iTel A46 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 26 Sep 2019 13:34:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 डुअल रियर कॅमेरा आणि फेस अनलॉक फीचर सह फक्त 4,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला itel A46 https://www.91mobiles.com/marathi/itel-a46-2gb-ram-32gb-storage-triple-rear-cameras-launched-india-price-4999-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/itel-a46-2gb-ram-32gb-storage-triple-rear-cameras-launched-india-price-4999-specifications/#respond Thu, 26 Sep 2019 13:34:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5425 itel A46 सोबत कंपनी Oraimo HD earphone पण फ्री मध्ये देत आहे.

The post डुअल रियर कॅमेरा आणि फेस अनलॉक फीचर सह फक्त 4,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला itel A46 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्वस्त स्मार्टफोन बनवणाऱ्या टेक कंपनी Itel ने इंडियन मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत आपला डिवाईस A46 अपडेट करून बाजारात आणला आहे. itel A46 ने बजेट सेग्मेंट मध्ये एंट्री घेतली आहे जो फक्त 4,999 रुपयांमध्ये बाजारात सेल साठी उपलब्ध होईल. नॉच लेस डिजाईन वर बनलेला itel A46 बजेट नुसार चांगला लुक देतो तसेच डुअल रियर कॅमेऱ्यासोबत फेस अनलॉक सारख्या फीचर्स सह येतो.

itel A46

itel A46 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन जुन्या डिजाईन वर सादर केला गेला आहे ज्यात डिस्प्लेच्या वर आणि खाली रुंद बॉडी पार्ट आहे. फोन मध्ये नॅरो साईड बेजल्स देण्यात आले आहेत तसेच खालच्या बॉडी पार्ट वर नेविगेशन की आहेत. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला बॉडी पार्ट वर सेल्फी कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट सह स्पीकर देण्यात आला आहे. कंपनीने itel A46 को 5.45 इंचाच्या आईपीएस फुलस्क्रीन एचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला आहे.

itel A46 इंडियन मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये उपलब्ध आहे. फोनचा एक वेरिएंट 2 जीबी रॅम सह 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये फोनची मेमरी माइक्रोएसडीने 128 जीबी पर्यंत वाढवता येईल. एंडरॉयड आपरेटिंग सिस्टम 9 पाई सह हा स्मार्टफोन 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता itel A46 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 8 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर itel A46 वीजीए सेकेंडरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो सॉफ्ट फ्लॅश लाईट सह येतो.

itel A46 बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी itel A46 मध्ये 2400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. itel A46 भारतात Dark Water, Gradation Diamond Gray, Fiery Red आणि Neon Watercolor मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे itel A46 सोबत कंपनी Oraimo HD earphone पण फ्री मध्ये देत आहे.

The post डुअल रियर कॅमेरा आणि फेस अनलॉक फीचर सह फक्त 4,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला itel A46 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/itel-a46-2gb-ram-32gb-storage-triple-rear-cameras-launched-india-price-4999-specifications/feed/ 0