Jio 4G offers - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 18 Jun 2018 05:48:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जियो कस्टमर जाणून घ्या कसा मिळवावा फक्त 299 रुपयांमध्ये 252 जीबी 4जी डाटा https://www.91mobiles.com/marathi/jio-is-giving-252-gb-4g-data-in-299-rs-for-84-days-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-is-giving-252-gb-4g-data-in-299-rs-for-84-days-in-marathi/#respond Mon, 18 Jun 2018 05:48:19 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=931 इंटरनेट बेनिफिट सह यूजर्सना 84 दिवसांसाठी अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉल पण मिळतात जे रोमिंग मध्ये पण वापरता येतात.

The post जियो कस्टमर जाणून घ्या कसा मिळवावा फक्त 299 रुपयांमध्ये 252 जीबी 4जी डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो भारतीय टेलीकॉम बाजारातील एकमेव अशी कंपनी आहे जी फक्त 4जी नेटवर्क वर आपली सर्विस देते. वेगाने वाढणार्‍या जियो कस्टमर पाहून इतर कंपन्यांनी पण जियोला टक्कर देण्यासाठी स्वस्त आणि आकर्षक प्लान्स सादर करत असतात. पण या स्पर्धेत टॉप वर राहत जियो ने आपल्या ग्राहकांसाठी अजून एक शानदार आॅफर काढली आहे. या आॅफर अंतर्गत जियो आपल्या कस्टमर्सना फक्त 299 रुपयांमध्ये 84 दिवसांसाठी 252 जीबी डाटा देत आहे.

रिलायंस जियो ने आपल्या प्लान्स अपडेट केले आहेत त्यामुळे कंपनी आपल्या यूजर्सना आधी पेक्षा दुप्पट डाटा देत आहे. या अपडेट नंतर फक्त 299 रुपयांमध्ये यूजर्सना एकूण 252 ​जीबी मिळत आहे. ज्या प्लान बद्दल आम्ही बोलत आहोत तो प्लान 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान मध्ये आधी रोज 1.5जीबी डाटा मिळत होता, पण अपडेट झाल्यानंतर आता या प्लान मध्ये रोज 3जीबी 4जी डाटा मिळेल.

जियो ग्राहकांना ज्या जागी संपूर्ण वॅलिडिटी पीरियड साठी एकूण 126जीबी डाटा मिळत होता त्या जागी आता यूजर्सना एकूण 252जीबी डाटा मिळेल जो 4जी स्पीड वर चालेल. इंटरनेट बेनिफिट सह यूजर्सना 84 दिवसांसाठी अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉल पण मिळतात जे रोमिंग मध्ये पण वापरता येतात. तसेच यूजर्सना रोज 100एसएमएस मिळतील. विशेष म्हणजे जियो चा हा प्लान आधी 399 रुपयांमध्ये येत असे, पण आता जियो या प्लान वर 100 रुपयांचा कॅशबॅक देत आहे ज्यामुळे याची किंमत 299 रुपये होईल.

माय जियो अॅप मधून रिचार्ज केल्यास यूजर्सना 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि या रिचार्ज चे पेमेंट फोनपे ने केल्यास फोनपे वॉलेट मध्ये पण 50 रुपये मिळतील. अशा प्रकारे यूजर्सना 399 रुपयांच्या रिचार्ज वर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि या प्लान ची किंमत 299 रुपये होईल. पण ही दुप्पट डाटा वाली आॅफर जियो कडून मर्यादित कालावधी साठी सादर करण्यात आली आहे. 30 जून आधी रिचार्ज करणार्‍या यूजर्सना 3जीबी प्रतिदिन डाटा चा लाभ मिळेल.

The post जियो कस्टमर जाणून घ्या कसा मिळवावा फक्त 299 रुपयांमध्ये 252 जीबी 4जी डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-is-giving-252-gb-4g-data-in-299-rs-for-84-days-in-marathi/feed/ 0