Huawei Y9 (2018) - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 01 Oct 2018 09:53:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6जीबी रॅम सह लॉन्च झाला 4 कॅमेरा असलेला हुआवई वाय9 (2019) https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-officially-launched-feature-specifications-quad-cameras-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-officially-launched-feature-specifications-quad-cameras-in-marathi/#respond Mon, 01 Oct 2018 09:53:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2333 कंपनी ने हुआवई वाय9 (2019) दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. एक वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज ला सपोर्ट करतो.

The post 6जीबी रॅम सह लॉन्च झाला 4 कॅमेरा असलेला हुआवई वाय9 (2019) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या आठवड्यात चीनी ​सर्टिफिकेशन्स साइट टेना वर हुआवई चा एक नवीन डिवाईस वाय9 (2019) नावाने लिस्ट करण्यात आला होता. या लिस्टिंग नंतर चर्चा सुरू झाली होती की कंपनी कंपनी लवकरच हा नवीन फोन वाय सीरीज मध्ये आणेल. त्यानुसार आपल्या फॅन्सना खुशखबरी देेत हुआवई ने वाय9 (2019) आॅफिशियली अनाउंस केला आहे. हुआवई ने आपल्या अधिकृत वेबसाइट वर वाई9 (2019) लिस्ट केला आहे जो मीड ऑक्टोबर मध्ये वेगवेगळ्या बाजारांत लॉन्च होईल.

हुआवई वाय9 (2019) कंपनी ने 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. हा फोन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या वाय9 2018 चा अपडेटेड वर्जन आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कर्व्ड ऐज वाली 3डी कर्व्ड ग्लास बॉडी सह सादर करण्यात आला आहे. यात 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.5-इंचाचा फुलव्यू आईपीएस फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे.

कंपनी ने हुआवई वाय9 (2019) दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. एक वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज ला सपोर्ट करतो. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी ने वाढवता येते. हा फोन आॅक्टो-कोर प्रोसेसर सह 12एनएम हाईसिलिकॉन किरीन 710 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी यात माली-जी61 जीपीयू देण्यात आला आहे.

हुआवई वाय9 (2019) मध्ये कंपनी ने 4 कॅमेरा सेंसर्स दिले आहेत. फोनच्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनेल्स वर फोटोग्राफी साठी डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. वाय9 (2019) च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलच्या डुअल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला तसेच हा फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3900एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हुआवई वाय9 (2019) मीड ऑक्टोबर पासून वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होईल. सध्या फोन च्या इंडिया लॉन्च बद्दल काहीच बोलता येणार नाही.

The post 6जीबी रॅम सह लॉन्च झाला 4 कॅमेरा असलेला हुआवई वाय9 (2019) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-2019-officially-launched-feature-specifications-quad-cameras-in-marathi/feed/ 0