Lenovo Z6 Youth Edition - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 29 Jun 2019 08:18:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Lenovo Z6 https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z6-8gb-ram-4000mah-battery-snapdragon-730-6-39-inch-oled-display-specs/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z6-8gb-ram-4000mah-battery-snapdragon-730-6-39-inch-oled-display-specs/#respond Sat, 29 Jun 2019 08:18:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4693 जुलै मध्ये कंपनी Lenovo Z6 सादर करेल.

The post 8जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Lenovo Z6 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo ने अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या ‘Z सीरीज’ अंतर्गत Lenovo Z6 Pro आणि Lenovo Z6 Youth Edition स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये लोकांना आवडले आहेत. कंपनीने सांगितले आहे कि हीच सीरीज वाढवत Lenovo Z6 स्मार्टफोन पण लॉन्च केला जाईल. Lenovo Z6 च्या लॉन्च डेटचा खुलासा अजूनतरी कंपनीने केला नाही पण गेल्या काही दिवसांपासून कंपनीचे वाइस प्रेसिडेंट चँग चेंग Lenovo Z6 संबंधित छोटीमोठी माहिती सोशल मीडिया वर पोस्ट करत आहेत. या पोस्ट व इतर लीक द्वारे फोन लॉन्चच्या आधीच Lenovo Z6 च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Lenovo Z6 डिजाईन

लेनोवो झेड6 चा फोटो कंपनीने आधीच टीज केला आहे. समोर आलेल्या फोटो वरून समजले आहे कि Lenovo Z6 पण Lenovo Z6 Pro आणि Lenovo Z6 Youth Edition स्मार्टफोन प्रमाणेच वॉटरड्रॉप नॉच स्टाईल वर सादर केला जाईल. फोटो वरून समजले आहे कि फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट दिला जाईल. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच दिली जाईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. हे तिन्ही कॅमेरा सेंसर एका रेषेत असतील तसेच सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट दिली जाईल.

Lenovo Z6 स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेले डिटेल पाहता Lenovo Z6 6.39-इंचाच्या ओएलईडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. डिस्प्ले रेज्ल्यूशनची माहिती तर अजून समोर आली नाही पण हा फोन वॉटरड्रॉप नॉच सह येईल जो 93.1 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करेल. तसेच डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला जाईल. Lenovo Z6 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल जो सहाव्या जेनेरेशनचा असेल आणि 0.13 सेकंदात फोन अनलॉक करेल.

Lenovo Z6 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या डिटेल्स नुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला जाईल जो क्वालकॉमच्या सर्वात नवीन चिपसेट पैकी एका स्नॅपड्रॅगॉन 730 वर चालेल. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या गीकबेंच लिस्टिंग मध्ये असे पण समोर आले होते कि Lenovo Z6 कंपनी द्वारा 8जीबी रॅम सह बाजारात आणेल. असे बोलले जात आहे कि कंपनी Lenovo Z6 एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च करेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Lenovo Z6 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सलचा Sony IMX576 प्राइमरी सेंसर दिला जाईल सोबतच 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच 2x optical zoom आणि 8x hybrid zoom वाली 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस असेल. त्याचप्रमाणे सेल्फी साठी लेनोवो झेड6 मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

Lenovo Z6 मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. Lenovo ने फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती तर दिली आहे पण Z6 ची लॉन्च डेट अजूनही सांगितली नाही. अशा आहे कि जुलै मध्ये कंपनी Lenovo Z6 सादर करेल.

The post 8जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Lenovo Z6 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z6-8gb-ram-4000mah-battery-snapdragon-730-6-39-inch-oled-display-specs/feed/ 0