Lenovo 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 23 Nov 2018 07:36:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग आणि हुआवई नंतर आता लेनोवो घेऊन येत आहे 3 रियर कॅमेरे असलेला फोन, असेल 5जी सपोर्ट https://www.91mobiles.com/marathi/lenovo-tripal-camera-phone-listed-on-teena-with-6-2-inch-screen-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-tripal-camera-phone-listed-on-teena-with-6-2-inch-screen-in-marathi/#respond Fri, 23 Nov 2018 07:36:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2958 फोनची स्पेसिफिकेशन आणि डिजाइन बघून वाटते आहे कि हा कंपनीचा फ्लॅगशिप फोन असू शकतो.

The post सॅमसंग आणि हुआवई नंतर आता लेनोवो घेऊन येत आहे 3 रियर कॅमेरे असलेला फोन, असेल 5जी सपोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई ने गेल्यावर्षी तीन कॅमेरे असलेला फोन सादर केला होता. तर यावर्षी सॅमसंग ने पण याची सुरवात केली आहे. कंपनी ने गॅलेक्सी एस7 2018 सादर केला आहे ज्यात हे 3 कॅमेरे उपलब्ध आहेत. तर या यादीत आता नवीन नाव लेनोवोचे येणार आहे. कंपनी लवकरच तीन कॅमेरे असलेला दमदार फोन सादर करू शकते. हा फोन आज चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट झाला आहे. तिथून फोनच्या लुक आणि स्पेसिफिकेशनची काही माहिती मिळाली आहे. फोनची स्पेसिफिकेशन आणि डिजाइन बघून वाटते आहे कि हा कंपनीचा फ्लॅगशिप फोन असू शकतो.

टेना वर हा फोन लेनोवो एल78071 नावाने लिस्ट करण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनुसार या फोनचे डायमेंशन 156.7×74.5×7.8(mm) असेल. त्याचबरोबर कंपनी हा मोठी स्क्रीन आणि नॉच सह सादर करू शकते. फोन मध्ये 6.2 इंचाचा डिस्प्ले आहे. रेजल्यूशनची माहिती मिळाली नाही पण छोटाशी वॉटर ड्रॉप नॉच सहज दिसते. तसेच नॉचच्या आत एक सेल्फी कॅमेरा आहे आणि वरच्या बाजूला लाउडस्पीकर आहे. फोन मध्ये फूल व्यू डिस्प्ले देण्यात आला आहे.

इतर स्पेसिफिकेशन पाहता लेनोवो एल78071 एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम वर आधारित आहे आणि यात 3210 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कंपनी ने स्पष्टपणे डुअल स्टँडबायचा उल्लेख केला आहे ज्यावरून समजते कि फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे. तसेच 3जी आणि 4जी सपोर्ट पण आहे.

फोन बद्दल सध्यातरी जास्त माहिती नाही पण नुकतीच बातमी आली होती कि लेनोवो आपला फ्लॅगशिप फोन सादर करणार आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 8150 म्हणजेच स्नॅपड्रॅगॉन 855 वर आधारित असेल. काही दिवसांपूर्वी असा दावा करण्यात आला होता कि हा फोन जागातील पहिला 5जी फोन असू शकतो. त्यामुळे अशा आहे कि लेनोवोच्या या फ्लॅगशिप फोन मध्ये अनेक चांगले फीचर्स असतील.

The post सॅमसंग आणि हुआवई नंतर आता लेनोवो घेऊन येत आहे 3 रियर कॅमेरे असलेला फोन, असेल 5जी सपोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-tripal-camera-phone-listed-on-teena-with-6-2-inch-screen-in-marathi/feed/ 0