Jiophone 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 18 Nov 2020 13:55:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 JioPhone आता होईल अजून महाग, रिलायंस जियो वाढवणार आहे फोनची किंमत, एवढी असेल नवीन प्राइस https://www.91mobiles.com/marathi/reliance-4g-feature-phone-jio-phone-price-to-be-increased-by-rs-300-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-4g-feature-phone-jio-phone-price-to-be-increased-by-rs-300-in-india/#respond Wed, 18 Nov 2020 13:55:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8988 हैराणीची बाब म्हणजे आता विकला जाणारा JioPhone चा रिटेल बॉक्स पण आधी विकल्या जाणाऱ्या जियोफोनच्या बॉक्स पेक्षा वेगळा असेल.

The post JioPhone आता होईल अजून महाग, रिलायंस जियो वाढवणार आहे फोनची किंमत, एवढी असेल नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये Reliance Jio ने देशातील मोबाईल बाजारात क्रांती करत आपला 4G फीचर फोन JioPhone लॉन्च केला होता. हा फोन युजर्सना बंडल ऑफर सह उपलब्ध केला होता जो आतापर्यंत ग्राहकांना फक्त 699 रुपयांमध्ये मिळत होता. जियोफोन भारतीय युजर्सना इतका आवडला कि फीचर फोन्सच्या विक्रीत Jio Phone भारतच नव्हे तर जगातील टॉप सोल्ड फोन मध्ये समाविष्ट झाला होता. फोनची मागणी देशात अजूनही मोठ्याप्रमाणावर आहे, पण जियोफोन मिळवणे आता लोकांसाठी महाग होणार आहे.

91मोबाईल्सला बातमी मिळाली आहे कि JioPhone कंपनी स्टॉक मध्ये घेऊन येत आहे पण यावेळी हा फोन ग्राहकांना महागात विकला जाईल. प्राप्त माहितीनुसार Reliance Jio जियोफोनची किंमत 300 रुपयांनी वाढवण्याची योजना बनवत आहे. म्हणजे आतापर्यंत 699 रुपयांमध्ये मिळणारा हा 4जी फीचर फोन आता 999 रुपयांमध्ये विकला जाईल. कंपनीने पुन्हा दुकानांवर जियोफोनचा स्टॉक देण्यास सुरवात केली आहे आणि लवकरच नवीन किंमतीसह फोनच्या विक्रीची अधिकृत घोषणा होणार आहे.

हैराणीची बाब म्हणजे आता विकला जाणारा JioPhone चा रिटेल बॉक्स पण आधी विकल्या जाणाऱ्या जियोफोनच्या बॉक्स पेक्षा वेगळा असेल. वरील फोटो मध्ये नवीन जियोफोनचा बॉक्स दिसत आहे ज्यावर फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पण लिहिण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सुरवातीला जियोफोन स्प्रेडट्रम प्रोसेसर वर लॉन्च केला गेला होता तर नवीन JioPhone क्वॉलकॉमच्या चिपसेट वर काम करेल. जियो यावेळी नवीन जियोफोन प्लान पण अनाउंस करणार आहे ज्यात 125 रुपयांचा रिचार्ज पॅक पण असेल. या पॅक सह JioPhone ची किंमत युजर्सना 1,124 रुपये पडेल.

JioPhone

जियोफोनचे फीचर्स पाहता रिलायंस जियोच्या या फर्स्ट जेनरेशन 4G फीचर फोन मध्ये 240×320 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 2.4-इंचाचा क्यूडब्ल्यूवीजीए डिस्प्ले देण्यात आली आहे. आतापर्यंत फोन मध्ये 1.2 गीगाहर्ट्ज स्प्रेडट्रम SPRD 9820A/QC8905 डुअल कोर प्रोसेसर देण्यात आला होता तर आता जियोफोन मध्ये क्वॉलकॉम प्रोसेसर मिळेल. या डिवाइस मध्ये 512 एमबी रॅम आणि इनबिल्ट स्टोरेज 4 जीबी आहे. फोटोग्राफीसाठी मागे 2-मेगापिक्सलचा कॅमेरा आणि आणि फ्रंट पॅनल वर वीजीए कॅमेरा आहे. जियो फोनची बॅटरी 2000 एमएएचची आहे. कनेक्टिविटी फीचर मध्ये 4जी वीओएलटीई, ब्लूटूथ वी4.1, वाय-फाय, एनएफसी, एफएम रेडियो, जीपीएस आणि यूएसबी 2.0 चा सपोर्ट आहे.

