Jio Monsoon Hungama Offer - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 03 Aug 2018 10:06:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 रिलायंस जियो ची शानदार भेट, 15 ऑगस्ट पर्यंत विकत घेता येईल फक्त 501 रुपयांमध्ये जियोफोन https://www.91mobiles.com/marathi/reliance-jiophone-exchange-offer-for-rs-501-extended-august-15-details-terms-conditions-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jiophone-exchange-offer-for-rs-501-extended-august-15-details-terms-conditions-in-marathi/#respond Fri, 03 Aug 2018 10:06:30 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1552 विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रिसर्च फर्म काउंटर प्वाइंट ने एक रिपोर्ट सादर करून सांगितले होते की एकट्या जियोफोन ने देशातील 47 प्रतिशत फीचर फोन​ कवर करत रेकॉर्ड सेल केला आहे.

The post रिलायंस जियो ची शानदार भेट, 15 ऑगस्ट पर्यंत विकत घेता येईल फक्त 501 रुपयांमध्ये जियोफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ने आपल्या 4जी फीचर फोन ची सेकेंड जेनेरेशन सादर केली आहे. जियोफोन 2 सोबत कंपनी ने ही घोषणा पण केली होती की जियोफोन फक्त 501 रुपयांमध्ये एक्सचेंज आॅफर अंतर्गत विकत घेता येईल. ही आॅफर कंपनी ने ‘जियो मॉनसून हंगामा आॅफर’ नावाने सादर केली होती ज्यात कोणत्याही जुन्या फोनच्या बदल्यात फक्त 501 रुपये देऊन जियोफोन विकत घेता येऊ शकतो. जियो ने या आॅफर ची शेवटची तारीख 31 जुलै ठेवली होती. पण आता 91मोबाईल्सला बातमी मिळाली आहे की जियो ने या आॅफर ची शेवटची तारीख वाढवून 15 ऑगस्ट केली आहे.

रिलायंस जियो ने ‘जियो मॉनसून हंगामा आॅफर’ ची अंतिम तारीख 15 ऑगस्ट केली आहे. म्हणजे कोणीही आता 15 ऑगस्ट पर्यंत आपला कोणताही जुना फीचर फोन जियोस्टोर मध्ये देऊ शकतो आणि बदल्यात फक्त 501 रुपये देऊन नवीन 4जी फीचर फोन जियोफोन घेऊ शकतो. या आॅफर ची सुरवात 21 जुलै पासून झाली आहे तसेच यूजर रिलायंस जियो च्या वेबसाइट वर जाऊन एक्सचेंज आॅफर साठी रजिस्ट्रेशन करू शकते.

आता पर्यंत जियोफोन मध्ये 4जी स्पीड ने इंटरनेट तर वापरता येत आहे पण हा फोन देशात प्रसिद्ध असलेला व्हाट्सॅप वापरू देत नाही. परंतु जियोफोन 2 च्या लॉन्च सोबतच जियो ने ही पण घोषणा केली की आता जियोफोन मध्ये पण व्हाट्सॅप सपोर्ट येईल त्याचबरोबर या फोन मध्ये फेसबुक पण वापरता येईल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रिसर्च फर्म काउंटर प्वाइंट ने एक रिपोर्ट सादर करून सांगितले होते की एकट्या जियोफोन ने देशातील 47 प्रतिशत फीचर फोन​ कवर करत रेकॉर्ड सेल केला आहे. हा रिपोर्ट साल 2018 च्या दुसर्‍या तिमाहीचा होता. या लिस्ट मध्ये जियो नंतर सॅमसंग दुसर्‍या आणि नोकिया तिसर्‍या नंबर वर आली आहे. याच काळात सॅमसंग कडे 9 टक्के मार्केट शेयर आहे तर नोकिया चा मार्केट शेयर 7 टक्के आहे.

तुमच्याकडे एखादा जुना फीचर फोन असेल आणि तुम्हाला रिलायंस जियो चा 4जी फीचर फोन घ्यायचा असेल तर तुम्ही या जियो मॉनसून हंगामा आॅफर ची माहिती खाली दिलेल्या लिंक वरून वाचू शकता.
जियो मॉनसून हंगामा आॅफर

The post रिलायंस जियो ची शानदार भेट, 15 ऑगस्ट पर्यंत विकत घेता येईल फक्त 501 रुपयांमध्ये जियोफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jiophone-exchange-offer-for-rs-501-extended-august-15-details-terms-conditions-in-marathi/feed/ 0
जियो यूजर्स लक्ष्य द्या! जर 501 रुपयांमध्ये तुम्हाला घ्यायचा असेल जियोफोन, तर ही बातमी नक्की वाचा https://www.91mobiles.com/marathi/jio-monsoon-hungama-offer-exchange-feature-phone-with-jio-phone-at-rs-501-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-monsoon-hungama-offer-exchange-feature-phone-with-jio-phone-at-rs-501-in-marathi/#respond Wed, 18 Jul 2018 12:19:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1305 या आॅफर मध्ये जुना फीचर फोन देऊन जियोफोन मध्ये 4जी इंटरनेट सर्विस सोबतच व्हाट्सॅप व फेसबुक पण वापरता येईल.

