Internet Data.Lockdown - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 27 Mar 2020 16:17:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/#respond Fri, 27 Mar 2020 16:17:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6929 आज आम्ही तुम्हाला अश्या 7 टिप्स एंड ट्रिक्स सांगत आहोत ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या इंटरनेटचा वापर कमी करू शकता आणि डेटा जास्त काळ वापरू शकता.

The post कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coronavirus ने संपूर्ण भारताला थांबवले आहे. किंवा महामारीमुळे संपूर्ण भारत देश 21 दिवसांचा Lockdown सहन करत आहे जो 14 एप्रिलला संपेल. 91मोबाईल्सची पण अपील आहे कि तुम्ही तुमच्या घरात राहावे आणि कोरोनचा प्रभाव वाढू देऊ नका. आम्ही समजू शकतो कि पूर्ण दिवस घरी राहिल्यावर फक्त एक इंटरनेटच आहे जो तुमची सर्वात जास्त साथ देतो. इंटरनेटमुळे लोकांचा टाईमपास होत आहे. पण अनेक यूजर्स असे आहेत ज्यांचा इंटरनेट डेटा रात्रीपर्यंत संपतो. काही कंपन्या आपल्या प्लान्स मध्ये एफयूपी लिमिट पण देत आहेत, पण त्यात पण डेटा स्पीड खूप कमी होतो. तुमची हि समस्या लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला अश्या 7 टिप्स एंड ट्रिक्स सांगत आहोत ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या इंटरनेटचा वापर कमी करू शकता आणि डेटा जास्त काळ वापरू शकता.

1) ऑटो सिंक करा बंद

जेव्हा नवीन स्मार्टफोन घेता तेव्हा त्यात गूगल अकाउंटने लॉग-इन केली जाते. फोन मध्ये मेल आईडीच्या माध्यमातून सेटअप होतो आणि ऍप स्टोर ऍक्टिव्ह होतो. बऱ्याचदा लोक गूगल अकाउंट सेटअप केल्यावर मेलचा ऑटो सिंक ऑन करतात. ऑटो सिंकमुळे एखादा नवीन मेल आल्यावर नोटिफिकेशन्स येते. जर तुम्ही मेलचा जास्त वापर करत जरी नसला तरी पण बॅकग्राउंड मध्ये मेल इंटरनेटशी कनेक्टड असतो आणि सतत सिंक होत असतो. ऑटो सिंकमुळे फोनचा इंटरनेट डेटा पण सतत वापरला जातो. ऑटो सिंक टर्न ऑफ केल्यावर डेटाचा वापर कमी होईल.

2) WhatsApp मध्ये मीडिया ऑटो डाउनलोड करा ऑफ

आज देशात व्हाट्सऍपचा वापर सर्वात जास्त होतो. घरातील प्रत्येकाच्या फोन मध्ये हा मेसेंजिंग ऍप आहे. इतके ग्रुप असतात कि सारखी फोनची घंटी वाजत असते. बऱ्याचदा लोक WhatsApp मध्ये मीडिया ऑटो डाउनलोड ऑन ठेवतात. त्यामुळे एखादी नवीन ईमेज किंवा वीडियो फाईल व्हाट्सऍप वर आल्यावर आपोआप डाउनलोड होऊन फोन गॅलरी मध्ये सेव होतात. काही फाईल छोट्या तर काही मोठ्या असतात. सध्या तर Corona चे मेसेज धडाधड येत आहेत आणि ते डाउनलोड झाल्यावर डेटाचा वापर पण होतो. त्यामुळे जर व्हाट्सऍप वर मीडिया ऑटो डाउनलोड ऑफ केले तर इंटरनेट डेटा वाचेल.