रिलायंस जियोफोन व्हिडीओ

The post JioPhone आता होईल अजून महाग, रिलायंस जियो वाढवणार आहे फोनची किंमत, एवढी असेल नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-4g-feature-phone-jio-phone-price-to-be-increased-by-rs-300-in-india/feed/ 0
जियोफोन 3 ची माहिती आली समोर, बघा कसा असेल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-3-to-launch-in-june-with-5-inch-screen-and-64gb-memory-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-3-to-launch-in-june-with-5-inch-screen-and-64gb-memory-in-marathi/#respond Wed, 06 Feb 2019 10:37:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3559 यावेळी जियोफोन अंतर्गत फीचर फोन नव्हे तर स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी आहे.

The post जियोफोन 3 ची माहिती आली समोर, बघा कसा असेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वर्ष 2017 मध्ये मुकेश अंबानी यांच्या कंपनी रिलायंस ने भारतात आपला पहिला 4जी फीचर फोन सादर केला होता. कंपनी ने जियोफोन आणला होता. त्याच्या पुढल्या वर्षी 2018 मध्ये जियोफोन 2 सादर केला गेला. हे दोन्ही फोन खूप यशस्वी झाले. यावर्षी पण कंपनीने नवीन जियोफोनची तयारी करत आहे. आतापर्यंत याबद्दल कोणतीही खास माहिती समोर आली नाही पण काही दिवसांपूर्वी कंपनीच्या एका एक्जिक्यूटिव ने सांगितले होते कि कंपनी आता मोठी स्क्रीन असलेला फोन लॉन्च करू शकते. आज रिलायंस जियोफोन 3 बद्दल एक मोठा लीक समोर आला आहे ज्यात फोनच्या काही स्पेसिफिकेशन आणि फीचर्सचा खुलासा केला गेला आहे.

बीटेलबाइट द्वारा देण्यात आलेल्या माहितीनुसार रिलायंस जियोफोन 3 यावर्षी जून मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच खास बाब अशी कि कंपनीचा हा नवा फोन स्मार्ट इंटरफेस सह येईल. अर्थात यावेळी जियोफोन अंतर्गत फीचर फोन नव्हे तर स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी आहे.

रिपोर्ट मध्ये असा दावा केला गेला आहे कि जियोफोन 3 बद्दल एका रिलायंस एक्जिक्यूटिव ने सांगितले कि जियोफोन 3 ची किंमत 4,500 रुपयांच्या आसपास असेल. मागील दोन्ही फोन्सच्या तुलनेत नवीन फोनची किंमत खूप जास्त असेल.

दिल्या गेलेल्या माहितीनुसार जियोफोन 3 मध्ये 5—इंचाची स्क्रीन असेल. तसेच फोन मध्ये 2जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. तसेच मेमरी कार्ड सपोर्ट पण असेल. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे तर कंपनी हा 5—मेगापिक्सलच्या रियर आणि 2—मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करू शकते.

फोनची उपलब्धता पाहता जून मध्ये लॉन्च झाल्यानंतर रिलायंस जियोफोन 3 जुलै पर्यंत प्रीऑर्डर साठी येईल आणि ऑगस्टपर्यंत कंपनी हा उपलब्ध करू शकतो. हा स्मार्टफोन जियो स्टोर व्यतिरिक्त रिलायंस डिजिटल आणि जियो स्टोर वर सेल साठी येऊ शकतो.

The post जियोफोन 3 ची माहिती आली समोर, बघा कसा असेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-3-to-launch-in-june-with-5-inch-screen-and-64gb-memory-in-marathi/feed/ 0