JioFiber - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 11 May 2018 17:58:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जियोचा नवीन डाव : जियोफाइबर ची झाली सुरवात, फ्री मध्ये मिळत आहे 100 जीबी हाई स्पीड डाटा https://www.91mobiles.com/marathi/jiofiber-reliance-jio-100mbps-plans-1tb-free-data-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jiofiber-reliance-jio-100mbps-plans-1tb-free-data-in-marathi/#respond Mon, 07 May 2018 13:48:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=326 जियोफाइबर च्या सुरवातीलाच कंपनी आपल्या ग्राहकांना 1टीबी म्हणजे 100जीबी डाटा मोफत देत आहे ज्याचा वापर 100 एमबीपीएस च्या स्पीड वर करता येईल.

The post जियोचा नवीन डाव : जियोफाइबर ची झाली सुरवात, फ्री मध्ये मिळत आहे 100 जीबी हाई स्पीड डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ने इंडियन टेलीकॉम इंडस्ट्री मध्ये असे बदल केले आहेत, जे सामान्य जनतेच्या हिताचे आहेत. खुप वेळे साठी मोफत 4जी सर्विस देणे तसेच खुपच कमी टॅरिफ वर कंपनीच्या सेवा देणार्‍या जियो ने टेलीकॉम बाजारा सह जियोफोन च्या माध्यामातून मोबाईल बाजारात पण आपला जम बसवला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या एका रिपोर्ट मध्ये जियोफोन सर्वात जास्त विकला गेलेला फीचर फोन आहे असे सांगण्यात आले आहे. टेलीकॉम आणि मोबाईल जगा नंतर आता जियो ने ब्रॉडबँड क्षेत्रात पण आपला डाव सुरू केला आहे. आणि नेहमीप्रमाणे जियो चा हा डाव सामान्य लोकांसाठी भेट ठरत आहे. जियो ने ब्रॉडबँड सेवा ‘जियोफाइबर’ ची सुरवात केली आहे आणि कंपनी आपल्या कस्टमर्सना 1टीबी म्हणजे 1000 जीबी इंटरनेट डाटा फ्री देत आहे.

रिलायंस जियो ने ब्रॉडबँड सर्विस क्षेत्रात पाऊल टाकत आपल्या हाईस्पीड इंटरनेट सर्विस ‘जियोफाइबर’ ची सुरवात केली आहे. यासंदर्भात माहिती देत द हिंदू ने सांगितले की जियो ने हाई स्पीड फाइबर टू द होम (FTTH) ची सुरवात केली आहे. जियो ने हे ब्रॉडबँड कनेक्शन सध्यातरी कमर्शियल रुपात लॉन्च केले नाही फक्त काही निवडक सर्किल्स मध्ये ही सर्विस चालवण्यात येत आहे.

जियोफाइबर च्या सुरवातीलाच कंपनी आपल्या ग्राहकांना 100जीबी डाटा मोफत देत आहे ज्याचा वापर 100 एमबीपीएस च्या स्पीड वर करता येईल. फाइबर टू द होम प्लान मध्ये सुरवातीला 100 जीबी डाटा मिळेल. हा डाटा संपल्यावर जियो यूजर्सना एका महिन्यात 25 वेळा डाटा रिचार्ज करण्याचा आॅप्शन देईल आणि तेव्हा प्रत्येक वेळी कस्टमर 40जीबी डाटा पर्यंत चा रिचार्ज करता येईल. अशा प्रकारे ग्राहकांना 100 जीबी डाटा कंपनी कडून मिळेलच पण अतिरिक्त रिचार्ज करून मिळणारा डाटा पकडून एका महिन्यात 1,100 जीबी म्हणजे जवळपास 1 टीबी डाटा चा लाभ यूजर्स घेऊ शकतील.

​मीडिया रिपोर्ट नुसार जियोफाइबर चे ब्रॉडबँड कनेक्शन मिळवण्यासाठी यूजर्सना 4,500 रुपये सिक्योरिटी डिपॉजिट द्यावे लागेल. जियोफाइबर मध्ये मिळणारा कंपनी चा राउटर कोणत्याही टीवी सेटटॉप बॉक्स प्रमाणे वापरता येईल. जियो आपल्या अजून एका नवीन सर्विस इंटरनेट प्रोटोकॉल टेलीविजन (आईपीटीवी) वर पण काम करत आहे आणि ही नवीन सर्विस बाजारात आल्यानंतर जियोफाइबर टीवी शी जोडता येईल. अशी माहिती मिळाली आहे की वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत म्हणजे जुलै नंतर मुकेश अंबानी अधिकृतपणे जियोफाइबर देशात लॉन्च करू शकतात.

The post जियोचा नवीन डाव : जियोफाइबर ची झाली सुरवात, फ्री मध्ये मिळत आहे 100 जीबी हाई स्पीड डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jiofiber-reliance-jio-100mbps-plans-1tb-free-data-in-marathi/feed/ 0