Huawei Y7p - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Feb 2020 13:13:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Huawei ने सादर केला 4000एमएएच बॅटरी, पंच-होल डिस्प्ले आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा असलेला नवीन फोन Huawei Y7p https://www.91mobiles.com/marathi/huawei-y7p-official-with-punch-hole-display-triple-rear-camera-4000mah-battery-kirin-710f-specs/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y7p-official-with-punch-hole-display-triple-rear-camera-4000mah-battery-kirin-710f-specs/#respond Thu, 06 Feb 2020 13:13:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6528 आज हुआवईने आपला अजून एक नवीन स्मार्टफोन Huawei Y7p टेक मंचावर सादर केला आहे.

The post Huawei ने सादर केला 4000एमएएच बॅटरी, पंच-होल डिस्प्ले आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा असलेला नवीन फोन Huawei Y7p first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei बद्दल गेल्या आठवड्यात बातमी समोर आली होती कि कंपनी येत्या 14 फेब्रुवारीला मलेशियन मार्केट मध्ये Huawei Nova 7i स्मार्टफोन लॉन्च करेल जो Huawei Nova 6 SE चा ग्लोबल वर्जन असेल. हा स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 4,200एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. Huawei Nova 7i च्या भारतातील लॉन्चची माहिती मिळाली नाही, पण हा मोबाईल भारतात येण्याआधी आज हुआवईने आपला अजून एक नवीन स्मार्टफोन Huawei Y7p टेक मंचावर सादर केला आहे. हुआवई वाई7पी कंपनीने ग्लोबल वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे जो येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये लॉन्च होईल.

लुक व डिजाईन

Huawei Y7p कंपनीचा पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. याच्या लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर हा फोन बेजल लेस डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. हुआवई वाई7पी स्क्रीन वर डावीकडे पंच-होल देण्यात आला आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोनचा बॅक पॅनल पाहता त्यावर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि वाल्यूम रॉकर देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. त्याचप्रमाणे Huawei Y7p च्या खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट सह 3.5एमएम जॅक आणि स्पीकर ग्रिल आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Huawei Y7p कंपनीने ग्लोबल वेबसाइट वर फुल स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट केला आहे. हा स्मार्टफोन 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.39 इंचाच्या एलसीडी आईपीएस एचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 9.1 वर सादर केला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 710एफ चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी51 जीपीयू आहे.

हुआवईने हा नवीन स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाइट वर एकाच वेरिएंट मध्ये लिस्ट केला आहे ज्यात 4 जीबी रॅम मेमरी सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Huawei Y7p ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर आहे.

Huawei Y7p सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हुआवई वाई7पी डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. Huawei Y7p कंपनीच्या वेबसाइट वर Aurora Blue आणि Midnight Black कलर मध्ये दाखवण्यात आला आहे. या फोनची किंमत किती असेल आणि हा भारतात कधी लॉन्च होईल या माहितीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post Huawei ने सादर केला 4000एमएएच बॅटरी, पंच-होल डिस्प्ले आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा असलेला नवीन फोन Huawei Y7p first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y7p-official-with-punch-hole-display-triple-rear-camera-4000mah-battery-kirin-710f-specs/feed/ 0