Infinix Zero 8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 13 Nov 2020 13:26:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6 कॅमेरा असलेला हा स्वस्त स्मार्टफोन होणार आहे भारतात लॉन्च, Xiaomi – Realme ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-8-series-launching-in-india-soon-with-dual-selfie-quad-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-8-series-launching-in-india-soon-with-dual-selfie-quad-rear-camera/#respond Fri, 13 Nov 2020 13:26:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8944 Infinix Zero 8 सीरीज इनफिनिक्स इंडियाने आपल्या ट्वीटर हँडल वर टीज केली आहे.

The post 6 कॅमेरा असलेला हा स्वस्त स्मार्टफोन होणार आहे भारतात लॉन्च, Xiaomi – Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix चे नाव स्वस्तात चांगले स्पेसिफिकेशन्स देणाऱ्या ब्रँड्स मध्ये येते. कंपनीने डुअल सेल्फी कॅमेरा असलेली स्मार्टफोन सीरीज टेक मंचावर सादर करत ‘झिरो 8’ सीरीज सादर केला होता, ज्या अंतर्गत इंडोनेशिया मध्ये Infinix Zero 8 आणि पाकिस्तान मध्ये Infinix Zero 8i स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. 6 कॅमेरा सेंसर्स असलेले हि स्मार्टफोन सीरीज आता भारतीय बाजारात पण एंट्री घेण्यासाठी तयार आहे. इनफिनिक्स इंडियाने अधिकृतपणे टीज केले आहे कि Infinix Zero 8 सीरीज आता भारतीय बाजारात पण लॉन्च होणार आहे.

Infinix Zero 8 सीरीज इनफिनिक्स इंडियाने आपल्या ट्वीटर हँडल वर टीज केली आहे. ट्वीटर वर कंपनीने फोनचे नाव आणि लॉन्च डेटची माहिती लिहिली नाही पण पोस्ट केलेल्या ट्वीटवर आलेल्या युजर्सच्या कमेंट्स मध्ये कंपनीने होकार दिला आहे कि इनफिनिक्स झिरो 8 सीरीज भारतात येत आहे. सीरीज अंतगर्त झिरो 8आय आणि झिरो 8 दोन्ही स्मार्टफोन लॉन्च होतील के कोणतातरी एक, याच्या ठोस माहितीसाठी कंपनीच्या पुढील अनाउंसमेंटची वाट बघितली जात आहे.

Infinix Zero 8

इनफिनिक्स झिरो 8 पाहता हा बेजल लेस डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. या फोन मध्ये 6.85 इंचाचा मोठा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आली आहे. इनफिनिक्सने आपल्या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट सह सादर केली आहे जो स्मूद विज्यूल क्वॉलिटी देतो. इनफिनिक्स झिरो 8 अँड्रॉइड 10 आधारित एक्सओएस 7 वर सादर केला गेला आहे तसेच प्रोसेसिंगसाठी 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी90टी चिपसेट देण्यात आला आहे. गेमिंग स्मूद करणे आणि हीटिंग पासून वाचवण्यासाठी फोन मल्टी-डायमनशनल लिक्विड कूल टेक्नोलॉजी सह येतो. तसेच ग्राफिकक्ससाठी एआरएम माली-जी76 जीपीयू आहे.

Infinix Zero 8 कंपनीने डुअल पंच-होल सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डायमंड शेप मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX696 सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, मॅक्रो सेंसर आणि बोका लेंस पण आहे. फोनचा रियर कॅमेरा पण 4के व्हिडीओ रिकॉर्डिंग सोबतच 960एफपीएस स्लो मोशन व्हिडीओ बनवू शकते. इनफिनिक्स झिरो 8 4,500एमएएचच्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Infinix Zero 8i

इनफिनिक्स झिरो 8आय चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. फोन मध्ये 6.85 इंचाचा मोठा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट वर चालतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्ले वर डावीकडे दोन होल आहेत त्यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे.

Infinix Zero 8i अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो एक्सओएस 7 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी90टी चिपसेट देण्यात आला आहे. गेमिंग स्मूद करण्यासाठी आणि हीटिंग प्रॉबल्म्स पासून वाचण्यासाठी इनफिनिक्स झिरो 8आय मल्टी-डायमनशनल लिक्विड कूल टेक्नोलॉजी सह येतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एआरएम माली-जी76 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 8आय स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डायमंड शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि एका एआय लेंसला सपोर्ट करतो. Infinix Zero 8i डुअल सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे जो स्क्रीन वरील पंच-होल मध्ये आहे. या सेटअप मध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आहे.

Infinix Zero 8i एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. पाकिस्तान मध्ये इनफिनिक्स झिरो 8आय 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

The post 6 कॅमेरा असलेला हा स्वस्त स्मार्टफोन होणार आहे भारतात लॉन्च, Xiaomi – Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-8-series-launching-in-india-soon-with-dual-selfie-quad-rear-camera/feed/ 0
6 कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला, 6.85 इंचाचा डिस्प्ले आणि 33वॉट 4,500एमएएच बॅटरी असलेला हा फोन https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-8i-launched-with-helio-g90t-dual-selfie-quad-camera-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-8i-launched-with-helio-g90t-dual-selfie-quad-camera-specs-price-sale/#respond Thu, 08 Oct 2020 13:01:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8436 Infinix Zero 8i अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो एक्सओएस 7 वर चालतो.

The post 6 कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला, 6.85 इंचाचा डिस्प्ले आणि 33वॉट 4,500एमएएच बॅटरी असलेला हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने ऑगस्ट मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Infinix Zero 8 स्मार्टफोन सादर केला होता. हा फोन इंडोनेशिया मध्ये लॉन्च झाला होता जो 64 एमपी रियर कॅमेरा आणि 48 एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो. मिडबजेट मध्ये लॉन्च झालेल्या झिरो 8 नंतर आता इनफिनिक्सने या फोनचा एक छोटा व्हर्जन Infinix Zero 8i नावाने टेक मंचावर आणला आहे. इनफिनिक्स झिरो 8आय सध्या शेजारच्या पाकिस्तान मध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये येईल.

Infinix Zero 8i

इनफिनिक्स झिरो 8आय चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. फोन मध्ये 6.85 इंचाचा मोठा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट वर चालतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्ले वर डावीकडे दोन होल आहेत त्यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे.

Infinix Zero 8i अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो एक्सओएस 7 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी90टी चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हाच चिपसेट Realme 6 आणि Redmi Note 8 Pro सारख्या फोन्स मध्ये आहे. गेमिंग स्मूद करण्यासाठी आणि हीटिंग प्रॉबल्म्स पासून वाचण्यासाठी इनफिनिक्स झिरो 8आय मल्टी-डायमनशनल लिक्विड कूल टेक्नोलॉजी सह येतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एआरएम माली-जी76 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 8आय स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डायमंड शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि एका एआय लेंसला सपोर्ट करतो. Infinix Zero 8i डुअल सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे जो स्क्रीन वरील पंच-होल मध्ये आहे. या सेटअप मध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आहे.

Infinix Zero 8i एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. पाकिस्तान मध्ये इनफिनिक्स झिरो 8आय 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची किंमत PKR 34,999 म्हणजे भारतीय करंसीनुसार 15,500 रुपये आहे.

The post 6 कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला, 6.85 इंचाचा डिस्प्ले आणि 33वॉट 4,500एमएएच बॅटरी असलेला हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-zero-8i-launched-with-helio-g90t-dual-selfie-quad-camera-specs-price-sale/feed/ 0