LG Folder 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 14 Apr 2020 11:54:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 LG Folder 2 फ्लिप फोन झाला लॉन्च, जाणून घ्या या शानदार फोनची किंमत https://www.91mobiles.com/marathi/lg-folder-2-4g-dual-screen-flip-phone-launched-in-south-korea-know-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/lg-folder-2-4g-dual-screen-flip-phone-launched-in-south-korea-know-price-specification/#respond Tue, 14 Apr 2020 11:54:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7074 LG Folder 2 बद्दल बोलायचे तर कंपनीने हा फोन दोन कलर ऑप्शन Platinum Grey आणि White मध्ये सादर केला आहे.

The post LG Folder 2 फ्लिप फोन झाला लॉन्च, जाणून घ्या या शानदार फोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दक्षिण कोरियन कंपनी एलजी ने अलीकडेच आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या नावाची घोषणा केली होती. कंपनी हा स्मार्टफोन एलजी वेलवेट नावाने सादर करेल. तसेच आता कंपनीने आपल्या घराच्या मार्केट मध्ये एलजी फोल्डर 2 नावाचा स्मार्टफोन सादर केला आहे. हा एक फ्लिप फोन आहे जो कि एंट्री लेवल स्पेसिफिकेशन्स सह आला आहे.

कंपनीने फेब्रुवारी 2018 मध्ये एलजी फोल्डर नावाचा फोन सादर केला होता. तर आता या फोनचा अपग्रेडेड वर्जन Folder 2 सादर केला गेला आहे जो 4G डुअल स्क्रीन फ्लिप सह येतो. या फोन मधील स्क्रीनच्या व्यतिरिक्त एलजी फोल्डर 2 मध्ये एक छोटी स्क्रीन फोल्ड झाल्यानंतर पण बाहेर राहते.

LG Folder 2 ची किंमत

LG Folder 2 बद्दल बोलायचे तर कंपनीने हा फोन दोन कलर ऑप्शन Platinum Grey आणि White मध्ये सादर केला आहे. डिवाइसची किंमत 198,000 won (जवळपास 12,413 रुपये) आहे. तसेच 17 एप्रिल पासून डिवाइस साउथ कोरिया मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन्स

LG Folder 2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात आतल्या बाजूला 2.8-इंचाची इंटरनल एलसीडी स्क्रीन आहे, जिचे स्क्रीन रिजोल्यूशन 240 x 320 पिक्सल आहे. तर बाहेरच्या बाजूला LG Folder 2 मध्ये 0.9-इंचाची मोनो स्क्रीन आहे जिच्यात नोटिफिकेशन बघता येतात.

फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 210 चिपसेट देण्यात आला आहे जो 1 GB रॅम आणि 8 GB इंटरनल स्टोरेज सह येतो. तसेच फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम आणि पावरसाठी 1,470mAh ची बॅटरी सह येतो. फोटोग्राफीसाठी LG Folder 2 मध्ये 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

The post LG Folder 2 फ्लिप फोन झाला लॉन्च, जाणून घ्या या शानदार फोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-folder-2-4g-dual-screen-flip-phone-launched-in-south-korea-know-price-specification/feed/ 0