LAVA Z66 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 31 Jul 2020 09:59:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 7,899 रुपयांमध्ये लॉन्च झाला Made in India फोन LAVA Z66, चीनी ब्रँड्सना देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/made-in-india-phone-lava-z66-launched-sale-on-flipkart-india-at-rs-7899/ https://www.91mobiles.com/marathi/made-in-india-phone-lava-z66-launched-sale-on-flipkart-india-at-rs-7899/#respond Fri, 31 Jul 2020 09:59:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7725 LAVA Z66 डिस्प्ले 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे

The post फक्त 7,899 रुपयांमध्ये लॉन्च झाला Made in India फोन LAVA Z66, चीनी ब्रँड्सना देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय टेक कंपनी लावाने या महिन्याच्या सुरवातीला एक लो बजेट स्मार्टफोन Lava Z61 Pro इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला होता. हा फोन 5,774 रुपयांमध्ये विक्री साठी उपलब्ध आहे. गेल्या महिन्यात लावाचा एक नवीन फोन बेंचमार्किग साइट वर लिस्ट झाला होता, ज्याचे नाव झेड66 सांगण्यात आले होते. आता लावाने गुपचुप आपला हा फोन भारतीय बाजारात विक्रीसाठी आणला आहे. LAVA Z66 स्मार्टफोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर फक्त 7,899 रुपयांमध्ये विक्री साठी उपलब्ध झाला आहे.

LAVA Z66 ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी लिस्ट केला गेला आहे. कंपनीने फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे जो 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 7,899 रुपये आहे. फ्लिपकार्ट वर LAVA Z66 दोन कलर ऑप्शन मध्ये लिस्ट झाला आहे ज्यात Midnight Blue आणि Berry Red कलरचा समावेश आहे. लावा झेड66 चा रेड कलर मॉडेल खरेदीसाठी उपलब्ध आहे पण ब्लू कलर सध्या स्टॉक दाखवत आहे.

LAVA Z66

लावा झेड66 ‘मेड इन इंडिया’ फोन आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता कंपनीने हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.08 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. LAVA Z66 डिस्प्ले 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे.

LAVA Z66 एंडरॉयड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर Unisoc प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लावा झेड66 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबतच 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर उपलब्द आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी लावा झेड66 फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

लावा झेड66 एक डुअल सिम फोन आहे ज्यात 128 जीबी पर्यंतचा माइक्रोएसडी कार्ड वापरता येतो. 4जी वोएलटीई व अइतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी LAVA Z66 मध्ये 3,950एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. लावा झेड66 फ्लिपकार्ट वर 7,899 रुपयांमध्ये विक्री साठी उपलब्ध आहे.

The post फक्त 7,899 रुपयांमध्ये लॉन्च झाला Made in India फोन LAVA Z66, चीनी ब्रँड्सना देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/made-in-india-phone-lava-z66-launched-sale-on-flipkart-india-at-rs-7899/feed/ 0