Huawei Y9a - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 07 Sep 2020 07:39:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8 जीबी रॅम, 64एमपी क्वॉड कॅमेरा आणि 40वॉट 4,200एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला हा स्टाईलिश फोन https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9a-announced-helio-g80-64mp-quad-camera-40w-fast-charging-specs/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9a-announced-helio-g80-64mp-quad-camera-40w-fast-charging-specs/#respond Mon, 07 Sep 2020 07:39:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8013 Huawei Y9a ची स्क्रीन चारही बाजूंनी बाजूच्या कडांना मिळते तसेच डिस्प्ले वर कोणतीही नॉच किंवा पंच-होल नाही.

The post 8 जीबी रॅम, 64एमपी क्वॉड कॅमेरा आणि 40वॉट 4,200एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला हा स्टाईलिश फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HUAWEI ने महिन्याच्या सुरवातीला अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘एन्जॉय सीरीज’ वाढवत दोन नवीन 5G स्मार्टफोन Huawei Enjoy 20 आणि Enjoy 20 Plus लॉन्च केले होते. तर काल कंपनीने टेक मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत अजून एक नवीन डिवाईस ‘वाय सीरीज’ मध्ये पण जोडला आहे. कंपनीने Huawei Y9a लॉन्च केला आहे जो सध्या चीनी मार्केट मध्ये आला आहे. हा फोन कंपनीने मिड बजेट मध्ये आणला आहे जो येत्या काही दिवसांत इतर मार्केट्स मध्ये विक्री साठी उपलब्ध होईल.

Huawei Y9a

थेट फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलयचे झाले तर हुआवई 9ए चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 92 टक्के आहे जी कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.63 इंचाच्या मोठ्या एफएचडी+ बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केली आहे. Huawei Y9a ची स्क्रीन चारही बाजूंनी बाजूच्या कडांना मिळते तसेच डिस्प्ले वर कोणतीही नॉच किंवा पंच-होल नाही. हा फोन पॉप-अप मॉड्यूल वर चालतो.

हुआवई वाय9ए एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो ईएमयूआई 10.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. हुआवईने आपला फोन 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमच्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली-जी52 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Huawei Y9a क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हुआवई वाय9ए मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा देण्यात आला आहे.

Huawei Y9a एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 40वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,200एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. हुआवई वाय9ए Midnight Black, Space Silver आणि Sakura Pink कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे पण फोनच्या किंमतीची वाट बघावी लागेल.

The post 8 जीबी रॅम, 64एमपी क्वॉड कॅमेरा आणि 40वॉट 4,200एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला हा स्टाईलिश फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y9a-announced-helio-g80-64mp-quad-camera-40w-fast-charging-specs/feed/ 0