kimbho - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 31 May 2018 06:06:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सिम नंतर बाबा रामदेव ने लॉन्च केला किंभो अॅप, आता स्वदेशी कंपनी देईल व्हाट्सॅपला टक्कर https://www.91mobiles.com/marathi/baba-ramdev-launches-kimbho-messaging-indian-app-to-counter-whatsapp-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/baba-ramdev-launches-kimbho-messaging-indian-app-to-counter-whatsapp-in-marathi/#respond Thu, 31 May 2018 06:06:18 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=700 विशेष म्हणजे अॅप लॉन्च च्या फक्त 24 तासांमध्ये हा गूगल प्ले स्टोर वरून 50 हजार पेक्षा जास्त वेळा डाउनलोड झाला होता.

The post सिम नंतर बाबा रामदेव ने लॉन्च केला किंभो अॅप, आता स्वदेशी कंपनी देईल व्हाट्सॅपला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एफएमसीजी सेग्मेंट मध्ये स्वदेशी चा नारा देऊन योग गुरू बाबा रामदेव ने अंतर्राष्ट्रीय कंपन्यांना आपली ताकद दाखवली आहे. तसेच आता असे वाटते आहे की बाबा आता टेक्नोलॉजी च्या जगात पण अंतर्राष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देण्याचा विचार करत आहेत. दोन दिवसांपूर्वी आम्ही बातमी दिली होती की बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली ने बीएसएनएल सोबत मिळून ‘पतंजली-बीएसएनएल स्वदेशी समृद्धि सिम’ सादर केला आहे. तसेच आता पुन्हा एकदा एक मोठी बातमी आहे. आता पतंजली ने व्हाट्सॅप मेसेंजर ला टक्कर देण्यासाठी ‘किंभो’ नावाने मेसेजिंग अॅप लॉन्च केला आहे. अॅप लॉन्च सह त्यांनी याची टॅगलाइन पण सादर केली आहे. ज्यात त्यांनी “अब भारत बोलेगा” ची स्लोगन दिली आहे.

पण पतंजली सिम सध्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. तर या अॅप चा वापर कोणीही करू शकतो. किंभो अॅप गूगल प्ले स्टोर वर लिस्ट करण्यात आला आहे. तिथून हा तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.

विशेष म्हणजे अॅप लॉन्च च्या फक्त 24 तासांमध्ये हा गूगल प्ले स्टोर वरून 50 हजार पेक्षा जास्त वेळा डाउनलोड झाला होता. या मेसेंजर अॅप चा लोगो पण मोठया प्रमाणात व्हाट्सॅप सारखा आहे. पण यात व्हाट्सॅप सारखे फीचर्स नाहीत परंतु इंस्टेंट मेसेजिंग चा लाभ घेता येतो. चांगली बाब म्हणजे तुम्ही मेसेज सह वीडियो, फोटो, गूगल लोकेशन, कॉन्टॅक्ट इत्यादी शेयर करू शकता.

विशेष म्हणजे या आधी बाबा रामदेव ने बीएसएनएल पतंजली सिम सादर केला होता ज्या अंतर्गत यूजर्सना सिम सोबत 5 लाख रुपयांचा जीवन विमा आणि 2.5 लाख रुपयांचा स्वास्थ्य विमा कवर पण दिला जात आहे. तसेच पतंजली सिम वापरणाऱ्या ग्राहकांना पतंजली ब्रँड चे कोणतेही सामान विकत घेताना 10 टक्क्यांची अतिरिक्त सूट पण मिळेल.

पतंजली च्या या नव्या सिम ला बीएसएनएल च्या 144 रुपयांच्या प्लान सह सादर करण्यात आले आहे ज्याला बीएसएनएल पतंजली प्लान असे नाव देण्यात आले आहे. हा प्लान 30 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. यात यूजर्सना 2जीबी इंटरनेट डाटा मिळेल. तसेच संपूर्ण देशात अनलिमिटेड वॉयस कॉल मिळतील. तसेच प्लान मध्ये 100 एसएमएस पण देण्यात आले आहेत.

ज्या ग्राहकांना जास्त वॅलिडिटी चे प्लान्स हवे आहेत त्यांच्यासाठी पण 792 रुपये आणि 1584 रुपयांचे प्लान पण सादर करण्यात आले आहेत जे क्रमश: 180 दिवसांच्या तसेच 365 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतात. ।

विशेष म्हणजे सध्या पतंजली आणि बीएसएनएल ची ही नवीन सिम सेवा फक्त पतंजली च्या कर्मचारी आणि इतर अधिकार्‍यांना देण्यात आली आहे जी आगमी काही दिवसांमध्ये सामन्य जनतेसाठी बाजारात येईल.

The post सिम नंतर बाबा रामदेव ने लॉन्च केला किंभो अॅप, आता स्वदेशी कंपनी देईल व्हाट्सॅपला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/baba-ramdev-launches-kimbho-messaging-indian-app-to-counter-whatsapp-in-marathi/feed/ 0