LAVA MyZ - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 07 Jan 2021 12:23:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह फक्त 9,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला हा शानदार ‘इंडियन’ फोन https://www.91mobiles.com/marathi/lava-z4-z6-launched-with-lava-z-customizable-smartphone-know-specs-price-full-details/ https://www.91mobiles.com/marathi/lava-z4-z6-launched-with-lava-z-customizable-smartphone-know-specs-price-full-details/#respond Thu, 07 Jan 2021 12:23:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9571 चीनी ब्रँड्सना टक्कर देत भारतीय बाजारात एक साथ चार नवीन स्मार्टफोन लाॅन्च केले आहेत. कंपनीने LAVA Z1, LAVA Z2, LAVA Z4 आणि LAVA Z6 भारतीय बाजारात आणले आहेत जे कमी किंमतीत चांगल्या स्पेसिफिकेशन्स सह येतात.

The post 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह फक्त 9,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला हा शानदार ‘इंडियन’ फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LAVA ने आज Xiaomi आणि Realme सारख्या चीनी ब्रँड्सना टक्कर देत भारतीय बाजारात एक साथ चार नवीन स्मार्टफोन लाॅन्च केले आहेत. कंपनीने LAVA Z1, LAVA Z2, LAVA Z4 आणि LAVA Z6 भारतीय बाजारात आणले आहेत जे कमी किंमतीत चांगल्या स्पेसिफिकेशन्स सह येतात. नवीन स्मार्टफोन्स सोबतच लावा ने LAVA MyZ पण सादर केला आहे ज्याच्या अंतर्गत मोबाईल ग्राहक आपल्या वापरानुसार स्वतःचा स्मार्टफोन कस्टमाइज करू शकतात. लावा जेड4 आणि लावा जेड6 ची माहिती आम्ही पुढे दिली आहे.

असे आहेत स्पेसिफिकेशन्स

LAVA Z4 आणि LAVA Z6 हे दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीने 6.5 इंचाच्या एचडी+ वाॅटरड्राॅप नाॅच डिस्प्ले वर लाॅन्च केले आहेत जे कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. फोनला सुरक्षा आणि मजबूती देण्यासाठी लावाने आपले फोन ‘मिलिट्री ग्रेड’ सर्टिफाइड केले आहेत त्यामुळे फोन पडल्यावर पण तुटत नाही.

लावाचे हे स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर लाॅन्च केले गेले आहेत तसेच प्रोसेसिंगसाठी या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. LAVA Z4 4 जीबी रॅम वर लाॅन्च केला गेला आहे तर LAVA Z6 ने 6 जीबी रॅम सह मार्केट मध्ये आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LAVA Z4 आणि LAVA Z6 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्यासोबतच 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन्स मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

लावा जेड4 आणि लावा जेड6 दोन्ही डुअल सिम फोन आहेत जे 4जी वोएलटीईला सपोर्ट करतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हे दोन्ही स्मार्टफोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतात. LAVA Z4 कंपनीने 8,999 रुपयांमध्ये लाॅन्च केला आहे तर LAVA Z6 ची किंमत 9,999 रुपये आहे.

The post 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह फक्त 9,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला हा शानदार ‘इंडियन’ फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-z4-z6-launched-with-lava-z-customizable-smartphone-know-specs-price-full-details/feed/ 0