LG K31 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 21 Aug 2020 10:42:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एलजी ने लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन LG K31, पडल्यावर पण नाही तुटणार या फोनची स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/lg-k31-launched-specs-price-sale-mil-std-810g-certified/ https://www.91mobiles.com/marathi/lg-k31-launched-specs-price-sale-mil-std-810g-certified/#respond Fri, 21 Aug 2020 10:42:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7831 कंपनीने LG K31 2 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

The post एलजी ने लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन LG K31, पडल्यावर पण नाही तुटणार या फोनची स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG चे अनेक नवीन स्मार्टफोन गेल्या काही दिवसांपासून सतत समोर येत आहेत. हे फोन वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स साइट्स वर लिस्ट होत आहेत जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित माहिती शेयर करण्यात आली आहे. पण आता हे फोन्स लीक मधून बाहेर येऊन बाजारात येत आहेत. एलजी ने हि सुरवात अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर आपला नवीन स्मार्टफोन LG K31 लॉन्च करून केली आहे. एलजी के31 अमेरिकन बाजारात लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत भारतासहित इतर बाजारांत पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

LG K31 कंपनीने ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. फोन स्क्रीनच्या दोन्ही बाजूंना नॅरो बेजल्स आहेत तर वर आणि खालच्या बाजूला रुंद बॉडी पार्ट देण्यात आला आहे. एलजी के31 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो मागे मधोमध हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट पण आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन एका साईड पॅनल वर आहेत तसेच फोन मध्ये गूगल असिस्टेंट बटन पण आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

LG K31 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.7 इंचाच्या एचडी+ फुलविजन डिस्प्लेला सपोर्ट करतो. हि स्क्रीन 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते जी 295पीपीई वर सादर करण्यात आली आहे. कंपनीने एलजी के31 एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो एलजीयूएक्स 9.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LG K31 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत 120डिग्री एफओवी क्षमता असलेली एफ/2.2 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी एलजीचा हा नवीन फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

LG K31 डुअल सिम फोन आहे जो एलजी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन पावर बॅकअपसाठी 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. एलजी ने आपला फोन MIL-STD-810G सर्टिफाइड केला आहे ज्यामुळे फोन पडल्यावर तुटण्यापासून वाचतो.

वेरिएंट व किंमत

कंपनीने LG K31 2 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने फक्त 32 जीबी पर्यंत वाढवता येते. अमेरिकन बाजारात हा फोन 149.99 यूएस डॉलर मध्ये लॉन्च झाला आहे जी किंमत भारतीय करंसीनुसार 11,000 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे कि एलजी येत्या काही दिवसांत या फोनची घोषणा भारतीय बाजारात पण करेल.

The post एलजी ने लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन LG K31, पडल्यावर पण नाही तुटणार या फोनची स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-k31-launched-specs-price-sale-mil-std-810g-certified/feed/ 0
एलजी चा नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन LG K31 आला समोर, Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/low-budget-phone-lg-k31-listed-on-google-play-console-specs-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-phone-lg-k31-listed-on-google-play-console-specs-revealed/#respond Thu, 09 Jul 2020 09:25:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7614 LG चा एक आगामी फोन गूगल प्ले कंसोल वर पण लिस्ट झाला आहे जिथे समजले आहे कि हा मोबाईल LG K31 नावाने बाजारात येईल.

The post एलजी चा नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन LG K31 आला समोर, Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन कंपनी LG बद्दल अलीकडेच बातमी आली होती कि कंपनी भारतीय बाजारासाठी नवीन योजना बनवत आहे ज्या अंतर्गत ऑगस्ट पर्यंत 6 नवीन मोबाईल भारतात लॉन्च केले जातील. एलजी ने सांगितले होते कि हे सर्व स्मार्टफोन्स बजेट सेग्मेंट मध्ये येतील ज्यांची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असेल. या स्मार्टफोन्सच्या लॉन्चच्या माहितीच्या आधीच आता LG चा एक आगामी फोन गूगल प्ले कंसोल वर पण लिस्ट झाला आहे जिथे समजले आहे कि हा मोबाईल LG K31 नावाने बाजारात येईल.

LG K31 गूगल प्ले कंसोल वर लिस्ट केला गेला आहे जो टिपस्टर स्टफलिस्टिंग्सने स्पॉट केला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या नावाव्यतिरिक्त याच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण मिळाली आहे. या लिस्टिंग मध्ये फोनचा फोटो पण वापरण्यात आला आहे ज्याचा फ्रंट पॅनल दिसत आहे. या फोटो मध्ये फोन ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह दिसत आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाउल रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

LG K31

एलजी के31 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता गूगल प्ले कंसोल वर हा फोन 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये स्क्रीन साईजचा खुलासा तर झाला नाही पण इववधे मात्र समजले आहे कि एलजी के31 चा डिस्प्ले 280DPI ला सपोर्ट करतो. या वेबसाइट वर फोन mdh5lm कोडनेम सह लिस्ट केला गेला आहे.

LG K31 प्ले कंसोल वर एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे. फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर (4x ARM Cortex-A53 + 4x ARM Cortex-A53) सोबत मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे. या वेबपेज वर एलजी चा आगामी स्मार्टफोन 2 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये पावरवीआर जीई8320 जीपीयू असल्याचे पण समोर आले आहे. LG K31 कधी बाजारात येईल यासाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

भारतात लॉन्च होतील 6 नवीन फोन

मागे आलेल्या बातमीनुसार एलजी इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्यूनिकेशन आणि बिजनस हेड अद्वैत विद्या म्हणत आहेत कि गेल्या महिन्यांत अँटी-चायना वातावरणामुळे भारतात कंपनीच्या स्मार्टफोनच्या विक्रीत 10 पट वाढ झाली आहे. अद्वैत म्हणतात आहे कि कंपनीचा सर्वात जास्त फोकस अफोर्डेबल सेगमेंट वर असेल. कंपनी या सेगमेंट मध्ये 15,000 पेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. तसेच कंपनी डिस्ट्रिब्यूशनसाठी ऑनलाइन चॅनेल्स वर जास्त फोकस करेल. कंपनीनुसार भारतात वाढ करण्यासाठी हि योग्य वेळ आहे.

कंपनीचे म्हणणे आहे कि यावर्षी ऑगस्ट पासून आम्ही सर्व कॅटगरी मध्ये सहा फोन लॉन्च करेल– जे 10,000 च्या श्रेणी पासून पुढच्या कॅटगरी मध्ये येतील. कंपनीने वर्षाच्या शेवटपर्यंत कॉरपोरेट विक्री आणि टॅबलेट बाजारात आणणार आहे. तसेच LG भारतात 15 पट प्रॉडक्शन वाढवण्याची तयारी करत आहे. कंपनी भारतात दिवाळी सीजनचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. या काळात भारतात नवीन स्मार्टफोन्स विकत घेतले जातात. तसेच ई-कॉमर्स साइट वर पण अनेक खास ऑफर्स दिल्या जातात.

The post एलजी चा नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन LG K31 आला समोर, Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-phone-lg-k31-listed-on-google-play-console-specs-revealed/feed/ 0