Infinix Note 7 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 06 Apr 2020 14:55:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 48MP क्वाड कॅमेरा सेटअप आणि पंच होल डिस्प्ले सह लॉन्च झाली Infinix Note 7 सीरीज https://www.91mobiles.com/marathi/infinix-unveiled-note-7-and-note-7-lite-smartphones-with-5000-mah-battery-48mp-quad-camera-know-full-specification/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-unveiled-note-7-and-note-7-lite-smartphones-with-5000-mah-battery-48mp-quad-camera-know-full-specification/#respond Mon, 06 Apr 2020 14:55:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7012 कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइट वर या सीरीज मध्ये Infinix Note 7 आणि Infinix Note 7 Lite सर्व स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट केला आहे.

The post 48MP क्वाड कॅमेरा सेटअप आणि पंच होल डिस्प्ले सह लॉन्च झाली Infinix Note 7 सीरीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने Infinix Note 7 सीरीज मध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइट वर या सीरीज मध्ये Infinix Note 7 आणि Infinix Note 7 Lite सर्व स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट केला आहे. पण या लिस्टिंग मध्ये किंमत आणि उपलब्धतेचा खुलासा केला नाही.

डिजाइन

दोन्ही फोन्सच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर Infinix Note 7 आणि Note 7 Lite मध्ये पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच इनफिनिक्स नोट 7 मध्ये L आकाराचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. नोट 7 लाइट मध्ये आयताकार क्वाड कॅमेरा सेटअप आहे. दोन्ही फोन मध्ये मोठी स्क्रीन, 48- मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा आणि मोठी बॅटरी मिळते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी दोन्ही फोन्स मध्ये देण्यात आलेल्या कॅमेर्याबाबत बोलायचे तर या दोन्ही स्मार्टफोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. इनफिनिक्स Note 7 आणि Note 7 लाइट मध्ये 48 मेगापिक्सलची प्राइमरी लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि एक लो-लाइट कॅमेरा लेंस देण्यात आली आहे. फ्रंट कॅमेरा मध्ये थोडा फरक आहे. नोट 7 मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि नोट 7 लाइट मध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Infinix Note 7 मध्ये L-शेप क्वाड कॅमेरा सेटअप आहे.
Infinix Note 7 मध्ये L-शेप क्वाड कॅमेरा सेटअप आहे.

बॅटरी

दोन्ही फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. नोट 7 स्मार्टफोन 18W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करतो आणि तर नोट 7 लाइट 10W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करतो. त्याचबरोबर कंपनीचा दावा आहे कि हा स्मार्टफोन सिंगल चार्ज मध्ये 4 दिवस चालू शकतो.

Infinix Note 7 चे स्पेसिफिकेशन्स

नोट 7 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.95-इंचाचा HD+ IPS LCD इनफिनिटी-O पॅनल देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 720 x 1,640 पिक्सल आणि आस्पेक्ट रेश्यो 20.5:9 आहे. तसेच फोन Helio G70 चिपसेट वर आधारित आहे. फोन मध्ये 6 जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

Infinix Note 7 Lite चे स्पेसिफिकेशन्स

नोट 7 लाइट मध्ये 6.6 इंचाचा IPS LCD इनफिनिटी-ओ डिस्प्ले मिळतो. या मॉडेल मध्ये 4 जीबी रॅम आणि Helio P22 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच डिवाइस मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.

The post 48MP क्वाड कॅमेरा सेटअप आणि पंच होल डिस्प्ले सह लॉन्च झाली Infinix Note 7 सीरीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-unveiled-note-7-and-note-7-lite-smartphones-with-5000-mah-battery-48mp-quad-camera-know-full-specification/feed/ 0