LG G7 ThinQ Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 03 May 2018 10:53:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एलजी ने लॉन्च केले आयफोन फोन सारखा जी7 थिंक आणि जी7 ​थिंक प्लस, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्व काही https://www.91mobiles.com/marathi/lg-g7-thinq-and-g7-thinq-plush-price-specifications-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-g7-thinq-and-g7-thinq-plush-price-specifications-and-features-in-marathi/#respond Thu, 03 May 2018 07:32:14 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=242 फोन मधील ​थिंक टेक्निक ह्यूमन सेंट्रिक टेक्निक आहे जी घरातील होम अप्लाइंस सह अन्य डिवाइस सोबत कनेक्ट होण्यास सक्षम आहे.

The post एलजी ने लॉन्च केले आयफोन फोन सारखा जी7 थिंक आणि जी7 ​थिंक प्लस, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्या काही दिवसांपासून एलजी च्या नव्या फ्लॅगशिप फोन जी7 ची चर्चा चालू होती. सांगण्यात येत होते की कंपनी यावेळी बेजल लेस नॉच डिसप्ले वाला फोन लॉन्च करू शकते आणि या फोन बद्दल आता पर्यंत अनेक लीक पण आलेत. कंपनी ने काल एलजी जी7 वरून पडदा हटवला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या फोन कंपनी ने एलजी जी7 थिंक हे नाव दिले आहे. तसेच कंपनी ने याचा मोठा मॉडेल पण सादर केला आहे ज्याला जी7 थिंक+ नाव दिले गेले आहे.

एलजी जी7 थिंक च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे तर यात 6.1-इंचाचा क्वॉडएचडी+ (1440×3120 पिक्सल रेजल्यूशन) वाला फुलव्यू सुपर ब्राइट डिसप्ले देण्यात आला आहे. जसे की आम्ही आधीच सांगितले होते यात तुम्हाला नॉच स्क्रीन मिळेल. कंपनी ने याला 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केले आहे. त्याचबरोबर चांगली बाब ही आहे की एलजी जी7 ​थिंक ची स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे जी याला मजबूत आणि स्क्रॅच प्रूफ बनवते.

या फोनला क्वालकॉम च्या सर्वात लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर सादर करण्यात आले आहे. फोन मध्ये कोरियो आर्किटेक्चर वाला आॅक्टा-कोर प्रोसेसर (4×2.8गीगाहट्र्ज कोरयो 385 गोल्ड + 4×1.7गीगाहट्र्ज कोरयो 385 सिल्वर) आहे. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रीनो 630 चिपसेट दिला गेला आहे. जी7 थिंक मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल मेमरी दिली गेली आहे. त्याचबरोबर फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही याला 2टीबी पर्यंत एक्सपांड करू शकता.

फोटोग्राफी पाहता यात 16-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने याला एफ/1.9 और एफ/1.6 अपर्चर सह सादर केले आहे जो पोर्टेट मोड सह वाइड एंगल फोटो घेण्यास सक्षम आहे. कॅमेरा सह लेजर पीडीएएफ आणि आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सारखे आॅप्शन देण्यात आले आहेत. फोनचा फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे आणि याला कंपनी ने एफ/1.9 अपर्चर सह सादर केले आहे.

एलजी जी 7 ​थिंक एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो सह सादर करण्यात आले आहे. फोन मधील ​थिंक टेक्निक ह्यूमन सेंट्रिक टेक्निक आहे जी घरातील होम अप्लाइंस सह अन्य डिवाइस सोबत कनेक्ट होण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर एआई चा वापर कॅमेरा आणि वॉइस रिकॉग्निशन सह अन्य फीचर्स स्मार्ट बनवण्यास सक्षम आहे. एलजी चा एआई वॉईस कमांड गूगल वाइस सोबत चालतो आणि हा इंटरनेट सर्च सह फोन फीचर्स पण सर्च करण्यास सक्षम आहे. कंपनी ने यात खास गूगल असिस्टेंट बटन दिले आहे.

म्यूजिक च्या बाबतीत पण हा काही कमी नाही. हा फोन हाई-फाई क्वॉड डेक, डीटीएस एक्स 3डी सराउंड साउंड आणि बूमबॉक्स सारख्या फीचर्स सह सादर करण्यात आला आहे. तसेच चांगली बाब ही आहे की एलजी जी7 ​थिंक आईपी68 ​सर्टिफाइड आहे ज्यामुळे हा फोन पाणी आणि धूळी पासून वाचू शकतो.

फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर सह फेस अनलॉक वाला प्रीमियम फीचर पण आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी दिली आहे जी क्विक चार्ज 3.0 ला सपोर्ट करते.

एलजी जी7 थिंक+ बद्दल बोलायचे तर तुम्हाला फक्त मेमरी मध्ये फरक दिसेल. या फोन मध्ये 6जीबी रॅम सोबत 128जीबी ची मेमरी देण्यात आली आहे. पण हा फोन नंतर उपलब्ध होईल. सर्वात आधी एलजी जी7 थिंक दक्षिण कोरिया मध्ये येईल. त्यानंतर आशिया, उत्तर अमेरिका आणि यूरोप तसेच लॅटिन अमेरिकेत सादर केला जाईल.

The post एलजी ने लॉन्च केले आयफोन फोन सारखा जी7 थिंक आणि जी7 ​थिंक प्लस, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-g7-thinq-and-g7-thinq-plush-price-specifications-and-features-in-marathi/feed/ 0