Infinix Note 8i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 23 Sep 2020 14:52:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4 जीबी रॅम, हीलियो जी70 आणि पंच-होल डिस्प्ले सह समोर आला Infinix Note 8i, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-8i-listed-on-google-play-console-helio-g70-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-8i-listed-on-google-play-console-helio-g70-4gb-ram/#respond Wed, 23 Sep 2020 14:52:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8280 कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनचे नाव Infinix Note 8i सांगण्यात आले आहे जो येत्या काही दिवसांत टेक मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

The post 4 जीबी रॅम, हीलियो जी70 आणि पंच-होल डिस्प्ले सह समोर आला Infinix Note 8i, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने अलिडकेच अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन Infinix Hot 10 सादर केला आहे जो 5200एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 6.78 इंचाच्या मोठ्या पंच-होल डिस्प्ले सह येतो. हा डिवाईस लॉन्च झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इनफिनिक्सच्या अजून एका नवीन फोनची माहिती समोर आली आहे जो गूगल प्ले कंसोल वर लिस्ट केला गेला आहे. कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनचे नाव Infinix Note 8i सांगण्यात आले आहे जो येत्या काही दिवसांत टेक मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

Infinix Note 8i

इनफिनिक्स नोट 8आय गूगल प्ले कंसोल वर Infinix-X683B मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या फोटो सोबतच याचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत. लिस्टिंग मध्ये समजले आहे कि इनफिनिक्सचा हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोटो मध्ये फोनची स्क्रीन बेजल लेस दाखवण्यात आली आहे ज्यात वरच्या बाजूला डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला होल देण्यात आला आहे.

लिस्टिंगनुसार हा फोन 720 x 1640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल ज्याची पिक्सल डेनसिटी 320DPI ची असेल. गूगल प्ले कंसोल वर हा फोन 4 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे जो अँड्रॉइड 10 ओएस सह मीडियाटेकच्या हीलियो जी70 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी52 जीपीयू असल्याचा खुलासा पण लिस्टिंग मध्ये झाला आहे.

Infinix Hot 10

इनफिनिक्स हॉट 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हा फोन 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या मोठ्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे.

Infinix Hot 10 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.0 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट आहे. कंपनीने हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमचा समावेश आहे. तसेच हे मॉडेल्स 64 जीबी मेमरी आणि 128 जीबी स्टोरेज सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स हॉट 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 16 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक एआई लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा इनफिनिक्स फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix Hot 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हॉट 10 मध्ये 5,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

The post 4 जीबी रॅम, हीलियो जी70 आणि पंच-होल डिस्प्ले सह समोर आला Infinix Note 8i, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-8i-listed-on-google-play-console-helio-g70-4gb-ram/feed/ 0