iQOO Neo 5 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 17 Mar 2021 13:31:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5G आणि 12GB रॅमसह iQOO Neo 5 ने घेतली एंट्री, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/vivo-iqoo-neo-5-5g-launched-12gb-ram-4400mah-battery-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-iqoo-neo-5-5g-launched-12gb-ram-4400mah-battery-price-specifications/#respond Wed, 17 Mar 2021 13:31:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10346 IQOO Neo 5 5G ब्लॅक, क्लाउड ब्लू आणि पिक्सेल ऑरेंज कलर ऑप्शन मध्ये पेश सादर करण्यात आला आहे.

The post 5G आणि 12GB रॅमसह iQOO Neo 5 ने घेतली एंट्री, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रीमियम स्मार्टफोन बनवणारा ब्रँड iQOO पुढल्या महिन्यात भारतात फ्लॅगशिप फोन iQOO 7 लॉन्च करू शकतो, ज्याची हिंट स्वतःहून कंपनीने दिली आहे. तसेच दुसरीकडे कंपनीने आपल्या गृह मार्केट चीन मध्ये नवीन मोबाईल iQOO Neo 5 5G लॉन्च केला आहे. वीवोच्या सब-ब्रँड आईक्यूने सादर केलेला हा फोन कंपनीने अनेक खास फीचर्ससह आणला आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन गेल्यावर्षी एप्रिल मध्ये लॉन्च झालेल्या iQoo Neo 3 5G स्मार्टफोनचा अपग्रेड वर्जन आहे.

iQOO 5 Neo 5G चा लुक
फोनची डिजाइन पाहता यात सिंगल सेल्फी कॅमेरा आहे, ज्यासाठी होल पंच कटआउट मध्यभागी देण्यात आला आहे. पंच-होलमुळे फोनच्या फ्रंटला तिन्ही कडा बेजललेस आहेत. तसेच, बॉटमला बारीक चिन पार्ट मिळतो. तसेच मागील लुक पाहता यात वर्टिकल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या सेटअपच्या खाली कंपनीची ब्रँडिंग आणि त्याखाली फोनचे नाव लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि पावर ऑन-ऑफ बटन आहे.

iQOO 5 Neo 5G चे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये 6.62-इंच (2400×1080 पिक्सल) फुल एचडी+ AMOLED 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेली स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच फोनचा डिस्प्ले HDR10+, 120Hz रिफ्रेश रेट, 105% NTSC कलर gamut, आणि 1,300 nits ब्राइटनेस सपोर्टसह काम करतो. तसेच, फोन ऑक्टा-कोर (1 x 3.2GHz + 3 x 2.42GHz + 4 x 1.8GHz Hexa) स्नॅपड्रॅगन 870 7nm मोबाईल प्लॅटफॉर्मची ताकद आहे. फोनमध्ये गेमिंगसाठी Adreno 650 GPU देण्यात आला आहे. तसेच डिवाइसमध्ये 8GB LPDDR5 रॅमसह 128GB (UFS 3.1) स्टोरेज आणि 8GB / 12GBLPDDR5 रॅमसह 256GB (UFS 3.1) स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे 48MP कॅमेरा IMX598 सेंसर, f/1.79 अपर्चर, एलईडी फ्लॅश आणि OIS सह येतो. तसेच फोनमध्ये f/2.2 अपर्चरसह 13MP चा 120° अल्ट्रा-वाइड सेंसर आणि f/2.4 अपर्चरसह 2MP मोनो सेंसर आहे. तसेच, वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये f/2.0 अपर्चरसह 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 66W सुपरफास्ट फ्लॅश चार्जसह 4,400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोनमध्ये यूएसबी टाइप-सी ऑडियो, स्टीरियो स्पीकर, हाई-फाई ऑडियो 5G SA / NSA, डुअल 4G VoLTE, वाई-फाई 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लूटूथ 5.1 आणि GPS / GLONASS, USB टाइप- C सारखे पर्याय आहेत.

किंमत
IQOO Neo 5 5G ब्लॅक, क्लाउड ब्लू आणि पिक्सेल ऑरेंज कलर ऑप्शन मध्ये पेश सादर करण्यात आला आहे. तसेच फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 2499 युआन (जवळपास 27,880 रुपये), 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 2699 युआन (जवळपास 30,110 रुपये) आणि हाई-एंड मॉडेल 12GB रॅम व 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 2999 युआन (जवळपास 33,455 रुपये) आहे.

The post 5G आणि 12GB रॅमसह iQOO Neo 5 ने घेतली एंट्री, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-iqoo-neo-5-5g-launched-12gb-ram-4400mah-battery-price-specifications/feed/ 0