JioMeet - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 10 Jun 2020 13:41:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 JioMeet ऍप वरून अश्याप्रकारे करा 100 लोकांना वीडियो कालिंग, बघा संपूर्ण पद्धत https://www.91mobiles.com/marathi/use-jiomeet-app-call-100-people-same-time-reliance-jio-video-conference-call-app-launch-in-lockdown/ https://www.91mobiles.com/marathi/use-jiomeet-app-call-100-people-same-time-reliance-jio-video-conference-call-app-launch-in-lockdown/#respond Fri, 01 May 2020 13:36:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7370 कंपनीने 100 लोकांशी एक साथ वीडियो कॉन्फ्रन्सिंग करण्यासाठी बिजनेस प्लानची माहिती दिली नाही. आशा आहे कि कंपनी काही दिवसांनी हि माहिती देईल.

The post JioMeet ऍप वरून अश्याप्रकारे करा 100 लोकांना वीडियो कालिंग, बघा संपूर्ण पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने आपला वीडियो कॉन्फ्रन्सिंग ऍप Jio Meet लॉन्च केला आहे. कंपनीने हा ऍप खासकरून Zoom सारख्या वीडियो कॉन्फ्रन्सिंग ऍपला आव्हान देण्यासाठी सादर केला आहे. कोरोना वायरसमुळे चालू असलेल्या लॉकडाउनमुळे घरातून काम करणाऱ्या लोकांचा वीडियो कॉलिंगचा वापर वाढला आहे. तसेच ऑफिस मध्ये पण वीडियो कॉन्फ्रन्सिंग केली जात आहे, ज्यात अनेक लोक एक साथ एकमेकांशी बोलत आहेत. त्यामुळे Jio Meet वीडियो कॉन्फ्रन्सिंग ऍपचे येणे चांगलेच आहे.

हा वीडियो कॉन्फ्रन्सिंग ऍप कंपनीने iOS आणि एंडरॉयड डिवाइससाठी उपलब्ध केला आहे. 91मोबाईलच्या टीमला दोन्ही प्लॅटफॉर्म वर हा ऍप डाउनलोड करता आला आहे. तसेच या ऍपच्या माध्यमातून वीडियो कॉल करण्यात यश पण आले आहे. गूगल प्ले स्टोर आणि ऍप्पल ऍप स्टोर व्यतिरिक्त मॅक ऍप स्टोर आणि माइक्रोसॉफ्टच्या विंडो मार्केटप्लेस वर पण हा ऍप सादर केला गेला आहे.

रिलायंसने जियोमीटचे दोन प्लान लॉन्च केले आहेत. फ्री प्लान मध्ये जास्तीत जास्त 5 यूजर एकावेळी वीडियो कॉन्फरन्स करू शकतात. तसेच कंपनीने याचा बिजनेस प्लान पण सादर केला आहे, ज्यात 100 यूजर्स एक साथ वीडियो कॉन्फ्रन्सिंग करू शकतात. या सर्विस वर ईमेल्स आणि ओटीपी आधारित लॉग इन मीटिंग्स होस्ट करता येतील.

अश्याप्रकारे करा 100 लोकांशी एक साथ वीडियो कॉल

-सर्वात आधी तुम्हाला तुमच्या एंडरॉयड किंवा आईओएस फोन मध्ये जियोमीट ऍप डाउनलोड करावा लागेल.

-त्यांनतर ऍप मध्ये मेल्स आणि ओटीपी आधारित लॉग-इन करावी लागेल. लॉग-इन मध्ये काही माहिती मागितली जाऊ शकते.

-साइन-इन केल्यानंतर तुम्ही लिंकच्या माध्यमातून या एक साथ 5 लोकांशी मोफत आणि 100 लोकांशी बिजनेस प्लान घेतल्यांनंतर कॉल करू शकतात.

नोट: वीडियो कॉन्फरन्स करण्यासाठी एका लिंकच्या मदतीने एक साथ 100 लोकांशी कॉल केला जाऊ शकतो. अजूनतरी कंपनीने 100 लोकांशी एक साथ वीडियो कॉन्फ्रन्सिंग करण्यासाठी बिजनेस प्लानची माहिती दिली नाही. आशा आहे कि कंपनी काही दिवसांनी हि माहिती देईल.

JioMeet चे खास फीचर

-यूजर कोणालाही एका कॉन्फरन्स लिंकच्या मदतीने इनवाइट करू शकतात.

-कॉन्फरन्समध्ये यूजर लाइव चॅट मेसेज करू शकतात.

-यूजर कॉल चालू असताना ऑडियो-वीडियो मोड मध्ये उत्तर देऊ शकतात.

-कॉलिंगची हिस्ट्री बघण्याचा पर्याय आहे.

-लो नेटवर्क झोन मध्ये पण चालेल जियोमीट.

The post JioMeet ऍप वरून अश्याप्रकारे करा 100 लोकांना वीडियो कालिंग, बघा संपूर्ण पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/use-jiomeet-app-call-100-people-same-time-reliance-jio-video-conference-call-app-launch-in-lockdown/feed/ 0