iQOO U3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 14 Dec 2020 16:24:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला iQOO U3 स्मार्टफोन, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/iqoo-u3-with-dimensity-800u-launched-in-china-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-u3-with-dimensity-800u-launched-in-china-specs-price-sale/#respond Mon, 14 Dec 2020 16:24:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9302 iQOO U3 अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो आईक्यू युआय 1.5 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला iQOO U3 स्मार्टफोन, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO ने ऑक्टोबर मध्ये आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये iQOO U1X स्मार्टफोन लॉन्च केला होता जो लो बजेट सेग्मेंट मध्ये आला होता. हा फोन 5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच आज या सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवायस जोडत आईक्यूने iQOO U3 स्मार्टफोन पण सादर केला आहे. हा फोन पण सध्या चीनी बाजारात लॉन्च झाला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

iQOO U3

आईक्यू यू3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20.07:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2408 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ आयपीएस एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 401पीपीआई आणि एचडीआर 10 ला सपोर्ट करते तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. आईक्यू यू3 ने 90.61 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो सह मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे.

हे देखील वाचा : Vivo X60 5G सीरीज 29 डिसेंबरला होईल लॉन्च, Samsung चिपसेट वर करेल काम

iQOO U3 अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो आईक्यू युआय 1.5 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे. चीन मध्ये या फोनचा दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage ला सपोर्ट करतात.

फोटोग्राफीसाठी आईक्यू यू3 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी iQOO U3 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 4 जीबी रॅम असलेल्या OPPO A15s चा पोस्टर झाला लीक, Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी बजेट मध्ये होईल लॉन्च

iQOO U3 डुअल सिम फोन आहे जो वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट बटन देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी आईक्यू यू3 मध्ये 18वॉट डुअल इंजन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट व किंमत

iQOO U3 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 1498 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार रुपयांच्या आसपास आहे. तसेच फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 1698 युआन मध्ये बाजारात आला आहे जो इंडियन करंसीनुसार रुपयांच्या आसपास आहे. चीन मध्ये हा फोन Black आणि Glow Blue कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला iQOO U3 स्मार्टफोन, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-u3-with-dimensity-800u-launched-in-china-specs-price-sale/feed/ 0