The post जियो यूजर्स लक्ष्य द्या! जर 501 रुपयांमध्ये तुम्हाला घ्यायचा असेल जियोफोन, तर ही बातमी नक्की वाचा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जियो ने आपल्या लेटेस्ट मोबाईल फोन ‘जियोफोन 2’ सादर करून पुन्हा एकदा टेलीकॉम विश्वाला आणि मोबाईल बाजाराला हादरवून टाकले आहे. कंपनी ने या महिन्यात वार्षिक बैठकीत जियोफोन 2 सादर केला आहे. जियो ने या फोन ची किंमत 2,999 रुपये ठेवली आहे जो 15 ऑगस्ट पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल. फोन लॉन्च सोबत जियो ने आपल्या फॅन्स साठी ‘जियो मॉनसून हंगामा आॅफर’ ची घोषणा पण केली होती ज्या अंतर्गत कोणत्याही जुन्या फीचर फोन च्या बदल्यात जियोफोन विकत घेता येईल. लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे की जियो ची एक्सचेंज आॅफर कशी घेता येईल आणि कोणत्या फोनच्या बदल्यात नवीन आणि शानदार जियोफोन विकत घेता येईल. खाली आम्ही जियो ची ही स्कीम सविस्तर सांगितली आहे :

जियो मॉनसून हंगामा आॅफर

जियो ने सादर केलेली ही आॅफर आधीचा जियोफोन विकत घेण्याची संधी देते. या आॅफर ची सुरवात 21 जुलै पासून होत आहे. आॅफर सुरू होण्याआधी यूजर कंपनी च्या वेबसाइट वर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात. ​जियो मॉनसून हंगामा आॅफर बद्दल बोलायचे तर या आॅफर अंतर्गत जियो कोणत्याही जुन्या फीचर फोन च्या बदल्यात नवीन जियोफोन देत आहे. जुन्या फीचर फोन सोबतच यूजर्सना 501 रूपयांची प्रभावी किंमत द्यावी लागेल.

जियो कडून या आॅफर मध्ये कोणताही जुना फीचर फोन घेतला जात आहे. म्हणजे तुमच्या घरी जर कोणताही जुना फीचर फोन पडून असेल तर तुम्ही तो देऊन जियो चा लेटेस्ट 4जी फीचर फोन घेऊ शकता. या आॅफर मध्ये जुना फीचर फोन देऊन जियोफोन मध्ये 4जी इंटरनेट सर्विस सोबतच व्हाट्सॅप व फेसबुक पण वापरता येईल.

कोणते फोन करू शकता एक्सचेंज

1. ते सर्व फीचर फोन जे 1 जानेवारी 2015 नंतर विकत घेण्यात आले आहेत, ते जियो मॉनसून हंगामा आॅफर अंतर्गत नवीन जियोफोन सोबत एक्सचेंज करता येतील.

2. कोणताही 2जी, 3जी, 4जी किंवा नॉन वोएलटीई फोन देऊन जियो चा नवीन 4जी फीचरफोन घेता येईल.

3. ​नवीन जियोफोन साठी फक्त जीएसएम फोन चा एक्सचेंज केला जाऊ शकतो. जुना जियोफोन, सीडीएमए फोन किंवा आॅपरेटर लॉक्ड फोन एक्सचेंज करता येणार नाही.

4. एक्सचेंज केल्या जाणार्‍या फोन सोबत बॅटरी आणि चॉर्जर असणे आवश्यक आहे. हेडफोन किंवा इतर कोणतीही मोबाईल एक्सेसरीज नसली तरी चालेल.

या गोष्टींची काळजी घ्या

जर तुमच्याकडे असा फोन आहे जो वर सांगितलेल्या सर्व प्वाइंट्स पास करत असेल तर तुम्ही तुमचा जुना फोन जियो मॉनसून हंगामा आॅफर अंतर्गत नवीन जियोफोन सोबत एक्सचेंज करू शकतो. पण वरील पॉइंट्स सोबत इतर काही गोष्टींची पण काळजी घ्यावी. जसे की :

1. फोन वर्किंग कंडीशन मध्ये असावा. डिस्प्ले वर कोणताही डाग नसवा, क्रॅक नसवा, फोन ची बॉडी किंवा कवर तुटलेला नसवा, फोन वर टेप लागलेली नसावी तसेच फोन जळलेला नसवा.

2. फोन ची बॅटरी चालू स्थितीत असावी. बॅटरी फुगलेली नसावी तसेच बॅटरी वर कोणताही खड्डा नसवा.

3. फोन चा चार्जर चालू स्थितीत असावा. चार्जर ची वायर तुटलेली नसावी, चार्जर जळलेला नसवा तसेच चार्जर अॅडेप्टर डॅमेज नसवा.

वर सांगितलेल्या पॉइंट्स ​प्रमाणे जर तुमचा फोन असेल तर तुम्ही 21 जुलै पासून आपला जुना फीचर फोन बदलून नवीन 4जी फीचर फोन जियोफोन घेऊ शकता.

The post जियो यूजर्स लक्ष्य द्या! जर 501 रुपयांमध्ये तुम्हाला घ्यायचा असेल जियोफोन, तर ही बातमी नक्की वाचा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-monsoon-hungama-offer-exchange-feature-phone-with-jio-phone-at-rs-501-in-marathi/feed/ 0