Jio Phone 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 16 Aug 2018 05:38:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आज होत आहे जियोफोन 2 ची विक्री, जाणून घ्या कुठून घेता येईल विकत https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-2-sale-to-start-from-16-august-at-12-noon-on-jio-official-website-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-2-sale-to-start-from-16-august-at-12-noon-on-jio-official-website-in-marathi/#respond Tue, 14 Aug 2018 13:18:31 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1705 जियोफोन 2 ओपन सेल मध्ये नाही तर फ्लॅश सेल मध्ये विकण्यात येईल. याचा पहिला फ्लॅश सेल 16 ऑगस्ट दुपारी 12 वाजता सुरू होईल.

The post आज होत आहे जियोफोन 2 ची विक्री, जाणून घ्या कुठून घेता येईल विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या वर्षी रिलायंस जियो ने आपला पहिला 4जी फीचर फोन सादर केला होता. जियोफोन नावाने उपलब्ध असलेल्या या फोन ने आता पर्यंत अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. काही दिवसांपूर्वी रिलायंस जियो चे मालक मुकेश अंबानी यांनी जियोफोन 2 ची घोषणा केली आहे की हा फोन 15 ऑगस्ट पासून प्री​-बुकिंग साठी येणार आहे. तर आज कंपनी ने प्रेस स्टेटमेंट देऊन आॅफिशियल केले आहे की 16 ऑगस्ट पासून जियोफोन 2 विकत घेता येईल.

जियोफोन 2 आपल्या पहिल्या वर्जन पेक्षा जितका एडवांस आहे त्याचप्रमाणे जियो पण हा फोन एडवांस पद्धतीने विकण्याचे प्लानिंग करत आहे. जियोफोन देशातील सर्व रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध झाला होता तर जियोफोन 2 कंपनी द्वारा ऑनलाइन विकला जात आहे. जियोफोन 2 चा सेल रिलायंस जियो च्या आॅफिशियल वेबसाइट जियो डॉट कॉम वर एक्सक्लूसिवली होईल.

जियोफोन 2 ओपन सेल मध्ये नाही तर फ्लॅश सेल मध्ये विकण्यात येईल. याचा पहिला फ्लॅश सेल 16 ऑगस्ट दुपारी 12 वाजता सुरू होईल. यूजर्स फक्त जियोडॉटकॉम वर जाऊन या फ्लॅश सेल मध्ये भाग घेऊ शकतात. फ्लॅश सेल वरून स्पष्ट होते की जियोफोन 2 चा लिमिटेड स्टॉक या सेल मध्ये उपलब्ध होईल आणि असे पण होऊ शकते 12 वाजता सेल सुरू होताच काही वेळातच जियोफोन 2 स्टॉक आउट होईल.

डिजाइन
पहिला जियोफोन अल्फान्यूमेरिक कीपॅड सह आला होता. तर नवीन जियोफोन 2 मध्ये तुम्हाला क्वर्टी कीपॅड मिळेल. म्हणजे टाइपिंग आता आधी पेक्षा सोप्पी होईल. फोनची बॉडी पॉलिकार्बोनेट प्लास्टिक ची आहे जी उघडता येते.

स्क्रीन
पण यावेळी स्क्रीन साइज मध्ये काही फरक दिसत नाही. जुन्या फोन प्रमाणे यात पण 2.4-इंचाची क्यूवीजीए स्क्रीन देण्यात अली आहे. फोन चे स्क्रीन रेजल्यूशन 240×320 पिक्सल आहे.

प्रोसेसर
कंपनी ने प्रोसेसर चा उल्लेख केला नाही पण गेल्यावर्षी घोषणा करण्यात आली होती की जियोफोन क्वालकॉम आणि स्प्रेडट्रम चिपसेट वर उपलब्ध होतील. यावेळी पण असेच काहीसे आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्वालकॉम आणि स्प्रेडट्रम चिपसेट असेल पण थोडे अपग्रेड केले जाऊ शकतात.

मेमरी
जियोफोन 2 मध्ये तुम्हाला 512 एमबी रॅम मिळेल तर इंटरनल मेमरी 4जीबी आहे. चांगली बाब म्हणजे यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 128जीबी चे माइक्रोएसडी कार्ड वापरू शकता.

आॅपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेयर

जियोफोन 2 काई ओएस ​वर सादर करण्यात आला आहे जो आधीपेक्षा जास्त सक्षम झाला आहे. फोन मध्ये तुम्हाला जियो चॅट, जियो मूवी आणि जियो म्यूजिक व्यतिरिक्त अनेक चांगले अॅप्स मिळतील. विशेष म्हणजे जियोफोन 2 मध्ये व्हाट्सॅप, फेसबुक आणि यूट्यूब मिळेल. इतकेच नव्हे तर गूगल मॅप्स पण वापरता येईल.

कॅमेरा
फोटोग्राफी साठी या फोन मध्ये वीजीए फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचा वापर तुम्ही वीडियो कॉल साठी पण करू शकता. तर रियर कॅमेरा 2—मेगापिक्सल चा आहे.

कनेक्टिविटी
जियोफोन 2 मध्ये यावेळी अजून एक मोठा बदल करण्यात आला आहे. पहिला जियोफोन सिंगल सिम होता तर यात डुअल सिम सपोर्ट आहे. तुम्ही दुसर्‍या स्लॉट मध्ये इतर कोणत्याही आॅपरेटर्सचे सिम वापरु शकता. तुम्हाला तर माहितीच आहे जियो फक्त 4जी सेवा देते त्यामुळे यात 4जी वोएलटीई सह वाईफाई सर्विस पण मिळेल.

अजून एक खास बाब म्हणजे या फोन मध्ये वोवाईफाई उपलब्ध आहे. म्हणजे वाईफाई नेटवर्क वर तुम्ही कॉलिंग करू शकाल. या सोबत ब्लूटूथ, जीपीएस आणि एनएफसी पण देण्यात आली आहे.

म्यू​जिक
जियोफोन 2 मध्ये लाउड मोनो स्पीकर देण्यात आला आहे. जे आवाजासाठी चांगले आहेत. त्याचबरोबर एफएम रेडियो पण मिळेल. फोन मध्ये म्यूजिक प्लेयर आहे आणि तुम्ही कार्ड किंवा फोन मेमरी मध्ये गाणी स्टोर करू शकता. तसेच यात वीडियो प्लेयर पण आहे.

बॅटरी
कंपनी ने हा 2,000 एमएएच च्या बॅटरी सह सादर केला आहे. सध्या स्मार्टफोन मध्ये 4,000 एमएएच वाली बॅटरी वापरली जाते त्यामुळे ही कमी वाटेल पण फीचर फोन मध्ये ही चांगला बॅकअप देऊ शकते.

किंमत
भारतात जियोफोन 2 ची किंमत 2,999 रुपये आहे आणि याची प्रीबुकिंग 15 ऑगस्ट पासून सुरू होईल. पण कंपनी ने फक्त किंमतीचा खुलासा केला आहे प्लान सांगितले नाहीत. मागच्या वेळी प्रमाणे नवीन फोनच्या प्लान ने जियो पुन्हा सर्वांना धक्का देऊ शकते आणि त्यामुळे लोक हा बुक करण्यास उद्युक्त होतील.

The post आज होत आहे जियोफोन 2 ची विक्री, जाणून घ्या कुठून घेता येईल विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-2-sale-to-start-from-16-august-at-12-noon-on-jio-official-website-in-marathi/feed/ 0