Infinix Note 12 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 08 Jul 2022 11:04:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 17 हजारांत 108MP कॅमेरा असलेला फोन; स्वस्तात प्रीमियम फीचर्ससह Infinix Note 12 5G सीरीजची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-featured-infinix-note-12-5g-series-launched-in-india-check-specifications-price-and-sale-offers/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-featured-infinix-note-12-5g-series-launched-in-india-check-specifications-price-and-sale-offers/#respond Fri, 08 Jul 2022 11:04:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11243 Infinix Note 12 5G आणि Inifinix Note 12 Pro 5G दोन्ही स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 810 5G प्रोसेसरसह सादर करण्यात आले आहेत.

The post 17 हजारांत 108MP कॅमेरा असलेला फोन; स्वस्तात प्रीमियम फीचर्ससह Infinix Note 12 5G सीरीजची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने भारतात आपली मिड रेंज Infinix Note 12 5G सीरिज लाँच केली आहे. या लाईनअपमध्ये Infinix Note 12 5G आणि Infinix Note 12 pro 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. परवडणाऱ्या किंमतीत येणाऱ्या या हँडसेटमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो. या सीरीजसाठी कंपनीनं अलीकडेच रिलीज झालेल्या चित्रपट Marvel: Dr Strange in The Multiverse of Madness सोबत भागेदारी केली आहे, जिचे ग्राफिक्स फोनच्या बॉक्समध्ये दिसतात.

Infinix Note 12 5G सीरीजची किंमत

Infinix Note 12 5G स्मार्टफोनच्या एकमेव 6GB रॅम व 64GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Infinix Note 12 Pro 5G स्मार्टफोन 8GB रॅम व 128GB स्टोरेजसह 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे इनफिनिक्सचे दोन्ही स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून 14 जुलैपासून विकत घेता येतील.

लाँच ऑफर्स अंतर्गत Infinix Note 12 5G च्या प्रीपेड ऑर्डरवर 500 रुपये आणि Infinix Note 12 Pro 5G च्या प्रीपेड ऑर्डरवर 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच Axis बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यावर ग्राहकांना 1,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. हे देखील वाचा: अर्धी कमाई पाठवली चीनला; Vivo च्या टॅक्स चोरीवर ED ची मोठी कारवाई

Infinix Note 12 5G सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

Infinix Note 12 5G सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये फक्त कॅमेरा, रॅम आणि स्टोरेजचा फरक आहे, इतर स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. स्टँडर्ड मॉडेलमध्ये 6GB RAM सह 64GB स्टोरेज मिळते तर प्रो व्हेरिएंट 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह बाजारात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन वर्चुअल रॅम फिचरला सपोर्ट करतात त्यामुळे Infinix Note 12 5G चा रॅम 3GB पर्यंत वाढवता येतो तसेच प्रो मॉडेलमध्ये 5GB पर्यंत अतिरिक्त रॅम मिळतो.

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये Gorilla Glass 3 प्रोटेक्शन असलेला 6.7 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन MediaTek के ऑक्टा कोर Dimensity 810 5G प्रोसेसरसह सादर करण्यात आले आहेत. इनफिनिक्सच्या या दोन्ही फोनमध्ये गेमर्ससाठी MediaTek HyperEngine 2.0 चा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. दोन्ही फोन 12 5G बँडला सपोर्ट करतात. हे देखील वाचा: फक्त 451 रुपयांमध्ये तुमचा होईल Motorola चा जबरदस्त 5G स्मार्टफोन; बजेटमध्ये 50MP कॅमेरा

या दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Infinix Note 12 5G स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. तर Infinix Note 12 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो. सोबतीला दोन्ही डिवाइसमध्ये 2MP चा डेप्थ सेन्सर आणि एक AI कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. दोन्ही फोनमध्ये सेल्फीसाठी 16MP चा कॅमेरा मिळतो.

The post 17 हजारांत 108MP कॅमेरा असलेला फोन; स्वस्तात प्रीमियम फीचर्ससह Infinix Note 12 5G सीरीजची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-featured-infinix-note-12-5g-series-launched-in-india-check-specifications-price-and-sale-offers/feed/ 0