iPhone 12 Pro Max - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 20 Nov 2020 13:24:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 20 लाख रुपयांचे 14 Apple iPhone 12 Pro Max घेऊन डिलिव्हरी बॉय झाला फरार, घेतली BMW कार https://www.91mobiles.com/marathi/china-delivery-boy-steals-14-apple-iphone-12-pro-max-units-of-worth-rs-20-lakh-hire-bmw/ https://www.91mobiles.com/marathi/china-delivery-boy-steals-14-apple-iphone-12-pro-max-units-of-worth-rs-20-lakh-hire-bmw/#respond Fri, 20 Nov 2020 13:24:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9024 एका डिलिव्हरी बॉयने फोन योग्य ठिकाणी पोहोचवण्याऐवजी, विकूनच टाकले. ते पण 1-2 नाही तर संपूर्ण 14 सर्वात लेटेस्ट आणि महाग iPhone 12 Pro Max.

The post 20 लाख रुपयांचे 14 Apple iPhone 12 Pro Max घेऊन डिलिव्हरी बॉय झाला फरार, घेतली BMW कार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हा डायलॉग तो अक्सर नेहमी ऐकायला मिळतो कि जे लोक Apple iPhone वापरतात ते लोक श्रीमंत असतात. कोणाकडे ऍप्पलचा लेटेस्ट आयफोन असेल तर त्याला स्टेट्स सिंबल म्हणून बघितले जाते. महाग आयफोन बाळगण्याचे अनेकांचे स्वप्न असते पण असा किस्सा पहिल्यांदा ऐकला असेल कि एका डिलिव्हरी बॉयने फोन योग्य ठिकाणी पोहोचवण्याऐवजी, विकूनच टाकले. ते पण 1-2 नाही तर संपूर्ण 14 सर्वात लेटेस्ट आणि महाग iPhone 12 Pro Max.

हा विचित्र हैराण करणारा किस्सा चीनचा आहे. सविस्तर सांगायचे झाले तर टँग नावाचा एक व्यक्ती ऍप्पलच्या डिलिव्हरी कंपनी मध्ये काम करत होता. टँगला Apple iPhone 12 Pro Max चे 14 यूनिट्स एका ऍप्पल स्टोर वरून दुसऱ्या ऍप्पल स्टोर वर डिलिव्हर करण्याचे काम मिळाले. टँग सांगितलेल्या वेळेवर ऍप्पल स्टोर वर पोहोचला आणि 14 आयफोन 12 प्रो मॅक्स फोन्स घेऊन दुसऱ्या स्टोरकडे निघाला. पण रस्त्यात टँगचा ईमान डगमगला आणि iPhone 12 Pro Max दुसऱ्या स्टोर वर डिलिव्हर कारण्याऐवजी तो फरार झाला.

मीडिया रिपोर्टनुसार त्या 14 आयफोन्सची किंमत 20 लाख 29 हजार रुपयांच्या आसपास होती. Apple iPhone 12 Pro Max चे यूनिट्स ऍप्पल स्टोर वर डिलिव्हर करण्याच्या ऐवजी टँगने ती ऑर्डर कॅन्सल केली त्यानंतर त्याला फक्त 113 रुपयांच्या आसपास दंड भरावा लागला. प्रकरण जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा टँगचा शोध सुरु झाला आणि काही दिवसानंतर चीनच्या पोलिसांनी त्याला पकडले.

उडवून टाकले पैसे

टँग जेव्हा पकडला गेला तेव्हा समजले कि त्याने 14 पैकी एक Apple iPhone 12 Pro Max स्वतःसाठी ठेवला आणि एक आयफोन 12 प्रो मॅक्स त्या मित्राला विकला ज्याच्याकडून त्याने काही पैसे उधार घेतले होते. एक आयफोन टँगने एका दुकानात गहाण ठेवला, ज्याच्या बदल्यात त्याला जवळपास 1,00,000 रुपये मिळाले. अश्याप्रकारे जवळपास 1,13,000 रुपयांच्या एक iPhone 12 Pro Max टँगने मोबाईल शॉप वर फक्त 79,999 रुपयांमध्ये विकला.

एकसाथ मिळालेले इतके पैसे सांभाळणे सर्वांना जमत नाही आणि हीच चूक टँगने केली. लाखो रुपये मिळवून टँगने शॉपिंग सुरु केली आणि महाग कपडे विकत घेतले. फक्त इतकेच नव्हे तर टँगने आपला शौक पूर्ण करण्यासाठी एक बीएमडब्ल्यू कार पण भाड्याने घेतली. अखेरीस जेव्हा पोलिसांनी पकडले तेव्हा टँग कडून 10 iPhone 12 Pro Max रिकवर करण्यात आले आणि तपास केल्यानंतर डिलिव्हरी बॉयला जेल मध्ये टाकण्यात आले.

अशी आहे Apple iPhone 12 Pro Max ची किंमत

ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्स भारतीय बाजारात तीन स्टोरेज मॉडेल्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस मॉडेल 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 1,29,900 रुपये आहे. तर आयफोन 12 प्रो मॅक्सचा 256GB स्टोरेज मॉडेल कंपनीने 1,39,900 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्सचा सर्वात मोठा मॉडेल 512GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 1,59,900 रुपये आहे. आयफोन 12 प्रो मॅक्स Silver, Graphite, Gold आणि Pacific Blue कलर मध्ये लॉन्च झाला आहे.

ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्स व्हिडीओ

The post 20 लाख रुपयांचे 14 Apple iPhone 12 Pro Max घेऊन डिलिव्हरी बॉय झाला फरार, घेतली BMW कार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/china-delivery-boy-steals-14-apple-iphone-12-pro-max-units-of-worth-rs-20-lakh-hire-bmw/feed/ 0