Infinix Hot 12 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 17 Aug 2022 13:27:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 संपता संपणार नाही या फोनची बॅटरी; 10 हजारांच्या आत 50MP कॅमेरा असलेला फोन लाँच https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-50mp-camera-phone-infinix-hot-12-launched-check-price-and-specs/ https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-50mp-camera-phone-infinix-hot-12-launched-check-price-and-specs/#respond Wed, 17 Aug 2022 13:25:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12296 Infinix Hot 12 स्मार्टफोन Meditek Helio G37 प्रोसेसर आणि 7GB पर्यंतच्या रॅमसह सादर करण्यात आला आहे.

The post संपता संपणार नाही या फोनची बॅटरी; 10 हजारांच्या आत 50MP कॅमेरा असलेला फोन लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix Hot 12 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा इनफिनिक्सचा भारतात HOT सीरीजचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आहे. याआधी कंपनीनं इस सीरीजचे दोन स्मार्टफोन Infinix Hot 12 Play आणि Infinix Hot 12 Pro लाँच केले आहेत. लेटेस्ट इनफिनिक्स हॉट 12 स्मार्टफोन मोठा डिस्प्ले आणि 6000mAh च्या दमदार बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. इनफिनिक्सच्या लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Hot 12 ची भारतात थेट टक्कर Xiaomi, Realme, Samsung आणि Poco च्या 10,000 रुपयांच्या बजेटमधील स्मार्टफोनशी होईल. पुढे आम्ही तुम्हाला लेटेस्ट Infinix Hot 12 च्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Infinix Hot 12 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Infinix Hot 12 स्मार्टफोनमध्ये 6.82-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. इनफिनिक्सच्या या फोनमध्ये LCD स्क्रीन देण्यात आला आहे. हा फोन 460 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनमध्ये Meditek च्या Helio G37 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. हा फोन Android 11 वर आधारित XOS 7.6 कस्टम युजर इंटरफेसवर चालतो. हे देखील वाचा: OnePlus चा 4K स्मार्ट टीव्ही छप्परफाड डिस्काउंट; पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

Infinix Hot 12 स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. हा फोन 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 3GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळते. म्हणजे फोनमध्ये एकूण 7GB रॅमचा सपोर्ट मिळतो. इनफिनिक्सच्या या फोनमध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. चार्जिंगसाठी Type-C पोर्ट मिळतो.

फोटोग्राफीसाठी Infinix Hot 12 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा सेन्सर आहे, जोडीला 2MP चा डेप्थ सेंस आणि AI लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये क्वॉड LED फ्लॅश मिळतो. तसेच फ्रंटला देखील फोनमध्ये 8MP चा कॅमेरा आणि ड्युअल LED फ्लॅश देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा, 66W चार्जिंग, 4830mAh बॅटरीसह आला Vivo V25 Pro; Xiaomi-Oppo ची करणार सुट्टी

Infinix Hot 12 ची किंमत

Infinix Hot 12 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 9,499 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. इनफिनिक्सचा हा फोन स्यान, ब्लू, पर्पल आणि ब्लॅक या चार कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. इनफिनिक्सचा हा फोन फ्लिपकार्टवर 23 ऑगस्टला विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post संपता संपणार नाही या फोनची बॅटरी; 10 हजारांच्या आत 50MP कॅमेरा असलेला फोन लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-50mp-camera-phone-infinix-hot-12-launched-check-price-and-specs/feed/ 0