Lenovo L38031 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 01 Aug 2018 09:15:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लेनोवो घेऊन येत आहे 4 कॅमेरा वाला फोन, कमी किंमतीत लॉन्च होऊन शाओमी रेडमी नोट 5 देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/lenovo-l38031-listed-on-tenna-with-four-camera-full-specification-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-l38031-listed-on-tenna-with-four-camera-full-specification-feature-in-marathi/#respond Wed, 01 Aug 2018 09:15:06 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1486 टेना ने शेयर केलेला लेनोवो स्मार्टफोन चा फोटो पाहता याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

The post लेनोवो घेऊन येत आहे 4 कॅमेरा वाला फोन, कमी किंमतीत लॉन्च होऊन शाओमी रेडमी नोट 5 देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी हुआवई ने गेल्या आठवड्यात भारतात आपली नोवा स्मार्टफोन सीरीज सादर करत दोन असे शानदार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, जे 4 कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतात. हुआवई नोवा 3 34,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे तर नोवा 3आई 20,990 रुपयांमध्ये आला आहे. आता टेक विश्वातली दिग्गज कंपनी लेनोवो पण लवकरच असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे ज्यात 4 कॅमेरा सेंसर असतील. लेनोवो चा हा आगामी स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट करण्यात आला आहे.

लेनोवो चा हा आगामी स्मार्टफोन टेना वर एल38031 मॉडल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे की लेनोवो पण 4 कॅमेरा सेंसर असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे ज्याच्या रियर पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप असेलच सोबत फ्रंट पॅनल वर पण 2 सेल्फी कॅमेरा मिळतील. या लिस्टिंग मध्ये चारही कॅमेरा सेंसर ची पावर सांगण्यात आली नाही पण टेना ने सांगितले आहे की यातील एक कॅमेरा 13-मेगापिक्सल चा असेल. दोन्ही पॅनल वर कॅमेरा सेटअप हॉरिजेंटल शेप मध्ये असतील.

लेनोवो एल38031 चे अन्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार हा फोन 720 × 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.7-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात येईल. फोन मध्ये फुलव्यू बेजल लेस स्क्रीन असेल ज्यात नॉच दिली जाणार नाही. लिस्टिंग नुसार हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह सादर होईल तसेच हा 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. टेना ने या फोन मध्ये मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

लिस्टिंग नुसार लेनोवो आपल्या या स्मार्टफोन ला 3 वेरिएंट मध्ये सादर करू शकते. या वेरिएंट्स मध्ये 2जीबी रॅम सोबत 16जीबी मेमरी, 3जीबी रॅम सोबत 32जीबी स्टोरेज तसेच 4जीबी रॅम मेमरी सोबत 64जीबी इंटरनल मेमरी मिळू शकते. सर्व वेरिएंट्स ची इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येईल.

टेना ने शेयर केलेला लेनोवो स्मार्टफोन चा फोटो पाहता याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार हा फोन डुअल सिम ला सपोर्ट करेल तसेच यात बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत 4जी वोएलटीई पण असेल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,970एमएएच ची बॅटरी मिळू शकते. लेनोवो हा फोन ब्लॅक, ब्लू, सिल्वर तसेच गोल्ड कलर वेरिएंट मध्ये सादर करू शकते.

लेनोवो द्वारा जल्द लॉन्च केल्या जाणार्‍या या स्मार्टफोन बद्दल बोलले जात आहे की कंपनी हा डिवाईस बजेट सेग्मेंट मध्ये सादर करेल तसेच हा फोन शाओमी रेडमी 5 ला स्पर्धा म्हणून बाजारात येईल. विशेष म्हणजे हा फोन काही दिवसांपूर्वी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. अशा आहे की लेनोवो लवकरच या फोन च्या लॉन्च ची घोेषणा करेल.

The post लेनोवो घेऊन येत आहे 4 कॅमेरा वाला फोन, कमी किंमतीत लॉन्च होऊन शाओमी रेडमी नोट 5 देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-l38031-listed-on-tenna-with-four-camera-full-specification-feature-in-marathi/feed/ 0