iVOOMi iPro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 20 Sep 2018 13:35:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला सर्वात स्वस्त शॅटरप्रूफ स्मार्टफोन, पडल्यावर पण तुटणार नाही याची स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-ipro-launched-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-ipro-launched-feature-specification-price-in-marathi/#respond Thu, 20 Sep 2018 13:35:48 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2199 आईवूमी आईप्रो कंपनी ने फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

The post फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला सर्वात स्वस्त शॅटरप्रूफ स्मार्टफोन, पडल्यावर पण तुटणार नाही याची स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने एक महिन्यापूर्वी एक्सक्लूसिव बातमी दिली होती की टेक कंपनी आईवूमी नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे जो इंडियन स्मार्टफोन बाजारातील सर्वात स्वस्त शॅटरप्रूफ स्मार्टफोन पैकी एक असेल. त्यानुसार आज आईवूमी ने आपला हा स्मार्टफोन समोर आणला आहे. कंपनी ने हा फोन आईवूमी आईप्रो नावाने लॉन्च केला आहे. आईवूमी आईप्रो कंपनी ने फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

आईवूमी आईप्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. फोन मध्ये 960 X 480 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 4.95-इंचाची एफडब्ल्यूवीजीए+ फुलव्यू स्क्रीन देण्यात आली आहे जी पूर्णपणे बटन लेस आहे. आईवूमी ने आपला फोन शॅटरप्रूफ बनवला आहे त्यामुळे हा फोन जमिनीवर पडला तरी फोनचा डिस्प्ले तुटणार नाही.

कंपनी ने या फोन मध्ये 1जीबी रॅम दिला आहे. फोनची इंटरनल स्टोरेज 8जीबी आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन स्मार्टमी 2.0 सह एंडरॉयड ओरियो च्या गो एडिशन सह सादर झाला आहे जो 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटीके6737 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक तसेच फ्रंट पॅनल वर दोन्ही बाजूला 5-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत.

आईवूमी आईप्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये ब्लूटूथ, वाईफाई व जीपीएस सारखे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी आईप्रो मध्ये 2,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. आईवूमी आईप्रो अॅप्पल आयफोन प्रमाणे एआर ईमोजी ला पण सपोर्ट करतो तसेच हा 3,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला सर्वात स्वस्त शॅटरप्रूफ स्मार्टफोन, पडल्यावर पण तुटणार नाही याची स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-ipro-launched-feature-specification-price-in-marathi/feed/ 0