itel Vision 1 PRO - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 18 Jan 2021 07:47:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 6,599 रुपयांमध्ये लाॅन्च झाला 4,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल कॅमेरा असलेला स्वस्त एंडराॅयड ‘गो’ फोन https://www.91mobiles.com/marathi/itel-vision-1-pro-with-android-go-launched-at-rs-6599-low-budget-phone-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/itel-vision-1-pro-with-android-go-launched-at-rs-6599-low-budget-phone-price-specs-sale-offer/#respond Mon, 18 Jan 2021 07:47:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9680 कंपनीने हा फोन itel Vision 1 PRO नावाने लाॅन्च केला गेला आहे जो 6,599 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

The post फक्त 6,599 रुपयांमध्ये लाॅन्च झाला 4,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल कॅमेरा असलेला स्वस्त एंडराॅयड ‘गो’ फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन मार्केटच्या लो सेग्मेंट मध्ये विस्तार करत टेक ब्रँड आईटेलने एक नवा आणि स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने हा फोन itel Vision 1 PRO नावाने लाॅन्च केला गेला आहे जो 6,599 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. आईटेलचा लो बजेट डिवाईस शानदार लुक आणि स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो जो एंट्री लेवल स्मार्टफोन्स म्हणून एक चांगला पर्याय आहे. आईटेल विजन 1 प्रो ऑनलाईन शाॅपिंग साइट्स सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

itel Vision 1 PRO

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता आईटेल विजन 1 प्रो 20ः9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ वाॅटरड्राॅप नाॅच डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. itel Vision 1 PRO चा डिस्प्ले 450निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बाॅडी रेशियो 89.5 टक्के डायमेंशन 166 *75.9* 8.5एमएम आहे.

आईटेलने आपला नवा स्मार्टफोन एंडराॅयड 10 ओएस वर सादर केला आहे जो ‘गो एडिशन’ वर चालतो. एंडराॅयड गो असल्यामुळे या फोन मध्ये गूगलच्या ‘गो’ म्हणजे लाइट सर्विसेज वापरता येतील ज्या कमी रॅम व स्टोरेज वर पण फास्ट प्रोसेस करतात तसेच इंटरनेटचा वापर पण कमी करतात. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 14 गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेला क्वाॅडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा फोन 2 जीबी रॅम मेमरी सह लाॅन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

itel Vision 1 PRO फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो जो फोनच्या वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 8 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर सेकेंडरी वीजीए सेंसर आणि अजून एक वीजीए लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी आईटेल विजन 1 प्रो स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतो.

आईटेल विजन 1 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत वीओवाईफाईला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. itel Vision 1 PRO 6,599 रुपयांमध्ये Aurora Blue आणि Ocean Blue कलर मध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 6,599 रुपयांमध्ये लाॅन्च झाला 4,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल कॅमेरा असलेला स्वस्त एंडराॅयड ‘गो’ फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/itel-vision-1-pro-with-android-go-launched-at-rs-6599-low-budget-phone-price-specs-sale-offer/feed/ 0