवकरच भारतीय बाजारात येऊ शकतो. आज हुआवईचे दोन नवीन फोन लीकच्या माध्यमातून समोर आले आहेत. हे दोन्ही डिवाईस ‘वाय सीरीज’ चे आहेत ज्यांची नावे Huawei Y6P आणि Huawei Y5P असल्याचे सांगण्यात आले आहे. लीक मध्ये या दोन्ही फोन्सच्या फोटो सोबतच यांचे स्पेसिफिकेशन्स पण शेयर करण्यात आले आहेत. हुआवईचे हे दोन्ही फोन लो बजेट मध्ये लवकरच येतील.

Huawei Y6P

हुआवई वाय6पी बद्दल बोलायचे झाले तर लीकनुसार हा स्मार्टफोन 6.3 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. लीक मध्ये शेयर झालेल्या फोटो मध्ये फोन वॉटरड्रॉप नॉच सह दाखवण्यात आला आहे. लीकनुसार हा फोन Black, Green आणि Purple कलर मध्ये लॉन्च होईल. त्याचबरोबर फोनचे डायमेंशन 159.07 x 74.06 x 9.04एमएम तसेच फोनचे वजन 185 ग्राम सांगण्यात आले आहे. लीकनुसार Huawei Y6P एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 आधारित एचएमएस म्हणजे हुआवई मोबाइल सर्विसेज वर लॉन्च केला जाऊ शकतो.

तसेच प्रोसेसिंगसाठी Huawei Y6P मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट मिळू शकतो. लीकनुसार हुआवईचा हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल ज्या सोबत 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. Huawei Y6P ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह दाखवण्यात आला आहे. लीकनुसार हा फोन 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 5 मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि 2 मेगापिक्सलच्या थर्ड सेंसरला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअपसाठी हुआवई वाय6पी मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे.

Huawei Y5P

हुआवई वाय5पी बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो सह येईल जो 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.45 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये रुंद बेजल्स असलेली स्क्रीन असेल ज्यात कोणत्याही प्रकारची नॉच दिली जाणार नाही. लीकनुसार हा फोन Black, Blue आणि Mint कलर मध्ये लॉन्च होईल. त्याचबरोबर फोनचे डायमेंशन 146.5 x 70.94 x 8.35एमएम तसेच फोनचे वजन 144 ग्राम सांगण्यात आले आहे. लीकनुसार Huawei Y5P एंडरॉयड के लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सोबतच ईएमयूआई 10.1 वर लॉन्च केला जाईल.

प्रोसेसिंगसाठी Huawei Y5P मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. लीकनुसार हुआवईचा हा फोन 2 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन 512जीबी एक्सटर्नल स्टोरेजला सपोर्ट करेल. फोनच्या फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल लीक मध्ये काहीच समोर आलेले नाही. तसेच पावर बॅकअपसाठी हुआवई वाय5पी मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 3,020एमएएच ची बॅटरी असल्याचे लीक मध्ये सांगण्यात आले आहे.

हुआवई वाय9एस वीडियो

The post 5000एमएएच बॅटरी असलेले Huawei Y6P आणि Huawei Y5P इंटरनेट वर झाले लीक, फुल स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y6p-y5p-full-specifications-photo-design-leaked-5000mah-battery-triple-camera-price-sale-offer/feed/ 0