3) ऍप करा बंद

फोन मध्ये गेम खेळात असताना काम आल्यावर होम बटण दाबून किंवा फोन लॉक करके तुम्ही तुम्ही काम करू लागता. इंटरनेट सर्फिंग, सोशल मीडिया ऍप किंवा कॅमेऱ्याच्या वापरानंतर पण अनेक लोक होम बटण दाबून ते बंद करतात. पण फक्त होम बटण दाबल्याने हे फंक्शन पूर्णपणे बंद होत नाहीत उलट बॅकग्रांउड मध्ये ऍक्टिव्ह राहतात आणि सतत बॅटरीचा वापर करतात. त्यामुळे कोणत्याही ऍप किंवा फीचरचा वापर केल्यावर ते बंद करा.

4) डेटा सेवर मोड येईल कामी

जवळपास सर्व ब्रँडसच्या स्मार्टफोन्स मध्ये डेटा सेवरचा ऑप्शन दिला जातो. फोन मधील ऍप्स द्वारा वापरला जाणारा डेटा कन्सम्प्शन मर्यादित करता यावा म्हणून हे फिचर दिलेले असते. हा मोड ऑन करून यूजर फोन मध्ये इंस्टाल्ड ऍपचा इंटरनेट वापर कमी करू शकतात. काही स्मार्टफोन्स मध्ये ‘लिमिट बॅकंग्राउंड डेटा यूज’ चा ऑप्शन पण असेल. हा ऑन केल्यावर ऍप्स द्वारे वापरला जाणारा इंटरनेट डेटा नियंत्रित केला जाऊ शकतो.

5) लोकेशन सर्विस करा बंद

जेव्हा एखादा नवीन ऍप फोन मध्ये इंस्टाल केला जातो तेव्हा त्यांना लोकेशनचा ऍक्सेस पण दिला जातो. फोन मध्ये अनेक असे ऍप्स असतात जे सतत लोकेशन ऍक्सेस करत असतात. हे ऍप्स सतत लोकेशन सर्विसशी कनेक्टेड असतात आणि यामुळे इंटरनेटचा पण सतत वापर होत असतो. ज्या ऍप्सची गरज नाही त्यांची लोकेशन सर्विस स्टॉप करा आणि आवश्यकता नसल्यास लोकेशन सर्विसच बंद करा. काही प्रमाणात इंटरनेट डेटाचा वापर कमी होईल.

6) ऑनलाईन कंटेंट ‘लो’ क्वॉलिटी वर वापरा

आधी गाणी ऐकण्यासाठी फोनच्या मेमरी मध्ये शेकडो गाणी सेव केली जात होती. पण सध्या गाणी ऐकण्यासाठी किंवा वीडियो बघण्यासाठी थेट Youtube उघडतात. त्यामुळे फक्त ऑडियो ऐकायचा असेल तर यूट्यूब मध्ये वीडियो क्वॉलिटी सर्वात कमी रेज्ल्यूशन वर ठेवा. त्याचप्रमाणे जर एखादी ऑडियो स्ट्रीमिंग ऍप वापरत असाल तर तुमची आवडती गाणी किंवा जी तुम्ही रोज ऐकता ती ऑफलाईन गॅलरी मध्ये सेव करण्याचा प्रयत्न करा. यामुळे इंटरनेट डेटाचा वापर कमी होईल.

7) फ्लाइट मोडची मदत घ्या

जर तुम्ही तुमच्या फोन मध्ये एखादा असा गेम खेळत असाल जो ऑनलाईन नेटवर्क वर चालत नाही किंवा फोन मध्ये डाउनलोडेड एखादा वीडियो बघत असाल आणि अश्यावेळी एखादा महत्वाचा कॉल किंवा मेसेज येणार नसेल तर तुम्ही काही काळासाठी फोन फ्लाइट मोड वर ठेवू शकता. या स्थितीत जीपीएस वर खर्च होणारा इंटरनेट डेटा पण वाचेल. विशेष म्हणजे फोन फ्लाइट मोड वर टाकल्यावर फोनची बॅटरी पण जास्त टिकेल.

The post कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/feed/ 0