Jio Oppo Monsoon Offer - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 29 Jun 2018 11:41:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जियो ओपो मॉनसून आॅफर, 198 रुपयांच्या रिचार्जवर 4,900 रुपयांचे बेनिफिट आणि 3.2टीबी डाटा पण https://www.91mobiles.com/marathi/jio-oppo-monsoon-offer-with-up-to-3-2tb-data-rs-4900-benefits-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-oppo-monsoon-offer-with-up-to-3-2tb-data-rs-4900-benefits-in-marathi/#respond Fri, 29 Jun 2018 11:41:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1109 जियो च्या या दोन्ही प्लॅन्स पैकी एक प्लान सलग 36 महीने वापरल्यास 36 महीने प्रति माह 50 रुपयांचा कॅशबॅक असे एकूण 1,800 रुपये परत मिळतील.

The post जियो ओपो मॉनसून आॅफर, 198 रुपयांच्या रिचार्जवर 4,900 रुपयांचे बेनिफिट आणि 3.2टीबी डाटा पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम विश्वातील दिग्गज कंपनी जियो ने आपल्या यूजर्स साठी नवीन आॅफर ची सुरवात केली आहे. रिलांयस जियो ने ही नवीन आॅफर ‘जियो ओपो मॉनसून आॅफर’ नावाने बाजारत आणली आहे. नावावरून समजले असेलच की ही आॅफर स्मार्टफोन ब्रांड ओपो सोबत सादर करण्यात आली आहे जी यूजर्सना 3.2टीबी 4जी इंटरनेट डाटा सह 4,900 रुपयांचे बेनिफिट देते.

जियो ओपो मॉनसून आॅफर नवीन ओपो स्मार्टफोन विकत घेतल्यास रिलांयस जियो ग्राहकांना मिळेल. नवीन तसेच जुन्या जियो यूजर्स या आॅफर मधील फायदे घेऊ शकतात. सर्वात आधी कॅशबॅक बद्दल बोलू, या आॅफर मध्ये एकूण 1,800 रुपयांच्या कॅशबॅक जियो यूजर्सना दिला जात आहे. हा कॅशबॅक जियो ग्राहकांना कॅशबॅक वाउचर च्या स्वरूपात मिळेल. 198 रुपये किंवा 299 रुपयांच्या प्लान ने रिचार्ज केल्यास प्रत्येक रिचार्ज वर 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

जियो च्या या दोन्ही प्लॅन्स पैकी एक प्लान सलग 36 महीने वापरल्यास 36 महीने प्रति माह 50 रुपयांचा कॅशबॅक असे एकूण 1,800 रुपये परत मिळतील. या कॅशबॅक सोबतच सुरवातीचे 13 महीने रिचार्ज केल्यावर कंपनी आपल्या यूजर्सना 600 रुपये जियो मनी क्रेडिट स्वरूपात देईल. हे 600 रुपयांचे जियो मनी क्रेडिट तीन वेळा यूजर्सना मिळेल जो 13व्या, 26व्या, आणि 39व्या महिन्यात मिळेल. अशा प्रकारे एकूण 1,800 रुपयांचे जियो मनी क्रेडिट कंपनी कडून दिला जाईल.

ओपो स्मार्टफोंस वर दिल्या जाणार्‍या या आॅफर मध्ये 1,800 रुपयांचा कॅशबॅक आणि 1,800 रुपयांच्या जियो मनी क्रेडिट सोबत यूजर्सना 1,300 रुपयांचे मेक माय ट्रिप डिस्काउंट वाउचर मिळतील. जियो ओपो मॉनसून आॅफर मिळवणार्‍या यूजर्सना हे सर्व मिळून 4,900 रुपयांचे फायदे मिळतील. त्याचबरोबर जियो यूजर्स ओपो फोन मध्ये 39 महीने 198 रुपयांचा रिचार्ज करतील त्यामुळे त्यांना रोज 1.5 जीबी डाटा मिळेल आणि 299 रुपयांचा प्लान घेतल्यास रोज 3जीबी डाटा मिळेल. 39 महीने रोज 3जीबी डाटा या हिशोबाने जियो ग्राहक 3.2टीबी डाटा चा लाभ घेऊ शकतील.

The post जियो ओपो मॉनसून आॅफर, 198 रुपयांच्या रिचार्जवर 4,900 रुपयांचे बेनिफिट आणि 3.2टीबी डाटा पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-oppo-monsoon-offer-with-up-to-3-2tb-data-rs-4900-benefits-in-marathi/feed/ 0