Jio Android SmartPhone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 23 Sep 2020 15:16:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 4,000 रुपयांमध्ये लॉन्च होईल Jio Android SmartPhone, अंबानींनी केली चाइनीज ब्रँड्सची सुट्टी करण्याची तयारी https://www.91mobiles.com/marathi/jio-android-smartphone-price-could-be-4000-mukesh-ambani-plan-200-million-unit-next-two-years/ https://www.91mobiles.com/marathi/jio-android-smartphone-price-could-be-4000-mukesh-ambani-plan-200-million-unit-next-two-years/#respond Wed, 23 Sep 2020 15:16:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8283 Jio SmartPhone संबंधित हि माहिती बिजनेस स्टॅंडर्डने पब्लिश केली आहे.

The post फक्त 4,000 रुपयांमध्ये लॉन्च होईल Jio Android SmartPhone, अंबानींनी केली चाइनीज ब्रँड्सची सुट्टी करण्याची तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने जेव्हा पासून घोषणा केली आहे कि कंपनी टेलीकॉम बाजार आणि फीचर फोन मार्केटच्या पुढे जात लो बजेट अँड्रॉइड स्मार्टफोन पण भारतात आणण्याची तयारी करत आहे. तेव्हापासून फक्त इंडियन यूजर्स या फोनची वाट बघत नाहीत तर इतर मोबाईल ब्रँड्स पण जियोच्या प्लानिंग वर नजर ठेऊन आहेत. जियोच्या या आगामी फोन बद्दल आज एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि मुकेश अंबानी या फोनचे प्रोडक्शन लवकरच सुरु करणार आहेत, असा पण खुलासा झाला आहे कि आगामी Jio SmartPhone ची किंमत 4,000 रुपयांच्या आसपास असेल.

Jio SmartPhone संबंधित हि माहिती बिजनेस स्टॅंडर्डने पब्लिश केली आहे. बिजनेस स्टॅंडर्डने सूत्रांच्या आधारवर माहिती दिली आहे कि रिलायंस जियोचे प्रमुख मुकेश अंबानी देशातील डोमेस्टिक असेंब्लर्सशी बोलणी करत आहेत, ज्यांच्यासोबत मिळून ते जियो स्मार्टफोनची निर्मिती करणार आहेत. तसेच दुसरीकडे अंबानींनी लोकल सप्लायर्सना पण आपल्या प्रोडक्शनची क्षमता वाढवण्यास सांगितले आहे.

रिपोर्टनुसार प्रोडक्शन क्षमता वाढवण्यास सांगितले आहे कारण ते पुढच्या दोन वर्षात देशात 200 मिलियन जियो अँड्रॉइड स्मार्टफोन्स निर्मित करू इच्छित आहेत. प्रकाशित बातमीनुसार Jio Android SmartPhone कंपनी द्वारे 4,000 रुपयांपर्यतच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. जियो स्मार्टफोन पृणपणे भारतीय असेल आणि हा मार्केट मध्ये आल्यावर Xiaomi आणि Realme सारख्या चीनी कंपन्यांना चांगली टक्कर मिळेल.

Jio SmartPhone

रिलायंस जियोच्या मुकेश अंबानींनी सांगितले होते कि कंपनी Google सोबत भागेदारी अंतर्गत नवीन अँड्रॉइड आधारित स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम बनवत आहे. पार्टनरशिपची घोषणा करत Mukesh Ambani ने सांगितले होते कि गूगलने रिलायंस जियो मध्ये 7.7 टक्के गुंतवणूक केली आहे. Jio मध्ये केलीली गुंतवणूक 33,737 कोटी रुपयांची आहे. तसेच ते म्हणाले होते कि गूगल आणि जियो मिळून देशात ‘डिजीटल इंडिया’ साठी काम करतील आणि भारतात 4जी व 5जी फोनची निर्मतीत करतील.

The post फक्त 4,000 रुपयांमध्ये लॉन्च होईल Jio Android SmartPhone, अंबानींनी केली चाइनीज ब्रँड्सची सुट्टी करण्याची तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-android-smartphone-price-could-be-4000-mukesh-ambani-plan-200-million-unit-next-two-years/feed/ 0