Huawei Y9 Prime - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 23 Jul 2019 10:16:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme X ला टक्कर देण्यास 1 ऑगस्टला येत आहे Huawei चा नवीन Y9 Prime, लॉन्चच्या आधी जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-prime-2019-coming-soon-to-india/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-prime-2019-coming-soon-to-india/#respond Tue, 23 Jul 2019 10:16:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4875 रिपोर्ट्सनुसार कंपनी हा 19,000 रुपयांच्या आसपास सादर करू शकते.

The post Realme X ला टक्कर देण्यास 1 ऑगस्टला येत आहे Huawei चा नवीन Y9 Prime, लॉन्चच्या आधी जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल फोन निर्माता कंपनी Huawei लवकरच आपला पहिला पॉप अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन भारतात लॉन्च करण्यासाठी तयार आहे. या फोनच्या माध्यमातून कंपनी मार्केट मधील फोन जसे की OPPO K3, Redmi K20 आणि Realme X ला टक्कर देण्याचा प्रयत्न करेल.

कंपनीने केले कंफर्म

अलीकडेच अमेझॉन इंडियाने आपल्या वेबसाइट वर एक टीजर पोस्ट केला आहे, ज्यावरून निश्चित होत आहे कि कंपनी 1 ऑगस्टला Huawei Y9 Prime 2019 लॉन्च करेल. कंपनीने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल वर एक वीडियो टीजर जारी करून स्पष्ट केले आहे की लवकरच डिवाइस सादर केला जाईल.

किंमत

भारतातील या फोनच्या किंमतीची अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. डिवाइस मिडनाइट ब्लॅक, एमराल्ड ग्रीन आणि सफायर ब्लू कलर मध्ये सादर केला जाऊ शकतो. काही रिपोर्ट्सनुसार कंपनी हा 19,000 रुपयांच्या आसपास सादर करू शकते.

स्पेसिफिकेशन्स

भारताआधी हा फोन इतर अनेक देशांत सेल साठी उपलब्ध आहे. त्यामुळे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आम्हाला आधीच मिळाली आहे. Huawei Y9 Prime (2019) पाहता यात 6.59-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1,080 x 2,340 पिक्सल आहे. तसेच फोन मध्ये हाईसिलिकॉन किरिन 710 चिपसेट आणि माली-जी51 एमपी4 जीपीयू देण्यात आला आहे. यासोबत फोनच्या दोन मध्ये वेरिएंट-4जीबी रॅम+ 64जीबी आणि 4जीबी रॅम+ 128जीबी स्टोरेज आहे. डिवाइस ईएमयूआई बेस्ड एंडरॉयड 9.0 पाई वर आधारित आहे. यासोबतच फोन मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास Huawei Y9 Prime (2019) मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटच्या मागे 16-मेगापिक्सल एफ/1.8 प्राइमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सल अल्ट्रा वाइड-एंगल लेंस आणि 2-मेगापिक्सल एफ/2.4 डेप्थ सेंसिंग यूनिट आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सल पॉप-अप शूटर सेल्फी आहे. सोबतच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Realme X ला टक्कर देण्यास 1 ऑगस्टला येत आहे Huawei चा नवीन Y9 Prime, लॉन्चच्या आधी जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9-prime-2019-coming-soon-to-india/feed/ 0