iQOO U3x - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 Mar 2021 09:41:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्वस्त 5G फोन iQOO U3x झाला लॉन्च, यात आहे 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम https://www.91mobiles.com/marathi/iqoo-u3x-5g-launched-with-90hz-display-snapdragon-480-5000mah-battery-8gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-u3x-5g-launched-with-90hz-display-snapdragon-480-5000mah-battery-8gb-ram/#respond Mon, 22 Mar 2021 09:41:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10369 iQOO U3x 5G मध्ये मागे चौकोनी कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, ज्यात एलईडी फ्लॅशसह ड्यूल कॅमेरा सेटअप आहे.

The post स्वस्त 5G फोन iQOO U3x झाला लॉन्च, यात आहे 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO ने काही दिवसांपूर्वी आपल्या गृह मार्केट चीनमध्ये iQOO Neo 5 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता पुन्हा कंपनीने अजून एक नवीन फोन मार्केट मध्ये आणला आहे. हा नवीन फोन कंपनीने iQOO U3x 5G नावाने लॉन्च केला आहे. इतकेच नव्हे तर फोन 90Hz रिफ्रेश रेटसह येणारा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. सध्या हा हँडसेट फक्त चीनमध्ये लॉन्च केला गेला आहे. भारतात हा फोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे, पण ठोस माहिती समोर आली नाही. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 400 सीरीज 5G चिपसेटसह अनेक शानदार फीचर देण्यात आले आहेत.

iQOO U3x 5G चे फीचर्स
iQOO U3x 5G कंपनीने वॉटरड्रॉप नॉचसह 6.58-इंचाच्या IPS LCD स्क्रीन वर सादर करण्यात आला आहे जो Full HD+ रिजॉल्यूशन, 20.07:9 आस्पेक्ट रेशियो, 401ppi पिक्सल डेंसिटी आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच हँडसेटमध्ये देण्यात आलेल्या डिस्प्लेवर स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.61 टक्के आहे. फोनमध्ये 8जीबी पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 128जीबी पर्यंतची UFS 2.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन बजेट कॅटेगरीमध्ये सादर करण्यासाठी कंपनीने या फोनमध्ये 5G सपोर्ट असलेला स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला आहे.

iQOO U3x 5G चा दमदार कॅमेरा
फोटोग्राफीसाठी iQOO U3x 5G मध्ये मागे चौकोनी कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, ज्यात एलईडी फ्लॅशसह ड्यूल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेर्‍यासह एक 2 मेगापिक्सलची डेप्थ-ऑफ-फील्ड लेंस देण्यात आली आहे. तसेच फ्रंटला वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी नॉचमध्ये सिंगल सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे.

iQOO U3x 5G ची बॅटरी आणि कनेक्टिविटी
फोनला पावर देण्यासाठी यात 18 वॉटच्या फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा फोन एंडरॉयड 11 वर आधारित iQOO 1.0 वर काम करतो. तसेच फोनमध्ये कंपनी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये डुअल सिम, वाई-फाई 802.11ac, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-C देण्यात आले आहेत.

किंमत
iQOO U3x तीन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. या डिवाइसच्या 6 GB रॅम + 64 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,199 Yuan (जवळपास 13,300 रुपये), 4 GB रॅम + 128 GB स्टोरेज 1,199 Yuan (जवळपास 13,300 रुपये) आणि 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,499 Yuan (जवळपास 16,000 रुपये) आहे.

The post स्वस्त 5G फोन iQOO U3x झाला लॉन्च, यात आहे 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-u3x-5g-launched-with-90hz-display-snapdragon-480-5000mah-battery-8gb-ram/feed/ 0