LG G8X ThinQ - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 20 Dec 2019 13:49:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 डुअल डिस्प्ले असलेला LG G8X ThinQ भारतात झाला लॉन्च, बघा या शानदार स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/lg-g8x-thinq-launched-in-india-with-dual-display-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/lg-g8x-thinq-launched-in-india-with-dual-display-specs-price/#respond Fri, 20 Dec 2019 13:49:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6106 हा सेकेंडरी डिस्प्ले यूएसबी टाईप सी द्वारे जोडता येतो जी बाहेरून दिसत नाही.

The post डुअल डिस्प्ले असलेला LG G8X ThinQ भारतात झाला लॉन्च, बघा या शानदार स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत तसेच टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत टेक कंपनी LG ने नवीन डिवाईस G8X ThinQ लॉन्च केला आहे. एलजी जी सीरीज मध्ये आलेला हा डिवाईस एक डुअल सिम फोन आहे ज्यात फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये एंट्री घेतली आहे. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला LG G8X ThinQ कंपनीने 49,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो उद्यापासून भारतीय बाजारात सेल साठी उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया या शानदार फोन मधील अनोख्या टेक्नॉलॉजी बद्दल.

LG G8X ThinQ बद्दल सर्वातआधी स्पष्ट करतो कि हा स्मार्टफोन दोन डिस्प्ले असलेला नाही तर या फोन सह सेकेंडरी डिस्प्ले वेगळा जोडता येतो. कंपनी कडून स्मार्टफोन सोबत एक वेगळा डिस्प्ले पॅनल दिला जातो जो फोनला जोडून एक साथ दोन स्क्रीन वर काम करता येईल. तसेच यूजर आपल्या वापरानुसार फोनचा एक्स्ट्रनल डिस्प्ले काढून एकाच स्क्रीन वर पण काम करू शकतात. हा सेकेंडरी डिस्प्ले यूएसबी टाईप सी द्वारे जोडता येतो जी बाहेरून दिसत नाही.

LG G8X ThinQ

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता LG G8X ThinQ 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2,340 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी वॉटरड्रॉप नॉच स्क्रीनला सपोर्ट करतो. कंपनीने हि स्क्रीन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह आणली आहे. फोन सॊबत येणारा सेकेंडरी डिस्प्ले पण 6.4 इंचाचा आहे.

LG G8X ThinQ कंपनीने एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो क्वॉलकॉमच्या पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 2 टीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी साठी हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी LG G8X ThinQ एफ/1.9 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी LG G8X ThinQ मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली आहे जो क्वालकॉम क्विक चार्ज 3.0 ला सपोर्ट करते.

The post डुअल डिस्प्ले असलेला LG G8X ThinQ भारतात झाला लॉन्च, बघा या शानदार स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-g8x-thinq-launched-in-india-with-dual-display-specs-price/feed/ 0