Jio Postpaid Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 14 Aug 2019 12:14:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 मुकेश अंबानींनी सादर केला Jio Postpaid Plus, जाणून घ्या याचे सर्व फायदे https://www.91mobiles.com/marathi/jio-postpaid-plus-fiber-plan-benefit-offer-india/ https://www.91mobiles.com/marathi/jio-postpaid-plus-fiber-plan-benefit-offer-india/#respond Wed, 14 Aug 2019 12:14:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5039 Jio Postpaid Plus मध्ये कंपनी कडून होम सोल्यूशन्स सर्विस दिली जाईल.

The post मुकेश अंबानींनी सादर केला Jio Postpaid Plus, जाणून घ्या याचे सर्व फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने त्या दिवशी आपल्या 42व्या ऍन्युल जनरल मीटिंग (AGM) च्या मंचावरून अनेक मोठ्या घोषणा केल्या ज्यात Jio Fiber आणि SetTop Box सारख्या सर्विसेजचा समावेश आहे. या सेवा सादर कारण्यासोबतच रिलायंस कंपनीने स्पेशल मोबिलिटी सर्विस Jio Postpaid Plus पण अधिकृतपणे घोषित केला आहे. आतापर्यंत Jio ने फक्त प्रीपेड व पोस्टपेड प्लान आणले होते तर आता पोस्टपेड प्लस द्वारे कंपनी आपल्या प्लान्स मध्ये नवीन सुरवात करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कि कंपनीच्या इतर प्लान्स पेक्षा काय वेगळेपणा आहे Jio Postpaid Plus मध्ये आणि काय मिळेल या प्लान मध्ये खास.

Jio Postpaid प्लान रिलायंस जियोचे सिम वापरणाऱ्या त्या ग्राहकांना मिळेल जे मासिक दराने पैसे देतात. तसेच कंपनीचा नवीन Jio Postpaid Plus प्लान कंपनी आपल्या सिम सोबत देत नाही. या प्लस सेवेचा लाभ जियो द्वारा Jio Fiber वर दिले जाईल. असे यूजर जे Jio Fiber वर प्लॅटिनम ग्रेड सर्विस व कंपनीच्या प्रोडक्ट एक्सपीरियंसचा लाभ घेऊ इच्छित आहेत त्यांना Jio Postpaid Plus ची सुविधा दिली जाईल.

Jio Postpaid Plus ची खासियत :

1. मुकेश अंबानींच्या मते Jio Postpaid Plus घेणाऱ्या यूजर्सना कंपनी कडून ‘डोर स्टेप’ सुविधा दिली जाईल. जियो कडून यूजर्सच्या घरी जाऊन सिम कार्ड पासून सिम सेटअप आणि कनेक्शन पर्यंतची सर्विस मोफत दिली जाईल.

2. Jio Postpaid Plus मध्ये डेटा आणि वॉयस सर्विस खूप शानदार मिळेल. या सर्विसचा वापर घरात आणि बाहेर प्रत्येक ठिकाणी करता येईल.

3. Jio Postpaid Plus कंपनी फॅमिली प्लान्स सह घेऊन येईल. म्हणजे एकाच प्लानचा वापर अनेक लोक करू शकतील. वोडाफोनच्या फॅमिली प्लान प्रमाणे एक नंबर वर क्रेडिट झालेला डेटा एकापेक्षा जास्त लोक वापरू शकतील.

4. या प्लान मध्ये कंपनी कडून खूप स्वस्तात इंटरनेशनल कॉलिंग पॅक दिला जाईल. Jio Postpaid Plus वरून अमेरिका आणि कॅनडा मध्ये फक्त 500 रुपयांमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल करता येतील.

5. Jio Postpaid Plus मध्ये कंपनी यूजर्सना त्यांचा फोन अपग्रेड करण्याची संधी मिळेल. बोलले जात आहे कि या प्लान मध्ये कंपनी जुना फोन बदलून नवीन फोन घेण्याची सुविधा पण देऊ शकते.

6. Jio Postpaid Plus मध्ये कंपनी कडून होम सोल्यूशन्स सर्विस दिली जाईल.

विशेष म्हणजे Reliance Jio जियोच्या तिसऱ्या वर्धापनदिनी येत्या 5 सेप्टेंबरला Jio Fiber सामान्य जनतेसाठी सादर केली जाईल. याच दिवशी कंपनी जियो फाइबरच्या टॅरिफ व प्लान्सचा खुलासा करेल आणि सोबतच Jio Postpaid Plus च्या किंमती पण समोर येतील. सर्व प्लान्स व टॅरिफ माय जियो डॉट कॉम सोबत माय जियो ऍप वर पण दिसतील.

The post मुकेश अंबानींनी सादर केला Jio Postpaid Plus, जाणून घ्या याचे सर्व फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-postpaid-plus-fiber-plan-benefit-offer-india/feed/ 0